आई महिला केंद्रित पर्यटन धोरणआई महिला केंद्रित पर्यटन धोरण
1 0
Read Time:4 Minute, 6 Second

जिह्यातील होम स्टे,ऍग्रो व लॉजींग बोर्डिंग व्यावसायिकांनी आवर्जून उपस्थित रहावे .

सिंधुदुर्ग पर्यटन दृष्टया विकसित होण्यासाठी देशातील पर्यटन संचानालयाच्या महाराष्ट्र च्या माध्यमातून तेलंगणा,छत्तीसगड,गुजरात,मध्यप्रदेश,दिल्ली अश्या आठ राज्यातील ५० टूर ऑपरेटर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आंबोली वर्षा महोत्सवाच्या माध्यमातून जिल्ह्यात दाखल होणार असून आंबोली हिल स्टेशन बद्दल माहिती घेणार आहेत तसेच त्यांच्या प्रमुख उपस्थितित पर्यटन क्षेत्रातील व्यक्तीची एकत्र बैठक मंगळवार दिनांक 15/8/23 रोजी संध्याकाळी 6 ते 8 या वेळेत हॉटेल कोकण क्राऊन सावंतवाडी रेल्वे स्टेशन समोर आयोजित केली आहे
सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून 25 वर्षे होऊनही काही भागातील सागरी पर्यटन पर्यटन स्थळे सोडून जिल्हाच्या पर्यटन विकासात म्हणावा तशी वाढ झालेली नाही जिल्ह्यातील बीच टुरिझम बरोबर कल्चर,हिस्ट्री,अँग्रो,मेडिकल,नेचर ,
कातळशिल्पं ,जंगल ,फूड टुरिझम विषयी देशविदेशात टूर आयोजित करणाऱ्या टुर ऑपरेटर यांच्या पर्यतं ही माहिती पोचल्यास खऱ्या अर्थाने जिल्ह्यात शाश्वत बारमाही पर्यटनवाढीसाठी मदत होईल यांसाठी पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या वतीने केंद्र व राज्य सरकारच्या कडे पाठपुरावा चालू आहे त्याचाच एक भाग म्हणून हॉटेल कोकण क्राऊन सावंतवाडी येथे संध्याकाळी 6 ते 8 वेळेत पर्यटन संचालनालय महाराष्ट्र यांच्या माध्यमातून परिचित अपरिचित पर्यटन स्थळे तसेच तेथील राहण्याची ,जेवण्याची व्यवस्था या साठी एकत्र बैठक आयोजित केली आहे जिह्यात आज शेकडो कोटी रुपये ब वर्ग अ वर्ग पर्यटन निधीतून जिल्ह्यातील जागृत मंदिरा साठी खर्च झाले आहेत,ग्रामीण पर्यटनाच्या शासकीय निधीच्या माध्यमातून देखील करोडो रुपये खर्च होऊनही यांचा पर्यटन वाढीसाठी उपयोग होऊ शकला नाही अनेक देवराई ,गुफा ,कातशिल्प ,गड किल्ले,मंदिरे ज्या ग्रामपंचायत क्षेत्रात येत आहेत त्यांनी आपल्या गावाची संक्षिप्त माहिती बनवून तसेच आज जिल्ह्यात दोन हजार पेक्षा जास्त होमस्टे ,न्याहरी निवास,कृषी पर्यटन प्रकल्प,हॉटेल लॉजींग बोर्डीग प्रकल्प असून त्यांनिही आपल्या व्हिजिटींग कार्ड तसेच आपल्या आजू बाजूच्या परिसरातील माहिती त्याचं बरोबर जिल्ह्यात अनेक वॉटर स्पोट ,स्कूबा डायव्हिंग,नोकानयन करणारे व्यावसायिक यांनी या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन श्री विष्णू मोंडकर अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या वतीने करण्यात येत आहे .

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

You missed

Solar Energy