कोकण च्या शाश्वत पर्यटन विकासासाठीकोकण च्या शाश्वत पर्यटन विकासासाठी
0 0
Read Time:3 Minute, 30 Second

श्री विष्णू मोंडकर अध्यक्ष गाबीत फिशरमेन फेडरेशन

महाराष्ट्र राज्याच्या भूजलाशयीन आणि सागरी जिल्ह्यात मत्स्योद्योग धोरण निच्छित करण्यासाठी 18 सदस्यीय समिती गठीत केली असून श्री विष्णू मोंडकर अध्यक्ष गाबीत फिशरमंन फेडरेशन यांची या समिती सदस्य पदी नियुक्ती करण्यात आल्याचे श्री किशोर जकाते उप सचिव महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून पत्र प्राप्त झाले असून सदर समितीचे अध्यक्ष श्री राम नाईक पूर्व राज्यपाल उत्तर प्रदेश ,श्री महेश बालदी ,श्रीमती मनीषा चौघरी,श्री आशिष जयस्वाल श्री पंकज भोयर ,श्री रमेश पाटील श्री प्रवीण दटके आमदार महाराष्ट्र राज्य ,आयुक्त मत्स्यव्यवसाय महाराष्ट्र राज्य,व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र मत्स्यद्योग विकास महामंडळ मुंबई,उप सचिव मंत्रालय मुंबई,सहआयुक्त राज्य भूजल तसेच निमखारे ,राज्य व केंद्रीय वैज्ञानिक केंद्रीय मत्स्यकी अनुसंधान संस्था महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर या समितीचे सदस्य राहणार असून महाराष्ट्र राज्यातील भूजलाशयीन व सागरी खाडी किनारी मत्स्यद्योग विकास धोरण निच्छित करण्यासाठी सदर कमिटी कार्य करणार आहे.
यावेळी बोलताना श्री विष्णु मोंडकर म्हणाले की या राज्याच्या कमिटी च्या माध्यमातून मच्छिमार समाजाच्या अनेक वर्षाच्या मागण्या पूर्ण करण्याचे व्यासपीठ उपलब्ध झाले असून मच्छिमार समाजाच्या राहती घरे व्यावसायिक जागा ,फिशिंग पद्धती ,आवश्यक राष्ट्रीय सहकार विकास निगम (NCDC) मधील समस्या डिझेल परतावा मच्छिमार व्यावसायिकाला आवश्यक सरकारी योजना मदत पुनर्वसन ,बंदरे ,बंदरजेटी,बंधारे ,व्यावसायिक मूलभूत सुख सुविधा मिळण्यासाठी तसेच कोकणातील मच्छिमार समाजाला सामाजिक व्यावसायिक ,आर्थिक उन्नतीसाठी कार्य करण्याची एक मोठी संधी या माध्यमातून मला उपलब्ध झाली असून प्रामुख्याने सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री रवींद्रजी चव्हाण साहेब ,मस्त्यविकास मंत्री श्री सुधीरजी मुनगंटीवार तसेच माजी खासदार श्री निलेशजी राणे साहेब यांचे आभार मानत असल्याचे मत श्री विष्णू मोंडकर अध्यक्ष गाबीत फिशरमेन यांनी व्यक्त केलं आहे .

Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

You missed

Solar Energy