1 0
Read Time:6 Minute, 19 Second

प्रा.समीर तारी, कुडाळ

आमचो सिधुदूर्ग जिल्हो गोयाकच जोडून घेवक होयो. नाय तरी आता बघा मुंबय भरली नवी मुंबई तयार झाली मगे पनवेल भरला नवीन पनवेल तयार झाला तसा नायतरी आत न्यु गोवा तयार झालाच आसा तेतूत आमकाय घेतल्यानी तर..

आता आपल्या कोकणात सगळीकडेच मोबाईल टॉवर झाले पण कीती टॉवराक रेंज येता हया त्या टॉवरवाल्यांकाच ठावक. असो आज प्रत्येक कोकणकाराकडे मोबाईल आसतच आमचो तुकलो नाना आणी बांधावयलो आप्पा पण मगे मागे कशे रवतले. दोघायनी कसलो तो एन्ड्रॉयड काय म्हणत तो फोन घेतल्यानीच. आधीच कोकणी माणूस चिकीत्सक तेच्यात मोबाईल वापरुक लागल्यापासून एखाद्या गोष्टीचो कसो कीस पाडूचो हया काय सांगूक होया. आणि तेच्यात कायतरी समाजीक इषय आसलो तर मगे बघूकच नको.

11 डिसेंबराक मोपा ईमानतळाच्या उदघाटनाचे बातम्ये आणि व्हीडीयो तुकल्यानानान आणि बांधावयल्या आप्पान मोबाईलार बघल्यानी आणि दोघवले पिसाळलेच.. कारण दोघय चिपयेच्या उदघाटन कार्यक्रमाक दुस-या रांकेत बसलेले त्यामुळे सगळयांची भाषणा एकान घराक येताना छाती फुगवनच भायर सरले बिचा-यांका वाटलेला चिपी इमानतळ सुरु झाला म्हणजे स महयन्यात आपलो सिधुदर्गाचो इकास जातोल. पण आज पर्यंन्त कोणाच्याच कोंब्यान उजवाडाक नाय आमी आसव थयच आसव. त्यावेळी जेनी जेनी सांगीतलेला चिपी इमानतळ सुरु झाला आता सगळा सुधारताला नवनवीन प्रकल्प येतले आमच्या मालवण्यांका रोजगार गावतोला आणि मॉप मॉप काय काय सांगीतलेल्यानी तेच आता मोपाच्या इमानतळाच्या उदघाटना नंतर सांगूक लागले सिंधुदुर्गाच्या ईकासाची प्रवेशव्दारा उघाडतली. हया वाचून बांधावयल्या आप्पाचा टाळक्याच सटाकला. तेच्या म्हणन्यानूसार आमचा कोकणातला ईमानतळ चोरुन गोयवाल्यानी नेल्यांनी आमच्या फुढा-यांच्या तोंडाक पानापूसल्यानी आणि कायता डोमॅस्टीक इमानतळ कोकणात केल्यानी नी आम्ही नाचतव आता ईमानतसून मुमबय जातलव म्हणान. आम्ही जावचा ठरवतव त्या दिवसाक हेंच्या इमानाक धाड भरता ता उडनाच नाय त्या परीस आमचो लाल डबो बरो. आणि हया बोलण्यारसुनच दोघांची कोकणाच्या इकासार पारार महाचर्चा सुरु झालीच. मगे अण्णा, पांडूतात्या,बाबली हे आपली मता मांडूक तयार होतेच.

तुकल्यानानान पयलोच प्रश्न इचारल्यान आमचो पर्यटन जिल्हो, आमका देवाच्या दयेन भरभरुन निसर्ग, समुद्र कीनारे आमच्याकडे जूनी जूनी मंदीरा सगळा काय आसानय आम्ही पर्यटनात मागेच कशे रवलव. अण्णांनी लगेचच ठेवणीतला उत्तर दिल्यानीच.. अरे आमच्या पुढा-यांका इतक्या वर्षात मुंबई ते गोवा रस्तो करुक जमना नाय ते काय डोंबाल इकास करुन दाखयतले. लगेच पांडूतात्या बोललोच मंत्रालयात मायततरी आसा काय की आमचो जिल्हो महाराष्ट्रात आसा तो. हया आयकान गोयच्या मायकलान लगेच आगीत त्याल टाकल्यानच अरे आमच्या नातवांका पयले दुसरीत आसतानाच कामपुटर दीलल्यानी. आता तो नेसलेकंपनेत चाळीस हजारार कामाक आसा.आमच्याकडे पयले कामाक गोयकारांकाच घेतत मगे काय जागा रवलेच तर मजुरेर दुस-यांका घेतत. तुमच्याकडे कसा काय आसा ? झाला असा बोलल्यार आग भडाकलीच.

बाबली कधी नाय तो बोलाक लागलो आमच्या कडे बंद पडलेली एमआयडीसी, फक्त नावाक ऊरलेलो पर्यटन जिल्हो, खडयात आसलेलो रस्तो आजूनय डोळे झाकून रवलेली लोका, आणि सगळयात अभिमानाची गजाल म्हणजे जगातल्या सगळयाच राजकीय पक्षाचे नेते आसत जे बरोबर कणये घालून कोंबे झुजयतत. हया तुमच्या गोयत आसा काय बोल ? मायकल सरळ बाबलीच्या पाया पडलो आणी कदंबा गाडयेत जावन बसलो.

हया आयकान तुकल्यानानान सुरसुरा सोडल्यान आमचो सिधुदूर्ग जिल्हो गोयाकच जोडून घेवक होयो. नाय तरी आता बघा मुंबय भरली नवी मुंबई तयार झाली मगे पनवेल भरला नवीन पनवेल तयार झाला तसा नायतरी आत न्यु गोवा तयार झालाच आसा तेतूत आमकाय घेतल्यानी तर..
आणि गोयात जे भैया एजंट आसत ते मिनी गोवा म्हानान गोयातसून वॉटर स्पोर्टाक लोकांका हयच हाडतत.
आणि आमचे चाकरमानी पोरगे जशे पनवेल विरारातसून मुबयक जातात तेशे हयसून गोव्यात पण जातातच मा.
नाय तरी सध्या जो तो सांगताच आमचो इकास होवक नाय, आमका पाणि नाय आम्ही चललव तसा आता आमीय गोयात जावया मगे नीदान आमच्या जिल्हयात पर्यटन प्रकल्प येतीत, माणसांका वापरुचे रस्ते, उद्योग येतीत आमच्या पुढल्या पिढयेक तरी रोजगार गावात..

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

You missed

Solar Energy