World Class Destination - Destination Sindhudurg

सिंधुदुर्ग जिल्ह्याचा संक्षिप्त इतिहास


भारत सरकारने ३० एप्रिल १९९७ रोजी देशातला जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर केला. शासकीय मान्यता मिळालेला देशातील हा पहिला पर्यटन जिल्हा ठरला. आता तर त्यास जगातील सर्वोत्कृष्ठ म्हणून नामांकनही प्राप्त झाले आहे. परंतु पर्यटनाच्या दृष्टीने या भूमित येणाऱ्या सिंधु भूमिवर प्रेम करणाऱ्या त्यांच्याबरोबर संवाद साधणे व तो साधून त्यांना इथल्या देवदेवता, परंपरा, लोककला, अश्या शेकडो आयामांची ओळख करून देणे व हे समजून घेतल्यावर पुन्हा त्यांच्या पाऊल खुणा या लाल मातीवर पुन्हा पुन्हा उमटाव्यात हाच आमचा उद्देश आहे. आम्ही सिंधुभूमिचा शिलालेख कोरतो आहोत. यात इतिहासाचे ज्ञान व वर्तमानाचे भान असुन भविष्याचे शिल्प कोरत आहोत. यासाठी पर्यटन व्यावसायिक महासंघ कोकण, डिस्कव्हरी ऑफ सिंधुदुर्ग, इतिहास संकलन समिती सिंधुदुर्ग, कोकण इतिहास परिषद सिंधुदुर्ग, माउंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिेस्ट्रिक्ट व सर्व सिंधुपुत्रांसह अनेक हितचिंतकांची मन व सहकार्यासाठी सदैव तत्पर असलेल्या त्यांच्या हातांनीच हे कार्य सिद्धीस जाणार आहे. यासाठी “बा म्हाराज्या रवळनाथ, “ आये माते मावशी सातेरी,” राखणदार वेतोबास घातलेला तुमचा गाऱ्हाना आमका आशिर्वाद देताला, तेव्हां ह्यों शिलालेख तुमच्या हाती सोपवतवं.” कवी डॉ. वसंत सावंतानी जी हाक तुमका मारल्यानी तीच पुन्हा आम्ही तुमका मारतव………

Aanganewadi

श्री देवी भराडी, आंगणेवाडी

            आंगणेवाडीच्या यात्रेची तारीख जाहीर झाली, की महाराष्‍ट्राच्या कानाकोप-यातून नव्हे, तर परराज्यांतूनही हजारो भक्त दोन दिवसांच्या त्‍या यात्रेसाठी सिंधुदुर्गात दाखल होतात. लाखो भक्तांची मांदियाळी फुलून जाते.      कोकणातील प्रत्येक गाव आणि प्रत्येक गावाचे दैवत वैशिष्टपूर्ण आहे. आंगणेवाडी ही मसुरे गावातील वाडी. मालवण तालुक्यातील सर्वांत मोठा गाव म्हणून मसुरेची ओळख आहे. आंगणेवाडीची अनेक वैशिष्ट्ये सांगता येतील. तेथील यात्रा एवढी झपाट्याने सर्वदूर का झाली याचे अनेक कंगोरे आणि उदाहरणे देखील आहेत.

सिंधुदुर्ग किल्ला

          शिवाजी महाराजांच्या आरमारात या किल्ल्याला फार महत्त्व होते. किल्ल्याचे क्षेत्र कुरटे बेटावर ४८ एकरावर पसरलेले आहे. तटबंदीची लांबी साधारण तीन किलोमीटर आहे. बुरुजांची संख्या ५२ असून ४५ दगडी जिने आहेत. ह्या किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या काळातील गोड्या पाण्याच्या दगडी विहीरी आहेत. त्यांची नावे दूध विहीर, साखर विहीर व दही विहीर अशी आहेत. या किल्ल्याच्या तटबंदीच्या भिंतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी तीस ते चाळीस शौचालयाची निर्मिती केली आहे. या किल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांचे शंकराच्या रूपातील एक मंदिर आहे. हे मंदिर इ.स. १६९५मध्ये शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी बांधले.

राजवाडा सावंतवाडी

राजवाडा सावंतवाडी

सावंतवाडी राजवाडा सिंधुदुर्गातील एक महत्वाचे पर्यटन स्थळ ओळखले जाते. सावंतवाडी हि स्वातंत्र्यपूर्व काळातील सावंतवाडी संस्थानाची राजधानी. येथे भोंसले घराण्याची सत्ता होती. राजवाड्याची बांधणी खेम सावंत भोसले संस्थानांनी १७५५-१८०३ या काळात केली. हा राजवाडा सध्या तीन भागात विभागला गेलेला आहे. सध्याच्या राजघराण्यातील लोकांचे राहण्याचे ठिकाण, राज दरबार आणि म्युसिअम. सावंतवाडी शहरातील हे सुंदर पर्यटन स्थळ असून मुंबई,पुणे, तसेच कोल्हापूर येथून महामार्गाने येथे पोहोचता येते 

