2 0
Read Time:5 Minute, 11 Second

श्री विष्णू मोंडकर अध्यक्ष,पर्यटन व्यावसायिक महासंघ

पर्यटन व्यावसायिक महासंघ तर्फे राज्यात विशेषतः कोकण विभागात धार्मिक व ऐतिहासिक पर्यटन क्षेत्रात वाढ होणेसाठी राज्याच्या रोपवे पॉलिसी 1955 मध्ये बदल करणे संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस व सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री रविंद्रजी चव्हाण यांच्या कडे पर्यटन व्यावसायिक महासंघा तर्फे पाठपुरावा करण्यात आला होता
महाराष्ट्र राज्यात रायगड रोप वे प्रोजेक्ट होऊन 20 वर्षापेक्षा जास्त काळ होऊनही अन्य एकही रोप वे प्रोजेक्ट झाला नाही.राज्यात रोप वे प्रकल्पानां बॉम्बे रोप वे ऍक्ट 1955 द्वारे मंजुरी मिळत आहे.सदर ऍक्ट सेक्शन 3 नुसार शासन निर्णय टी आर एम 5-82-/395(आर 4ए )दिनांक 7डिसेंबर 1984 नुसार एरिअल रोपवे ऍडव्हायजरी बोर्ड ची स्थापना झाली असून या मधील सर्व अधिकारी हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आहेत रोप वे प्रकल्प होण्यासाठी रोपवे प्रमोटर व शासन यामध्ये समन्वयाचे काम करतात.रोप वे प्रोजेक्ट साठी अर्ज सादर केल्यानंतर ही कमिटी रोप वे प्रोजेक्ट साठी शासकीय फी भरून 21 केंद्र व राज्यसरकारच्या विभागाची नाहरत दाखला आणण्यासाठी रोप वे प्रमोटर ला पत्र दिले जाते यात अनेक वषें नाहरकत दाखला मिळविण्यासाठी कालावधी लागतो त्यामूळे रोप वे प्रमोटर प्रोजेक्ट उभारू शकत नव्हते
या मध्ये आवश्यक बदल होऊन रोप वे प्रोजेक्ट ज्या भागात उभारला जात आहे त्या मार्गामध्ये असलेल्या विभागाच्या नाहरकत दाखल्याची मागणी करण्यात यावी अन्य विभागाच्या नाहरत दाखल्याची मागणी रद्द करावी.ऍडव्हायजरी बोर्ड मध्ये प्रवासी वाहतूक रोप वे परवानगी देताना राज्याच्या साहसी पर्यटन धोरणाप्रमाणे कार्यवाही व्हावी राज्यातील सर्व रोप वे प्रकल्प हे धार्मिक व ऐतिहासिक स्थळे जोडणारे असून वरील नियमांची शिथिलथा आल्यास राज्यात रोप वे प्रोजेक्ट उभारण्यास मार्ग मोकळा होऊन राज्यातील ऐतिहासिक व धार्मिक पर्यटन मध्ये वाढ होईल यासाठी पर्यटन व्यावसायिक महासंघातर्फे पाठपुरावा करण्यात आला होता यावर हवाई रज्जुमार्ग मंडळाच्या मंगळवार दिनांक १४/१२/२०२२ रोजी मा.मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग मुंबई यांच्या उपस्थित झालेल्या मिटींग मध्ये राज्यातील ११ रोप वे प्रोजेक्ट प्रकल्प मार्गी लागण्यासाठी मा.उप मुख्यमंत्री,सार्वजनिक बांधकाम मंत्री महोदयांच्या सुचनेप्रमाणे पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या मागणी नुसार रोप वे पॉलिसी मध्ये बदल करण्याचे ठरविण्यात आले असून या संबंधी प्रस्ताव मा.बांधकाम मंत्री यांच्याकडे हवाई रज्जूमार्ग मंडळाच्या माध्यमातून सादर करून सदर प्रश्न मार्गी लावण्यात येणार आहे .या विषयी पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या माध्यमातून मा.उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस तसेच मा.सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री.रविंद्रजी चव्हाण यांचे पर्यटन क्षेत्रातील ऐतिहासिक बदलासाठी आभार मानण्यात येत असून सदर विषय मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र भाजपा वैद्यकीय आघाडी अध्यक्ष डॉ.श्री.अमेयजी देसाई यांचे ही महासंघास सहकार्य लाभले आहे अशी माहिती पर्यटन व्यावसायिक महासंघ अध्यक्ष श्री विष्णू मोंडकर यांनी दिली आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
100%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

2 thoughts on “महाराष्ट्र रोपवे पॉलिसी मध्ये होणार आमूलाग्रह बदल पर्यटन महासंघाच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाममंत्री यांचे मानले आभार

  1. रोप वे समितीत कॉलेज ऑफ़ मिलिटरी इंजि. पूना, चा एक विशेष सदस्य असावा, कारण भगवान न करे, जर कधी अपघात झाला तर “क्वालिटी ऑडिट” मध्ये त्रासदायक होणार नाही, आणि शेवटी बचाव कार्यात सशस्त्र सेनाच वायुसेने बरोबर येणार आहे. शेवटचे परीक्षण मिलिटरी आणि /किंवा एल आर इन services किंवा BVQI, कडून झाली पाहिजे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

You missed

Solar Energy