सिंधुदुर्ग पर्यटन
0 0
Read Time:11 Minute, 35 Second

मात्र अन्य भागांच्या तुलनेत आपण मागेच का ? का नाही आपण आपल्या सिंधुदूर्गच्या पर्यटन विकासासाठी एकत्र येत ? सकारात्मक विचारातून या करीता सोशल मीडीयाचा वापर का केला जात नाही ? नाही म्हणायला जिल्हयातील युटयुब ब्लॉगर्स अपवाद आहेत. त्यांनी एकत्र येत सिंधुदूर्गातील पर्यटन स्थळे जगासमोर आणली आहेत. आपल्या जिल्हयातील राजकीय नेते पर्यटन विकासासाठी का एकत्र येत नाहीत ?

सध्याच्या आधुनिक आणि स्पर्धेच्या युगात आपले विचार आपले वागणे कधी बदलणार ? आपल्या जिल्‍हयात असलेल्याच गोष्टींचा पर्यटनाच्या दृष्टीने सकारात्मक वापर केला तर संपूर्ण जिल्‍हयाचा कायापालट होऊ शकतो. आपण सागरी कीनारे आणि त्याचा पर्यटनाकरीता योग्य वापर वेगवेगळया व्यवसायाच्या दृष्टीकोनातून केला तर आपल्या जिल्हयाच्या अर्थचक्रावर त्याचे सकारात्मक परीणाम नक्कीच दिसून येतील.

आपणांस माहीती आहेच की आपल्या जिल्‍हयात देवगड, आचरा, मालवण, वेंगुर्ला, शिरोडा अशी विस्तीर्ण किनारपटटी आहे. याचा वापर जिल्हा अंतर्गत प्रवासी, माल वाहतूक व पर्यटनाच्या नवनवीन संकल्पना राबवीण्यासाठी होणे गरजेचे आहे. फक्त गरज आहे ती याकरीताच्या कीमान आवश्यक पायाभूत सुवीधा निर्माण करण्याची तसेच आवश्यक ते परवाने संबंधीताना देण्याची.

जर देवगड, मालवण, वेंगुर्ला व अन्य बंदरे प्रवासी, मालवाहतूकीस आणि पर्यटनाच्या प्रकल्पांकरीता वापरण्यास सुरुवात झाली तर विकासाची नवीन सुरुवात होऊ शकते ती पण समाजातील सर्वच घटकांची. जिल्‍हयाअंतर्गत तसेच सुपूर्ण जगाशी देखील याच प्रकारे आपण जोडले गेलो तर काय कायापालट होईल याचा विचार करा.

आज देवगडचा हापूस आंबा असो की सर्व ठीकाणची मासळी असो रस्ते वाहतूकीने अन्य ठीकाणी जाते. आपले असलेले रस्तेच निकृष्ट असल्यामुळे अनेक अपघात होत आहेत त्यात वाहनांचे नुकसान तर आहेच पण आपल्या पैकी अनेकांच्या जवळच्या व्यक्तींचे प्राण देखील गेलेले आहेत. समजा हीच वाहतूक समुद्रमार्गे सुरु झाली तर कीती तरी फायदे होतील. कमी वेळेत पोहचता येईल. आधुनीक बोटींचा वापर केला तर कमी खर्चात ही वाहतूक होईल. कीनारपटटी भागात मच्छीमारी वर अवलंबून असणा-या बांधवांना एक नवीन रोजगाराचे साधन उपलब्ध होऊ शकते. ईतीहास काळात गजबजलेली बंदरे पुन्हा एकदा आधुनीकतेची कास धरतील.

ज्या प्रमाणे एसटी बस स्थानकाच्या आजूबाजूचा परीसर व्यापाराच्या दृष्टीने विकसीत होत जातो त्याप्रमाणे ही उपेक्षीत राहीलेली कीनारपटटीवरील बंदेरे, गावे मुख्य प्रवाहात येऊ शकतात.

पर्यटनाच्या दृष्टीकोनातून विचार केला तर अनेक प्रकल्प राबवीण्यासारखे आहेत.

हाऊस बोट सारखे प्रकल्प सुरु होणे गरजेचे आहे. ती पण अगदी दोन व्यक्तींसाठी लहान आकाराची बोट, एखाद्या लहान कुटूंबा करीता कीमान सहा व्यक्तींची क्षमता आणि ग्रुपकरीता कीमान दहा ते पंधरा कींवा त्यापेक्षा जास्त क्षमता असलेली हाऊस बोट असावी म्हणजे त्यातून योग्य तो व्यवसाय होईल जो ग्राहक आणि व्यापारी यांना

सोयीचा होईल. या बोटींमध्ये जेवणा पासून आवश्यक त्या सर्व सोयी सुवीधा असाव्यात त्यातून देखील अनेकांना रोजगार मीळेल. संपर्ण सिंधुदूर्गातील पर्यटन करण्यासाठी वेगवेगळी पॅकेज करावीत जसे डेक्कन ओडीसी या रेल्वेने पर्यटन घडवीले जाते त्याच धर्तीवर सागरी पर्यटन ही संकल्पना राबवावी.

यापूर्वीच वेगवेगळया कारणांमुळे मोक्याच्या ठीकाणी असलेल्या जमीनी विकल्या गेल्यात आता त्याच जमीनींवर धनदांडग्यांचे मोठे मोठे प्रोजेक्ट उभे राहतांना दिसत आहेत काही ठीकाणी नामवंत उद्योगपतींचे प्रोजक्ट पूर्णत्वास जाताना दिसत आहेत या सर्व पंचतारांकीत प्रकल्पांमध्ये येणा-या पर्यटकांकरीता आवश्यक असलेले विमानतळ अगोदरच पूर्ण केलेले आहे. मात्र सर्व सामान्य जिल्हावासीयांना यातून काय मिळणार ? यावर विचार होणे महत्वाचे आहे. आपल्या जिल्‍हयातील युवावर्ग भविष्यात मालक कींवा उद्योगपती म्हणून प्रसिध्दीस आला पाहीजे नोकर म्हणून नाही.

