0 0
Read Time:5 Minute, 31 Second


प्रा.समीर तारी, कुडाळ


सगळ्या पेपरात, व्हाटसअपार, जयथय एकच गजाल टोल आणि टोल.मगे आमचो तुकलो नाना आणि बांधावयलो आप्पा तरी मागे कशे रवतले. दोघानीय आपल्या अनुभवातसून निष्कर्ष काढल्यनीच. तो असो आपल्या पर्यटन जिल्हयाक मॉप वरसा झाली पण पर्यटन प्रकल्प काय होनत नाय. हायवेवाल्यांनी उपाय काढल्यनी, जिल्ह्यातल्या लोकांका, पर्यटकांका हायवेक धबधबे, नदीतसून गाडी चालवना आणि जेका पाण्याचा भय वाटता तेका स्वतः च्या गाडयेत बसानच होडयेचो अनुभव देणारो असो हायवे तयार करायचो. इतक्या सगळा फक्त ९०₹ टोल भरुन देतले म्हणजे काय खावचा काम आसा.
आता हि सगळी गजाल तुकल्या नानाची काय असा ती वाचाच. ….
एकदा तुकलो नाना आणी बांधावयलो आप्पा शीनेमा बघूक आपल्या चारचाकी गाडयेन कुडाळ ते कणकवली प्रवासाक भायर सरले. कुडाळात राज हॉटेल कडल्या बॉक्स वेलातना गाडी भितुत आणी भायर काढतांना वरसून पडणा-या पाणयान गाडी एकदम चकाचक झालली ह्या बघून दोघयले खूश होतत. काय हायवे वाल्यांनी काळजी घेतल्यांनी हा म्हणतत. पंपार गाडयेत पेट्रोल भरतत जवळच असलेल्या कट मधसून तुकलो गाडी कणकवलीच्या दिशेन घेयतच असता ईतक्यात वाडीच्या दिशेन मुंबईकडे जाणारो कंटेनर कट मारून जाता. तो पर्यंन्त तुकल्याच्या गाडयेचा सालपाट गेलला आसाता. मगाशी हायवेवाल्यांका दीलले आर्शीवाद शापात बदललेले आसतत. डेपोकडला पूल काय मस्त बांधल्यांनी म्हणत पुढचो प्रवास सुरुच आसता तो पर्यंन्त गाडी पावश्येत पोचता तर काय रस्त्याचा तळाच झाल्ला.रस्तो बंद.. दोघय आपल्या खास मालवणी शैलीत अगदी सरकार पासून कॉन्ट्रक्टर पर्यंन्त संगळयांचो उध्दार करुन मोकळे जातत. तासाभरात पाणी कमी झाल्यार फुडलो प्रवास सुरु करतत. पणदुराक हायवेर आसलेल्या दुकानार गाडयेत बसानच भजी आणी चाय खातत आणि पुढे निघतत दोघय नेमके खय ईलव हेचोच ईचार करीत आसतत कारण कुडाळातना भयार पडताना चारचाकयेतसून भायर पडलव आणि आता होडयेत कधी बसलव हयाच तेंका कळना नाय. तुकलो नाना आणि बांधावयलो आपा एकमेकांक चिमटो काढतत तर खराच होडयेत नाय तर गाडी पाण्यातसून जाता ता लक्षात येता. पुढे खोतांचो बाळगो बुलेटवरसून जायत आसता तुकल्यानानाच्या गाडयेमुळे तेका अभिषेक होता. थय गाडी थांबवतत तेवा तेंका समाजता ओरोस येवन गेला. वायच पुढे गेल्यास एकमद चार पाच ट्रक आणि एक येस्टी हेच्या समोरसुन हिवाळे रस्त्यासून कसालच्या दिशेन झापझाप जातत तुकलो कशीबशी गाडी संभाळता आणि पुढे ओसरगावच्या टोलनाक्यार गाडी येता तर थय टोळ घोळको करुन होतेच तुकल्या नानाक अडयल्यानी आप्पाक प्रश्न पडलो अजून टोल सुरु नाय नी हे टोळ हय काय करतत? लगेच टोळांनी तुकल्याच्या गाडयेचे चुको काढल्यानी आणि फोटू काढून चार हजार दंड होतोला म्हणालो तुकलो हुशार सरळ सांगून मोकळो वो सायबानू मागच्या टायमाक पाचशे रुपये दिलय तेची आजून ऑनलाईन पावती येवक नाय ती ईली काय हो दंड देतेय आणि काय चमत्कार सगळे टोळ भूरकन उडान गेले.
परत एकदा राधानगरीवाल्यांची अमृततुल्य चाय पितत आपा मात्र चायवाल्याक आमची जत्रेतली चायच एक नंबर. असा ठणकावन सांगूक इसारना नाय.
दोघांत पुढल्या प्रवासाक लागतत. आपाक डुलकी येता.
गाडी फूढे जायत आसता.इतक्यात गाडी हलता आपाक जाग येता आणि आपा तुकल्या नानाकच गाळी घालून इचारता अरे मेल्या कुणग़्यातसून गाडी खेका चलयत ? मगे थांबान बघतत तर काय वागदा ईला. सबन चिखलान रंगलेली गाडी कणकवलेच्या सर्व्हिस रोडार येता. समोरचा सगळा बघतत आणि दोघय भिरभिरतच. समोर आमबोले पेक्षा भारी धबधबे हायवे वाल्यांनी केल्ले. आणि धबधब्यात सुन गाडीय जाता.असा आमबोलीक नाय. हायवे वाल्यांनी परत एकदा गाडी चकचकीत करुन दील्यानी म्हणान तुकलो नाना जाम खुष.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
100 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

You missed

Solar Energy