training program at sindhudurgsindhudurg paryatan
2 0
Read Time:3 Minute, 2 Second

ऍड.नकुल पार्सेकर


स्थानिक रोजगार निर्मितीसाठी पर्यटन क्षेञात फार मोठ्या संधी असून त्यासाठी स्थानिकांनी सकारात्मक विचार करणे गरजेचे आहे. सरकारी नोकऱ्यावर अवलंबून न राहता सिंधुदुर्ग सारख्या निसर्गरम्य जिल्ह्यात नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करून कृषी पर्यटन, साहसी पर्यटन यासारख्या कल्पना नियोजनबद्ध रित्या राबवल्यास हा आपला सुंदर जिल्हा पर्यटन चळवळीत अग्रेसर राहिल त्यासाठी सामुहिक प्रयत्नाची गरज आहे. पर्यटन व्यवसायिक महासंघाचा यासाठी सक्रिय पाठिंबा राहिल. असे प्रतिपादन पर्यटन व्यवसायिक महासंघ सिंधुदुर्गचे सचिव अॅड. नकुल पार्सेकर यांनी केले.
महाराष्ट्र पर्यटन महासंचनालयाच्या वतीने ओरस येथे आयोजित केलेल्या पाच दिवसाच्या टुरिस्ट गाईड प्रशिक्षणाच्या उदघाटनपर कार्यक्रमात ते बोलत होते.
सुरवातीला उपस्थित प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन करताना पर्यटन संचनालयाचे उपसंचालक श्री हनुमंत हेडे यांनी टुरिस्ट गाईड प्रशिक्षणाबाबत सविस्तर माहिती दिली व भविष्यात या क्षेत्रातील अनेक रोजगाराच्या संधी आणि त्यासाठी अपटडेट राहाण्याचे आवाहन केले.
महाराष्ट्र पर्यटन संचनालय, रत्नागिरीचे प्रादेशिक व्यवस्थापक श्री दिपक माने यांनी पाच दिवसाच्या या प्रशिक्षणासाठी जिल्ह्याभरातून उपस्थित राहिलेल्या प्रशिक्षणार्थीना शुभेच्छा दिल्या.
जिल्हाभरातून पन्नासहून जास्त तरुण तरुणी या प्रशिक्षणात सहभागी झालेल्या असून प्रशिक्षक म्हणून ज्यानी पर्यटन या विषयात डाॅक्टरेट मिळवलेली आहे व जे देशभरात या क्षेत्रातील काम करण्यास उत्सुक असलेल्याना मार्गदर्शन करत असतात ते डॉ. रामकृष्ण कोगाला,आय्.आय्.टि.एम्.
गाॅल्हेर हे अनुभवी प्रशिक्षक मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यक्रमाला पर्यटन व्यवसायिक महासंघाचे सावंतवाडी तालुक्याचे अध्यक्ष, श्री जितेंद्र पंडित, सद्स्य श्री विजय गोंदावळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Happy
Happy
50 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
50 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

You missed

Solar Energy