WATERSPORTS
0 0
Read Time:6 Minute, 9 Second

श्री विष्णू मोंडकर.अध्यक्ष.पर्यटन व्यावसायिक महासंघ.

अनधिकृत जलक्रीडा व्यावसायिकांना अधिकृत करण्यासाठी १७ ऑगस्ट २०२२ ला जलक्रीडा व्यावसायिकांसाठी व्यवसाय नोंदणी मार्गदर्शन व जलक्रीडा व्यावसायिकांची कार्यशाळा हॉटेल श्री महाराज येथे संप्पन झाली यावेळी १४१ जलक्रीडा व्यावसायिकांनी सदर कार्यशाळेचा लाभ घेतला.चालू पर्यटन हंगामात जलक्रीडा व्यवसाय करण्यासाठी पर्यटन संचानालय (DOT),कोकण विभाग.नवी मुंबई महाराष्ट्र यांची परवानगी आवश्यक असणार आहे यांसाठी पर्यटन व्यावसायिक महासंघ तर्फे आयोजित कार्यक्रमास जलक्रीडा व्यावसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी जलक्रीडा व्यावसायिकांच्या नोंदणी प्रक्रिया करण्यात आली तसेच प्रशासनाकडे प्रलंबित जलक्रीडा व्यावसायिकांची परवान्याची माहिती घेण्यात आली व चालू पर्यटन जलक्रीडा हंगामात एक दराच्या माध्यमातून व्यवसाय कसा करता येईल जलपर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षित सेवा कशी देता येईल प्रशासन,पर्यटक व व्यावसायिक यांच्यामधील समन्वय साधण्यासाठी नियोजन करण्यात आले दरवर्षी जिल्ह्यात जलक्रीडा पर्यटनासाठी दहा ते बारा लाखापेक्षा जास्त देशी विदेशी पर्यटक भेट देत असतात यामध्ये प्रामुख्याने जलक्रीडेसाठी मालवण तालुक्यात जलक्रीडेसाठी प्राधान्याने येणाऱ्या पर्यटकांचे प्रमाण जास्त प्रमाणात असून जलक्रीडा हंगाम दरवर्षी प्रमाणे 1 सप्टेंबर 2022 पासून सुरु होणार असून प्रशासन स्तरावर अजूनही उदासीनता आहे जलक्रीडा पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना व त्यांना सेवा देण्याच्या मोठमोठ्या वल्गना करणारे स्थानिक प्रशासन अजूनही निद्रा अवस्थेत आहे त्यामुळे पर्यटन व्यावसायिक महासंघाने सदर विषयी समन्वयकांची भूमिका घेण्याचे ठरविले असून जलक्रीडेसाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुसूत्रतेसाठी तसेच सुरक्षितेसाठी मालवण तालुका जलक्रीडा अध्यक्षपदी श्री मनोज खोबरेकर व मालवण शहरअध्यक्ष श्री राजेंद्र परुळेकर यांची निवड करण्यात आली यामाध्यमातून जलक्रीडा व्यवसायासाठी आवश्यक असलेले प्रारंभ प्रमाणपत्र तसेच सर्वे प्रमाणपत्र ,फिटनेस सटिफिकेट ,इंशुरन्स संदर्भात प्रशासन पातळी वर पाठपुरावा करण्याचे नियोजन करण्यात आले तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागास संपर्क करून प्रायोगिक तत्वावर मालवण तालुक्यात 7 ठिकाणी चालू असणाऱ्या जलक्रीडा कार्यक्षेत्रात पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या जलक्रीडा आघाडीच्या माध्यमातून लाईफ गार्ड ची व्यवस्था उभी केली जाणार असून त्यासाठी आवश्यक ट्रेनींग व परवाना मिळण्यासाठी प्रयत्न केले जाणार असून मालवण तालुक्यात चिवला बीच,दांडी बीच ,कोळंब बीच,सर्जेकोट बीच,तारकर्ली बीच,देवबाग बीच,तळाशील बीच येथे चालू हंगामात सुरु होणाऱ्या वॉटरस्पोट,बनाना,बंपर ,स्पीडबोट,जेटस्की राईड,स्कुबा डायव्हिंग,नोकाविहार ,डॉल्फिन सफर चे बुकींग महासंघा तर्फे एकखिडकीच्या माध्यमातून उपलब्ध केले जाणार असून यासाठी सुरवातीला मालवण बंदर जेटी व दांडेश्वर मंदिर येथे प्रयोगीक तत्वावर एकखिडकी चालू केली जाणार असून त्या माध्यमातून मालवण तालुक्यात येणाऱ्या जलक्रीडेसाठी येणाऱ्या पर्यटकांनां बुकींग करून अधिकृत जलक्रीडा पर्यटनाचा लाभ दिला जाणार आहे यामध्ये पर्यटकांसाठी वेटींग रूम,अत्यावश्यक मेडिकल सुविधा अधिकृत नोंकांची यादी ,वातावरणातील बदलाची सूचना आदी सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत जलक्रीडा व्यवसायिकांच्या व महासंघाच्या माध्यमातून जलक्रीडेसाठी आलेल्या पर्यटकांना दर्जेदार सुविधा देण्यासंदर्भात नियोजन करण्यात आल्याची माहिती पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष श्री विष्णू मोंडकर यांनी दिली यावेळी श्री मनोज खोबरेकर ,श्री राजेंद्र परुळेकर ,शहर अध्यक्ष श्री मंगेश जावकर ,श्री सतीश टिकम सौ .चारुशीला आचरेकर ,श्री श्यामू फर्नाडिस ,श्री रामा चोपडेकर श्री विनायक अन्य जलक्रीडा व्यावसायिक उपस्थित होते .

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

You missed

Solar Energy