आई महिला केंद्रित पर्यटन धोरणआई महिला केंद्रित पर्यटन धोरण
1 0
Read Time:3 Minute, 11 Second

श्री विष्णू मोंडकर,अध्यक्ष ,पर्यटन व्यावसायिक महासंघ .

चालू पर्यटन हंगामात जलक्रीडा व्यवसाय करण्यासाठी पर्यटन संचानालय (DOT),कोकण विभाग.नवी मुंबई महाराष्ट्र यांची परवानगी आवश्यक असणार आहे यांसाठी पर्यटन व्यावसायिक महासंघ तर्फे १७/८/२०२२ रोजी सकाळी ११.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत हॉटेल श्री महाराज येथे जलक्रीडा व्यावसायिकांसाठी व्यवसाय नोंदणी मार्गदर्शन तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक दराच्या माध्यमातून व्यवसाय कसा करता येईल जलपर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षित सेवा कशी देता येईल प्रशासन,पर्यटक व स्थानिक प्रशासन यांच्यामधील समन्वय कसा साधता येईल यासाठी जलक्रीडा व्यावसायिकांची मिटींग आयोजित करण्यात आली आहे .जलक्रीडा व्यावसायिकांच्या वतीने नियोजन करून प्रशासन स्तरावर या साठी महासंघाच्या वतीने पाठपुरावा केला जाणार आहे या क्षेत्रातील जिल्ह्यातील व्यवसायिकांनी यां कार्यशाळेचा लाभ घ्यावा.
सध्यस्थितीत जेटस्की,बनाना,बंपर,स्पीडबोट ,नोंका विहार ,वॉटरस्कुटर ,पॅरॅसिलिंग तसेच स्कुबा डायव्हिंग या जल पर्यटन क्षेत्रातील तसेच जिल्ह्यातील अन्य साहसीक्रीडा प्रकारातील व्यावसायिकांना आपला चालू किंवा नवीन व्यवसाय नोंदणी करण्यासाठी येणाऱ्या अडचणी तसेच व्यवसाय अधिकृत नोंदणीकृत नसल्याने वारंवार शासनाच्या दंडास व कार्यवाहीस सामोरे जावे लागत आहे पर्यटन व्यावसायिक महासंघ च्या वतीने या विषयी मार्ग काढण्याचे ठरविले असून सदर व्यवसायातील व्यावसायिकांना या व्यवसाय नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्र व व्यवसाय नोंदणी साठी मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
जलपर्यटन प्रकारातील जिल्ह्यातील व्यावसायिकानी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा तसेच शासनाकडे मागणी केलेले प्रलंबित परवाने साठी संघटित पणे पाठपुरावा केला जाणार आहे .आपला व्यवसाय नोंदणी प्रकिया पूर्ण करून घ्यावी अशी विनंती श्री विष्णू मोंडकर अध्यक्ष ,पर्यटन व्यावसायिक महासंघ यांच्या वतीने करण्यात येत आहे .

Govt. Policy & Gr Sindhudurg Tourism Medical Tourism Watersports

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

You missed

Solar Energy