Gradian MinisterRavindra Chavan
0 0
Read Time:4 Minute, 3 Second

श्री विष्णू मोंडकर अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ.

सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा घोषित होऊन 25 वर्षे पेक्षा जास्त काळ लोटूनही स्थानिक पातळीवर पर्यटन दृष्टीने विकसित झालेला नाही परंतु गेल्या वर्षभरात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबादारी स्वीकारल्या नंतर जिल्ह्याच्या शाश्वत पर्यटन विकासासाठी प्रशासन व राज्य सरकार सकारात्मक असल्याचा अनुभव जिल्हा वासियांना येत आहे .यातही महत्वपूर्ण आणि आनंदाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा सार्वजनिक बांधकाम विभागाने गड किल्ले विकासासाठी हेड बनवून त्या माध्यमातून राज्यातील गड किल्ले विकसित करण्याचा संकल्प केला असून चालू वर्षाच्या अर्थसंकल्पात 11 गड विकसित करण्यासाठी निधी उपलब्ध करू दिला असून यांचे सर्व श्रेय राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांचे असून पर्यटन व्यावसायिक महासंघ कोकण तर्फे त्यांचे आभार मानले असून या माध्यमातून जिल्ह्याच्या गड किल्ले विकासासाठी निधी प्राप्त होणार असून या द्वारे जिल्ह्यातील ऐतिहासिक पर्यटन वाढीसाठी मदत होणार आहे .मा.रविंद्रजी चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून यापूर्वीच सिंधुदुर्ग जिह्यातील राजकोट किल्ला दोन महिन्यात ओसाड अवस्थेत असलेला कुठलेही जुने अवशेष शिल्लक नसताना पुनर्जिवित करून या ठिकाणी जिल्ह्यातील 32 गडकिल्ल्यावरील विधिवत पणे माती आणून सदर गडावर उभ्या केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळ्याच्या फाऊंडेशन मध्ये कलश स्थापित करून नोंसेना दिनाच्या माध्यमातून देशाचे मा.पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या हस्ते लोकार्पण कारण्यात आले.आज या माध्यमातून सिंधुदुर्ग जिह्यातील पर्यटनाचा आलेख वाढत असून या किल्ल्यास तीन महिन्यात एक लाख पेक्षा जास्त पर्यटकांनी भेट दिली आहे.पर्यटन व्यावसायिक महासंघ कोकण तर्फे उपलब्ध निधीमधून जिल्ह्यातील जास्तीत जास्त गड किल्ले पुनर्जीवित करून जिल्ह्याच्या बारमाही पर्यटन वाढीसाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे पर्यटन व्यावसायिक महासंघ कोकण अध्यक्ष श्री विष्णू मोंडकर यांनी स्पष्ट केले असून याकामी सहकार्य करणारे भाजपा जिल्ह्याध्यक्ष सिंधुदुर्ग श्री प्रभाकर सावंत यांचेही पर्यटन महासंघाने आभार मानले आहेत.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

You missed

Solar Energy