ज्यावेळी सिंधुदूर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषीत केला खर तर त्याचवेळी शासनाच्या सर्व यंत्रणांनी आपआपली आवश्यक कामे करण्यास सुरुवात केली. पर्यटन जिल्हा म्हणजे देश विदेशातील पर्यटक येणार त्याकरीता आवश्यक पात्रतेचे व्यावसायीक कींवा पर्यटन क्षेत्रात आवश्यक असणा-या पात्रतेचे कर्मचारी लागणार याकरीता मुंबई विद्यापीठाने B.Sc. (Hospitality Studies) अर्थात आदरातीथ्य अभ्यास या सारख्या अभ्यासक्रमांची पदवी म्हणजेच हॉटेल मॅनेजमेंट चे तीन वर्षाचे पदवी अभ्यासक्रम असणारी महाविद्यालये सुरु केली. मात्र पालक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये म्हणावे त्या प्रमाणात या अभ्यासक्रमांबाबत जागरुकता नसल्यामुळे मोजकेच विद्यार्थी या अभ्यासक्रमांचा लाभ घेऊन यशस्वी झालेले दिसत आहेत. अशा उज्जवल करीयर असणा-या अभ्यासक्रमांबाबत आवश्यक ती जागरुकता होणे गरजेचे आहे. या अभ्यासक्रमातून पदवी प्राप्त झाल्यानंतर आवश्यक ते प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर विद्यार्थी पर्यटन क्षेत्रातील सर्वच क्षेत्रात स्वत: चा व्यवसाय कींवा नोकरी देखील करु शकतो. भविष्य काळात पूर्ण होणा-या पंचतारांकीत हॉटेल कींवा सध्या सरु असलेल्या विमानतळावर देखील या विषयातील पदवीधरांना प्राधान्यक्रम दिला जातो.

कोकण रेल्वे आली, चीपी विमानतळ झाले असे अनेक प्रकल्प भविष्यात आपल्याकडे येतील प्रत्येक वेळी एकाच गोष्टीवर प्रकर्षाने चर्चा होत असते ते म्हणजे स्थानिकांना डावलले, रोजगाराच्या संधी परप्रातींयांना देण्यात आल्या. मात्र आपल्याकडील युवावर्गाने भविष्याचा विचार करुन योग्य असे करीयर निवडून आवश्यक शैक्षणीक पात्रता मिळवीली तर अनेकांना उपलब्ध असणा-या संधीचा योग्य तो फायदा घेता येईल.

सागरी पर्यटन क्षेत्राचा विचार करीत असतांना या गोष्टीं देखील अत्यंत महत्वाच्या आहेत. कारण येणारे पर्यटक हे देश विदेशातील कोणत्याही ठीकाणचे असू शकतात. त्यांच्याशी योग्य प्रकारे संज्ञापन होणे अत्यंत महत्वाचे असते आणि याकरीताच योग्य त्या पात्रतेचे व्यावसायिक आणि काम करणारे कर्मचारी असणे अत्यंत महत्वाचे असते.

आज आपल्या जिल्हयात असे गाव मिळणार नाही ज्या गावात चायनीज फूड सेंटर नाही. आणि या चायनीज फूड सेंटरवर बहुसंख्येने नेपाळी कींवा हीमाचल मधील कामगार काम करताना दिसतात. हे चित्र कुठेतरी बदलले पाहीजे. आपल्या जिल्हयातील व्यवसाय हे आपल्याच जिल्हयातील युवकांनी सुरु केले पाहीजेत आणि त्यात आपल्याच जिल्हयातील लोकांना प्राधान्याने रोजगार दिला पाहीजे.

सागरी पर्यटना सोबतच सागरी प्रवासी वाहतूक व सागरी मालवाहतूक जिल्हा अंतर्गत सुरु होणे देखील गरजेचे आहे. सध्याच्या काळात पारंपारीक मच्छीमार असो कींवा आधुनिकतेची कास धरुन बदलेला मच्छीमार असो त्यांचा मच्छीमारीचा व्यवसाय हा मंदीतच चालत आहे. अशा काळात सागरी प्रवासी व मालवाहतूक कींवा पर्यटनाच्या दृष्टीने हाऊसबोट सारखे प्रकल्प सुरु झाले तर यांना देखील नवीन संधी उपलब्ध होतील. किनारपटटीच्या बाजारपेठातील व्यापार वाढेल कारण या सर्वच संधी हया एकमेकांना पूरक कींवा सोबत घेऊन जाणा-या आहेत.

मात्र या करीता गरज आहे ती आपल्या प्रबळ ईच्छा शक्तीची आणि सकारात्मक विचारांची. आपल्या सर्वांच्या राजकीय विचारधारेचा आदरच आहे. आपल्या सर्वांच्या राजकीय पक्ष, नेते यांच्या बददलही आदरच आहे. मात्र हे सर्व बाजूला ठेऊन आपल्या जिल्हयाच्या सर्वागीण विकासासाठी सागरी पर्यटन, सागरी प्रवासी व मालवाहतूक यासारख्या गोष्टीसाठी आपण कधी एकत्र येणार ?

श्री.समीर बाळकृष्ण तारी
मोबाईल क्र. 940392245

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

You missed

Solar Energy