श्री देव कुणकेश्वर देवगड

श्री क्षेत्र कुणकेश्वर…. कोकणातील एक पवित्र तिर्थक्षेत्र…अतीप्राचीन काळापासुन येथील कणकेच्या राईमध्ये वास्तव्य करुन असलेल्या शंभुमहादेवाची ही भुमी… कणकेच्या बनात असलेला ईश्वर म्हणजेच कुणकेश्वर… देवावरुन गावाचे नाव सुद्धा कुणकेश्वर असेच प्रचलीत झाले. सुमारे ११०० व्या शतकापासुन प्रसिद्धीला आलेले हे स्थान म्हणजे कोकणातील धार्मीक व ऐतिहासीक सौंदर्याचा मुकुटमणीच म्हणावा लागेल. कुणकेश्वर मंदिरा इतके प्राचीन भव्य देवालय कोकणात इतरत्र कुठेच नाही. पुणे, मुंबई, कोल्हापुर या शहरांशी देवगडहुन अवघ्या १८ कि.मी. अंतरावर कुणकेश्वर हे गाव आहे.एसटी थांबते तेथून अवघ्या ५-७ मिनिटांच्या अंतरावर असणार्या मंदिराचा कळस लक्ष वेधून घेतो.ऐन किनार्याशी असणार्या उंचवटयावर उभारलेल्या या मंदिरचा सागरतटाकडील भाग भक्कम बांधीव तटाने सुरक्षित राखला आहे. ८-९ मीटर उंचीच्या या तटावर असणार्या सपाट जागेवर मंदिर आहे. मंदिराचा परिसर २२-२४ मीटर उंचीच मंदिर आहे. मंदिराचा परिसर तटाने परिवेष्टित तर आहेच, पण खाली जांभ्या दगडांची फरशीही आहे. अशा या कुणकेश्वर मंदीराचा इतिहास सुद्धा तितकाच प्राचीन, रोमांचकारी आणि रहस्यमय असा आहे.

waterfall Sindhudurg

Gaorai

Gaorai is a small village located in the Sindhudurg district of Maharashtra, India. It’s known for its natural beauty, with lush green forests, rolling hills,

Read More »
रवळनाथ

श्री देव रवळनाथ

लोकदेव क्षेत्रपाळ श्री रवळनाथ लोकदेव क्षेत्रपाळ श्री रवळनाथ ही कथा कोकणातील रवळनाथ हे शिवाचेच एक रूप. स्वभावाने उग्र व वृत्तीने लढाऊ म्हणजे हा मूळ यक्ष

Read More »
देवगड किल्ला

पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याला केंद्र सरकार ने दत्तक घेतल्याबद्दल राज्य व केंद्र सरकार चे अभिनंदन .जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रात क्रांतिकारक बदलाची महासंघास अपेक्षा

श्री विष्णू मोंडकर ,जिल्हाध्यक्ष .पर्यटन व्यावसायिक महासंघ सिंधुदुर्ग राज्यसरकारने १९९९ साली पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा जाहीर केला परंतु जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी गेल्या दोन दशकांपेक्षा

Read More »

नेरूरचा कलेश्वर

सतीश य. पाटणकर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यापासून पाच कि.मी. अंतरावर असलेल्या नेरूर गावातील श्रीदेव कलेश्वर मंदिर हे प्राचीन मंदिरापैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ

Read More »
देवराई जंगलाचा समृद्ध भाग

देवराई

देवराई हा जंगलाचा समृद्ध असा भाग किंवा वेगळे असे एक जंगल होय. देवराई नावाचा अर्थ देवाच्या नावाने राखलेले व पवित्र समजले जाणारे वन. इंग्रजी भाषेत

Read More »
Snorkeling

स्नॉर्कलिंग, मालवण

वालावल बॅक वॉटर

श्री लक्ष्मीनारायण,वालावल

श्री देव रामेश्वर

फ्लेमिन्गो @ दांडी बीच

रापण

पारंपारिक रापण व्यवसाय

आमचे मार्गदर्शक

माजी डायरेक्टर पर्यटन संचनालय भारत सरकार

सौ.निला लाड

माजी संचालक पर्यटन मंत्रालय भारत सरकार 

श्री.उदय कदम 

महाराष्ट्र पर्यटन ट्रॅव्हल एजंट असोसिएशन 

श्री.मानसिंग पवार 

 

Ramchandra-Warak

श्री. रामचंद्र वरक 

पर्यटन व्यवसायिक महासंघ

अध्यक्ष श्री.बाबा मोंडकर   9421153035

कार्याध्यक्ष: श्री.सतीश पाटणकर  855180999

सचिव: ऍड नकुल पार्सेकर     9422374205

खजिनदार:श्री.गुरुनाथ राणे 

श्री. किशोर दाभोलकर, सोशल मिडिया अध्यक्ष   9404347199

पर्यटन व्यवसायिक महासंघ रत्नागिरी

रत्नागिरी जिल्हाध्यक्ष  श्री. संजय काशीद,  95521 17820

श्री.जितेंद्र पंडित अध्यक्ष सावंतवाडी तालुका   8087725255

श्री.अविनाश सामंत  अध्यक्ष मालवण तालुका   9404172197

कोंकण पर्यटन महासंघ

कोकण संघटक श्री.संजय नाईक      9423963175

Tourist Destination

How to reach

Imp Link

Historical Places

  • Tarkarli Beach
  • Devbag Watersports
  • Chivla Beach
  • Tondavli beach 
  • Aachara Beach 
  • Kunkeshwar Beach
  • Mithmumbari Beach
  • By Road NH 66
  • By Train Konkan Railway
  • By Air @ Chipi Airport 
  • By Air @ Mopa International Airport
  • SIndhudurg Fort
  • Vijaydurg fort
  • Devgad Fort
  • Sarjekot Fort
  • Ranganagad
  • Vetalgad
  • Mahohar mansantoshgad