1 0
Read Time:6 Minute, 59 Second

संदीप बोडवे

सागरी ठेवा जपून शास्वत पर्यटन प्रकल्प यावेत: सी वल्ड मागणी जोर धरतेय.

सिंधुदुर्गला १२१ किलोमीटरची समृद्ध किनारपट्टी लाभली आहे. जैव विविधतेचे संपन्न खाड्या आहेत. सागरी किल्ले आहेत. मालवणच्या सागरी अभयारण्यासारखे पाण्यातील नंदनवन आहे. निवती रॉक सारखी अद्भुत सागरी बेटे आहेत. या सर्वांच्या जोडीला मालवणी संस्कृती आणि परंपरेचा वारसा लाभला आहे. सिंधुदुर्गच्या पर्यटनाचा पाया भक्कम करण्यासाठी निसर्गाने आपलीं जबाबदारी चोख बजावली आहे. प्रश्न उरतो शासनकर्त्यांचा. शासन कर्त्यांनी खरचं आपली जबाबदारी पार पाडली आहे का? सिंधुदुर्गला नक्की काय हवय याचा त्यांनी कधी विचार केलाय का?

मालवणचे सागरी अभयारण्य जपले पाहिजे

राज्याच्या किनारी क्षेत्रातील पहिल्या सागरी संरक्षित क्षेत्रामध्ये ‘मालवण सागरी अभ्यारण्या’चा समावेश होतो. याठिकाणी असलेल्या दुर्मिळ जैवसंपदे मुळे १९८७ साली मालवण सागरी परिक्षेत्राला सागरी अभयारण्याचा दर्जा देण्यात आला. या सागरी अभयारण्याचे एकूण परिक्षेत्र २९.१२ चौ.किमी आहे. त्यामधील साधारण २५.९५ चौ.किमीचे कवच (बफर) क्षेत्र आहे. तर अभयारण्याच्या गाभा क्षेत्रात (कोअर) सिंधुुुदुर्ग आणि पद्मगड किल्ल्यांचा समावेश होतो. या भागामध्ये मोठ्या प्रमाणात मासेमारी आणि पर्यटनाच्या आधारे होणारे व्यवसाय केले जातात. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून स्थानिकांकडून अभयारण्याची सीमा आणि पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्राबाबत आक्षेप नोंदवले जात आहेत. त्यामुळे आता ‘मॅंग्रोव्ह सेल’ने या अभयारण्याच्या सीमेबाबत पुनर्विचार करण्याचा निर्णय घेतला आहे. शास्वत पर्यटन आणि मत्स्य अधीवासासाठी महत्वपूर्ण असलेला निसर्गदत्त ठेवा प्रत्येकाने जपला पाहिजे.

कृत्रिम प्रवाळ बेटांची निर्मिती

मुख्य म्हणजे सिंधदुर्गच्या किनारपट्टीचा पर्यटनाच्या माध्यमातून विकास करावा हे निच्छित आहे. येथील समुद्र आणि खाडीचे वैभव अनुभवण्यासाठी सर्वच आतुर आहेत. मालवणच्या पाण्याखाली विविध कोरल्स, प्रवाळ, समुद्री शैवाल, रंगीबेरंगी मासे, अंदभुत जीवसृष्टी सह असलेले स्वर्गीय नंदनवन पाहण्यासाठी सर्वच आसुसलेले असतात. हा पाण्याखालील ठेवा जपणे शासनाची पहिली प्राथमिकता राहिली पाहिजे. अनिर्बंध हस्तक्षेपामुळे दुर्मिळ सागरी जैव संपत्तीला धोका निर्माण झाला असतानाच येथे येणाऱ्या पर्यटकांना पाण्याखालील सौंदर्य निरंतर अनुभवता आले पाहिजे हे पाहण सुद्धा तितकेच गरजेचे आहे. यासाठी समुद्रात ठिकठिकाणी कोरल गार्डन, आर्टिफिशल रीफ तयार करणे गरजेचे आहे. निवति सारख्या समुद्रात नौदलाची निवृत्त झालेली एखादी बोट बुडविल्यास त्या ठिकाणी स्कुबा डायव्हिंगचा सुंदर स्पॉट तयार होऊ शकतो. त्याच प्रमाणे कुणकेश्वर, विजयदुर्ग, आचरा, वेंगुर्ला आदी ठिकाणच्या समुद्रात लहान कृत्रिम प्रवाळ बेटे तयार केल्यास या भागातही सागरी पर्यटनास वाव मिळणार आहे. यामुळे मालवणच्या सागरी अभ्यारण्यावर होणारा ताण कमी होऊन पर्यटनाचे विकेंद्रीकरण शक्य होणार आहे.

खाड्यांमध्ये पर्यटनाला चालना मिळावी
सिंधुदुर्गात अनेक समुद्री खाड्या आहेत. या खड्यांकिनारी निसर्गा बरोबरच जीवनशैली नांदत आहे. या समृद्धीचा या भागातील पर्यटनाला चालना देण्यासाठी मोठा उपयोग होऊ शकतो. बऱ्याच खाडी किनारी सध्या जोड रस्त्यांची संमस्या आहे. अशा ठिकाणी बंधारा कम रस्ता होणे आवश्यक आहे. बऱ्याच खाड्या नदी मुखाशी गाळाने भरल्या आहेत. हा गाळ काढल्यास याठिकाणी बोटिंग आणि छोटे वॉटर स्पोर्टस् करता येऊ शकतात. अनेक खड्यांमधे कांदळवन सफरीला चालना देण्यासाठी खाडी किनारी जेटी, कांदळवनात फिरण्यासाठी लाकडी पदपथ पक्षी निरीक्षणाच्या पॉइंट तयार करणे आणि त्यांची प्रसिध्दी करणे गरजेचे आहे.

सी वल्ड झाला असता तर..

आशिया खंडातील पहिला
तोंडवळी – तळाशिल येथील प्रस्तावित सी वल्ड पूर्णत्वास आला असता तर किनारपट्टीचाच नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलला असता. पहिल्या वर्षात हजार, तर पुढील दहा वर्षात लाखाच्या घरात रोजगार निर्मिती झाली असती. प्रकल्पात ५ हजर जनांना प्रत्यक्ष रोजगार मिळाला आसता. जिल्ह्याच्या उलाढालीत पहिल्या वर्षी १हजार कोटी रुपयांची तर पुढील १० वर्षात १० हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली असती. मत्स्यालय, अॅम्युझमेंट पार्क, अंडर वॉटर फिल्म स्टुडिओ, सागरी प्रजातींसाठी संशोधन, उपचार आणि पुनर्वसन केंद्र, कलाग्राम, फिशरमन पार्क, यांसह विविध आकर्षणाची केंद्रे असलेला सी वल्ड प्रकल्प सिंधुदुर्गात व्हावा अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

You missed

Solar Energy