सिंधुरत्न विकास योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिकांना समाविष्ट करावे.

रत्नागिरी जिल्हास्तरीय विकास

श्री विष्णू मोंडकर,पर्यटन व्यावसायिक महासंघ सिंधुदुर्ग.

सिंधुरत्न योजनेचे अध्यक्ष मा.आ.दीपकभाई केसरकर यांच्याकडे पर्यटन महासंघाची विनंती.
अध्यक्ष
सिंधूरत्न योजना.
महाराष्ट्र सरकार

पर्यटन व्यवसाय वाढीसाठी सिंधुरत्न योजनेत खालील मागणीचा समावेश करणेबाबत विनंती केली असून
चांदा ते बांदा योजनेच्या माध्यमातून आपण ग्रामीण भागातील शेतकरी ,मत्सव्यवसाय ,बचतगटातील व्यावसायिकांना यांत्रिकरणाची जोड देऊन ग्रामीण अर्थव्यवस्था,रोजगार निर्मितीचे कार्य आपल्या माध्यमातून उभे होत असताना पूर्ण राज्याने पहिले आहे सदर योजनेनंतर सिंधुरत्न योजनेच्या अध्यक्ष पदी आपल्या झालेल्या निवडीबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन.
पर्यटन व्यावसायिक महासंघ जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी कार्य करत असून सदर व्यवसाय वाढीसाठी काही विनंती महासंघ आपल्यास करीत आहे.
१)स्कुबा डायव्हिंग प्रशिक्षणासाठी अनुदान योजना राबविणे.
२)नव्याने चालू होणाऱ्या जलक्रीडा,ऍडव्हेंचर प्रकल्प चालू करू इच्छिणाऱ्या व्यवसायींकांसाठी अनुदान योजना राबविणे.
३)टुरिस्ट परवाना लक्झरी कार खरेदी साठी योजना राबविणे.
४)मच्छिमार रापण संघाच्या कावनांचे मच्छिमार कल्चर सेंटर उभारण्यासाठी योजना राबविणे.
५)सद्यस्थितीत चालू असलेल्या होम स्टे,हॉटेल मधील रूम ३ स्टार दर्जाच्या होण्यासाठी प्रति रूम योजना राबविणे.
६)पर्यटन व्यावसायिकांना इन्व्हर्टर तसेच जनरेटर खरेदीसाठी योजना राबविणे.
७)जिल्हा पर्यटन सफारी साठी अद्यावत बस उपलब्ध करणे
८)अपिरिचित पर्यटन स्थळे विकासासाठी योजना राबविणे.
९)सिंधुरत्न योजनेच्या कमिटीत पर्यटन क्षेत्राच्या विकासाठी आवश्यक भूमिका मांडण्यासाठी महासंघाच्या एका व्यक्तीची निवड करावी.
१०)अद्यावत पर्यटन माहिती केंद्र साठी योजना राबवावी.
आपल्या कार्यपद्धतीवर महासंघास पूर्ण विश्वास असून आपण महासंघाच्या पर्यंटन वाढीसाठी केलेल्या विनंतिचा विचार करावा ही विनंती.
आपल्या सहकार्याच्या अपेक्षेत !

You missed

Solar Energy