0 0
Read Time:3 Minute, 16 Second

गांवकरवाडा, मालवण येथे ४ जून २००९ या वर्षी श्री देवी कुलदेवता कळम्माई देवी मंदिर स्थापना करण्यात आली आहे. कळम्माई देवी ही मूळ कोल्हापूर राधानगरी येथील. या देवीचे देवीचे भक्तगण सरदार गावकर घराणे जे विजयी पताका रोवत मालवणला पोहचले अन मालवणवासी झाले.

मालवण गावकरवाडा येथे चव्हाण गावकर यांचे कुळाचाराचे स्थान. कुळाचाराच्या पाषाणावर गावकर मंडळींची अपार श्रद्धा भक्ती.

२००६ च्या दरम्यान मालवणच्या ग्रामदैवतांचे मानकरी वसंतराव गावकर यांना दृष्टांत झाला. डोंगर, धबधबा, घनदाट जंगल त्याठिकाणी पुरातन मंदिरातील देवीची मूर्ती काळम्माई देवीची वसंतरावांना साक्षात्कारातून जणू सांगत होती मालवणात माझी स्थापना कर.

हा स्वप्न दृष्टात वसंतराव यांनी सर्वाना सांगून घराण्याच्या कुलदेवतेला भेटायचा ठरले.

कोल्हापूर राधानगरी येथील वाकीघोलच्या जंगलात काळम्माई आईच्या दर्शनाला जाण्यासाठी रामकृष्ण गावकर, अशोक हडकर, उदय गावकर, सीताकांत गावकर व अन्य सहकाऱ्यांसोबत वसंतराव निघाले.

काळम्माई देवीच्या मंदिरात पोहचल्यावर सर्व नतमस्तक झाले. वसंतराव यांनी पूर्वनियोजन करून एक कारागीर सोबत घेतला होता. त्याने देवीचे चित्र रेखाटले. त्यानंतर सर्व घरी परतले. त्या कारागिराने वसंतराव यांच्या सांगण्यानुसार सिंहावर आरूढ झालेल्या काळम्माई देवीची प्रतिकृती दगडात साकारली. सुमारे अडीज फूट उंच असणारी ही मूर्ती चतुर्भुज आहे. तिच्या एका हातात त्रिशूळ, दुसऱ्या हातात तलवार, तिसऱ्या हातात डमरू तर चौथ्या हातात जल वाटिका अशा रुपात मूर्ती आहे. या मूर्तीची स्थापना गावकरवाडा येथील कुळाचार मंदिरात झाली. मंदिरासाठी वसंतराव गावकर यांनी आपल्या मालकीची दोन गुंठे जमीन विना मोबदला दिली आणि त्या जमिनीत कळम्माई देवीचे मंदिर उभारले गेले.

आज वसंतराव हयात नाहीत. मात्र हा संपूर्ण इतिहास वसंतराव यांचे पुत्र हरीश यांना अगदी स्पष्टपणे ज्ञात आहे. डोळ्यासमोर आहे.

एकूणच श्री देवी कुलदेवता कळम्माई मंदिरात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात साजरा होतो.

अमित खोत, मालवण

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

You missed

Solar Energy