Sea world Project in Sindhudurg
2 0
Read Time:5 Minute, 14 Second

संदीप बोडवे, मालवण


विधिमंडळात अनेकदा हजारो कोटी रुपयांच्या विकास आराखड्यासह कोकणच्या पर्यटन विकासासाठी स्वतंत्र कोकण पर्यटन विकास महामंडळ स्थापन करण्याच्या घोषणा झाल्या. अशा घोषणा सिंधुदुर्गा साठी नवीन नाहीत. दरम्यानच्या काळात सिंधुदुर्गात पर्यटनाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी महत्त्वाकांक्षी अश्या सी वल्ड प्रकल्पाची घोषणा करण्यात आली. त्यांनतर विराट युद्ध नौकेची पर्यटनासाठी निवती समुद्रातील जलसमाधी असो किंवा सबमरीन प्रकल्प. मागील दहा वर्षात अशा एक ना एक प्रकल्पांची शासन कर्त्यानी घोषणा केल्यात. परंतु या घोषणा सिंधुदुर्ग वासियांसाठि स्वप्नांच्या रंजक दुनियेतील स्वप्नच ठरल्या आहेत.

महत्त्वाकांक्षी प्रकल्प गुंडाळले
काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात सिंधुदुर्गचे पालकमंत्री या नात्याने मंत्री नारायण राणे यांनी जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी मालवण तालुक्यातील वायंगणी-तोंडवळी येथे १३९० एकरमध्ये महत्त्वाकांक्षी असा सी-वर्ल्ड प्रकल्प उभारण्याचे निश्चित करून त्यासाठी राज्य सरकारची मंजुरी घेतली होती. प्रकल्पाच्या भू-संपादनासाठी २०० कोटी रुपये मंजूर करून घेतले होते, त्यापैकी १०० कोटी रुपये जिल्हाधिका-यांकडे वर्गही करण्यात आले होते.
मागील काही वर्षात सिंधुदुर्गचा चेहरा मोहरा बदलवून टाकणारे काही महत्त्वपूर्ण प्रकल्प दुर्देवाने रद्द झाले आहेत. या मध्ये प्रामुख्याने सी वर्ल्ड आणि आयएनएस विराट या दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा समावेश आहे. या दोन्ही प्रकल्पांमुळे सिंधुदुर्गचे दरडोई उत्पन्नात कमालीची वाढ होणार होती. जिल्ह्याच्या पर्यटनाचा दर्जा उंचावणार होता. मात्र दोन्ही प्रकल्प आता राजकीय अनास्थेमुळे रद्द झाले आहेत. या दोन प्रकल्पां नंतर आयएनएस गंगा या छोट्या निवृत्त युद्धनौकेला पर्यटनासाठी समुद्रात जलसमाधी देण्याचे विचाराधीन होते. परंतु हा ही प्रकल्प आता बारगळला आहे. केरळच्या धर्तीवर सिंधुदुर्गातील खाड्यांमध्ये एम टी डी सी कडून हाऊस बोट प्रकल्प सुरू करण्यात आला होता. या प्रकल्पावर पाण्यासारखे पैसे खर्च करण्यात आले. काही काळ हा प्रकल्प तारकर्ली सारख्या खाडीत सुरूही करण्यात आला होता. आता हाऊस बोट प्रकल्पही गुंडाळला आहे.

पाणबुडी प्रकल्पाला मुहूर्त सापडेना


सिंधुदुर्गचे तात्कालिन पालकमंत्री, अर्थ राज्य मंत्री दीपक केसरकर यांनी निवती रॉक याठिकाणी पर्यटनासाठी पाणबुडी प्रकल्पाची घोषणा केली होती. यासाठी मंजूर झालेल्या ६५ कोटी रुपयां पैकी २५ कोटी रुपये तात्काळ एमटीडीसी कडे वर्गही करण्यात आले होते. नंतरच्या काळात अधिकाऱ्यांनी दौरे करून या प्रकल्पाचा आढावाही घेतला. तज्ज्ञांकडून हिरवा कंदील मिळाला. त्याचा अहवाल राज्य शासनाला प्राप्त झाला आहे. नुकताच पर्यटन विभागाचे मुख्य सचिवांनी निवती रॉक परिसराचं दौराही केला आहे. मात्र अजूनही या प्रकल्पाला मुहूर्त सापडलेला दिसत नाही.

निवती पाणबुडी जगातील तेरावा
पर्यटन तज्ज्ञांच्या मते, भारताच्या पर्यटन विश्वात नीवती पाणबुडी प्रकल्प हा अॅडव्हान्स टेक्नॉलॉजीचा उत्तम नमुना असेल. जगात हवाई आयलंड – अमेरिका, साऊथ कोरिया, रेड सी – इजिप्त, थायलंड, तुर्कस्थान, मालदिव अशा मोजक्याच १२ ठिकाणी पाणबुडी द्वारे समुद्रात पाण्याखाली पर्यटन केले जात आहे. सिंधुदुर्गात असा पर्यटन प्रकल्प आल्यास पर्यटनाचा दर्जा उंचावण्यास मदत होणार आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
33 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
67 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

You missed

Solar Energy