पर्यटन चर्चासत्र
0 0
Read Time:4 Minute, 24 Second

कोकण पर्यटन महासंघ अध्यक्ष श्री विष्णू उर्फ बाबा मोंडकर यांच्या अध्यक्षतेखाली तारकर्ली मालवण देवबाग या ठिकाणावरील पर्यटन व्यवसाय तसेच आंबोलीतील पर्यटन व्यवसायिक यांच्यामध्ये पर्यटन वृद्धीसाठी तसेच पर्यटनामध्ये किंवा पर्यटन व्यवसायामध्ये येत असलेल्या समस्या विविध योजना व समुद्राकडील पर्यटन व डोंगरावरील म्हणजेच हिल स्टेशन वरील पर्यटन या दोघांची सांगड घालून पर्यटन व्यवसायाची देवाणघेवाण विचारांची देवाणघेवाण कशाप्रकारे करता येईल याबाबत विचारविनिमय झाला यावेळी आंबोली सरपंच सौ पालेकर तसेच आंबोलीतील 25 ते 30 पर्यटन व्यवसायिक उपस्थित होते त्या बैठकीमध्ये येत्या काळात शासकीय योजनांच्या माध्यमातून पर्यटन व्यवसाय वृद्धी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी म्हणून सर्व पर्यटन व्यवसायिकांनी ग्रामपंचायत स्तरावर एकत्र येत ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपल्या मागण्या जर मांडल्या तर त्या शासनापर्यंत पोहोचू शकतात व आपल्या पर्यटन व्यवसायामध्ये येत असलेल्या अडचणी दूर होऊ शकतात असे मत बाबा मोंडकर यांनी मांडले तसेच येत्या 28 ऑगस्ट रोजी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाकडून पर्यटन विषयक कार्यशाळा ठेवण्यात आले आहे या कार्यशाळेमध्ये सुद्धा पर्यटन व्यवसायिकांनी मोठ्या संख्येने येत संवाद साधणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी सिंधुदुर्ग सावंतवाडी पर्यटन महासंघाचे उपाध्यक्ष काका भिसे यांनी त्यांचे आभार मानले व आंबोली मध्ये असलेल्या जमिनीचा प्रश्न वनविभागाचा प्रश्न व त्यामुळे निर्माण होत असलेल्या समस्या म्हणजेच कर्ज न मिळणे किंवा महाराष्ट्र पर्यटन महामंडळाकडून लायसन न मिळणे यासारख्या समस्या वरती प्रकाश झोत घातला यावेळी मोंडकर यांनी या सर्व समस्या आपण एकत्र येत काही दिवसातच सोडू शकतो व यासाठी आपल्याला हवा तसा जीआर आपण शासनाला मंजूर करण्यास भाग पाडू शकतो यासाठी केवळ आपण सर्वांनी एकत्र येत संवाद साधणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली देवबाग नियुक्ती मालवण या ठिकाणचे पर्यटन व्यवसाय व आंबोलीतील पर्यटन व्यवसायिक यांचा व्हाट्सअप ग्रुप बनवून एकमेकांच्या व्यवसायाची माहिती याची देवाणघेवाण करण्याबाबत निर्णय झाला ज्यामुळे आंबोलीतील पर्यटन व्यवसायिक समुद्रकिनारी असलेल्या पर्यटना विषयी माहिती देतील ज्यामुळे पर्यटक समुद्रकिनारी आंबोलीतून पर्यटनासाठी जातील तर समुद्रकिनारी आलेले पर्यटक आंबोली मध्ये आंबोलीतील माहिती त्या ठिकाणच्या पर्यटन व्यवसायिकांकडून मिळाल्यामुळे आंबोलीला पर्यटनासाठी येतील अशा प्रकारे पर्यटन वृद्धीस वाढ होईल हे व असे अनेक उपाय व निर्णय या सभेमध्ये घेण्यात आले उपाध्यक्ष काका भिसे यांनी यावेळी उपस्थितचे आभार मानले.

आजोळ आरोग्य पर्यटन कोंकण पर्यटन कोकण पर्यटन वार्तापत्र

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

You missed

Solar Energy