Konkan Paryatan Mahasangh
0 0
Read Time:5 Minute, 9 Second

बाबा मोंडकर अध्यक्ष पर्यटन व्यवसायिक महासंघ

            पर्यटन विकास आराखडा म्हणजे केवळ कागदावरची आखणी किंवा काल्पनिक चित्र पर्यटन महासंघ करत नाही. तर गावातील वर्तमान स्थिती लक्षात घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांचे भविष्यातले जगणे सुसह्य करण्यासाठी विचारपूर्वक नियोजन करत आहे. प्रत्येक गाव पर्यटनाचा नकाशावर आणण्यासाठी पर्यटन व्यावसायिक महासंघ सज्ज आहे आणि यासाठी गरज आहे ती आपल्या सर्वांच्या सहकार्याची. आत्ताच पर्यटन महासंघाने कोकण जल बाजारात आणले त्याच उद्दिष्ट पैसे कमावणे हा नसुन सिंधुदुर्गजिल्ह्यातील पर्यटन जगापर्यन्त पोहोचवणे हाच आहे. कोकण जलच्या बॉटलवर एक क्यू आर कोड छापण्यात आला आहे. या क्यू आर कोड मध्ये संपूर्ण जिल्ह्याची माहिती दिलेली आहे. जेणेकरून आलेल्या पर्यटकांना योग्य मार्गदर्शन व्हावे.
          पर्यटन व्यवसायीक महासंघ सम्पुर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासाचे रोल मॉडेल तयार करत आहे. याकरिता प्रशासनाच्या सोबत पर्यटन महासंघ प्रयत्न करत आहे.
१ प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीमध्ये जावुन त्यागावातील माहीती गोळा करणे.
२ त्यात्या गावातील भौगोलिक स्थिती नुसार योग्य बदल करुन घेणे.
३ प्रत्येक गावात आज असलेल्या गोष्टी मन्दिर आणि त्याचे पौराणिक किवा ऐतिहासिक महत्त्व, त्या गावात असलेली एखादा ऐतिहासिक वाडा, त्या गावात असलेली बावर, देवराई, किल्ला अश्या इतर गोष्टींची एक वेबसाईट बनवुन त्याचा QR कोड बनवुन प्रत्येक गावाच्या चौकात लावणे. सोबत स्थानिक व्यवसाय आणि व्यवसायिक यान्ची सम्पर्कासह माहिती या QR कोड मध्ये समाविष्ट करणे. असे नाविन्यपुर्ण काम करणाऱ्या ग्रामपन्चायतीना निधि उपलब्ध करुन देण्याचे मा.जिल्हाधिकारी सौ.के.मञुलक्ष्मी यानी मान्यकेले.

             या कार्यक्रमात आठही तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते. सर्वच तालुक्यातील सरपंच तसेच ग्रामसेवकांनी अतिशय उस्फुर्त प्रतिसाद दिला.

            या कार्यात मा.जिल्हाधिकारी सौ.के.मञुलक्ष्मी, मा.श्री.प्रजित नायर मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सिन्धुदुर्ग, मा. श्री. राजेन्द्र पराडकर उप कार्यकारी अधिकारी, मा.श्री. विशाल तनपुरे उप कार्यकारी अधिकारी, श्री.अरुण चव्हाण, गट विकास अधिकारी, श्री. व्हि.एम.नाइक, गट विकास अधिकारी, श्री. जयप्रकाश परब गट विकास अधिकारी श्री. आप्पासाहेब गुजर गट विकास अधिकारी श्री. विजय चव्हाण,गट विकास अधिकारी तसेच भारत पर्यटन, पश्चिम विभागिय कार्यालय मुम्बई, महाराष्ट्र पर्यटन संचानालय, कोकण इतिहास सन्कलन समिती,सिंधुदुर्ग, डिस्कवरी  ऑफ सिंधुदुर्ग, पर्यटण व्यवसायिक महासंघाचे श्री. विष्णू मोन्डकर, अध्यक्ष, ॲड. नकुल पार्सेकर सचिव, श्री सतीश पाटणकर कार्याध्यक्ष, श्री. किशोर दाभोलकर, सोशल मिडिया, श्री.सुधीर नकाशे उपाध्यक्ष वैभववाडी, श्री संजय सावंत उपाध्यक्ष दोडामार्ग, श्री.प्रसन्न उर्फ बाळू देसाई, श्री जितेंद्र पंडित अध्यक्ष सावंतवाडी, श्री.संजय धुरी, अध्यक्ष देवगड, सौ.घारे महिला अध्यक्ष देवगड तालुका,  श्री अविनाश सामंत अध्यक्ष मालवण, श्री.महेश सामंत अध्यक्ष वेंगुर्ला तालुका, श्री संतोष काकडे उपाध्यक्ष कणकवली, श्री.शिवदास मसगे, श्री. मंगेश जावकर, मालवण शहर अध्यक्ष पर्यटण व्यवसायिक महासंघ आपल्या सोबत आहेत.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
100 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

One thought on “आपल्या सर्वाच्या सहकार्याने खर्‍या अर्थाने सिंधुदुर्ग पर्यटन रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करु.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

You missed

Solar Energy