0 0
Read Time:4 Minute, 11 Second

श्री विष्णू मोंडकर,जिल्हाध्यक्ष.पर्यटन व्यावसायिक महासंघ सिंधुदुर्ग

पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या शिष्टमंडळाने घेतली जिल्हा नियोजन अधिकारी श्री दिलीप पवार यांची भेट
सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून राज्य व केंद्र सरकारने मान्यता दिलेली असून केंद्र सरकारने सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून दत्तक घेतला आहे.गेली अनेक वर्षे जिल्ह्यात राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनेच्या माध्यमातून येणारा पर्यटन निधी जिल्ह्यातील व्यापार व पर्यटन विकासासाठी नियोजन रित्या वापरला जात नसल्याची खंत जिल्ह्यातील व्यावसायिकांस आहे .यासंबंधी पर्यटन व्यावसायिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री विष्णू मोंडकर यांच्या प्रमुखत्वाखाली महासंघाच्या शिष्टमंडळाने जिल्हा नियोजन अधिकारी श्री दिलीप पवार यांची ओरोस येथे भेट घेण्यात आली.यावेळी चर्चा करत असताना पर्यटन हेड खाली येणारा निधी यापुढे खर्ची घालताना जिल्ह्यातील कल्चर,हिस्ट्री,मेडिकल,गडकिल्ले,
कातळशिल्पे,ऍडव्हेंचर,फूड,कातळशिल्पे,बीच टुरिझम साठी समांतर खर्च होणे गरजेचे आहे . तरच येणाऱ्या काळात जिल्ह्यात बारमाही पर्यटन वाढण्यास मदत होईल व्यापारी,नवउद्योजकांसाठी व्यवसाय वाढीसाठी सकारात्मक पावले उचलण्याची गरज आहे ,पर्यटन क्षेत्रात जिल्ह्यात काम करणाऱ्या संस्था व व्यावसायिक यांच्या समन्वयातून निधी खर्च करणे गरजेचे आहे तसेच सदर निधी ज्याकामावर खर्च झाला त्याचे ही ऑडिट होऊन सदर खर्चाचा पर्यटन वाढीसाठी काय उपयोग झाला याचेही नियोजन होणे गरजेचे आहे .यासाठी महासंघातर्फे जिल्हानियोजन अधिकारी यांचे सोबत चर्चा करण्यात आली तसेच पर्यटन निधीचे नियोजन करण्यासाठी शासनस्तरावर जिल्हास्तरावर कमिटी गठीत करून पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था व्यक्तीचा समावेश करून पर्यटन आराखडा बनविण्याचा शासकीय अध्यादेश असतानाही यावर जिल्हयात कार्यवाही झाली नाही याकडे लक्ष वेधण्यात आले त्यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी श्री दिलीप पवार यांनी येणाऱ्या काळात पर्यटन विषयक निधी खर्च करीत असताना महासंघाच्या सूचना विचारात घेतल्या जातील तसेच नवीन पर्यटन वाढीसाठी महासंघाने प्रोजेक्ट दिल्यास त्याचा सकारात्मक विचार केला जाईल असे सांगितले यावेळी महासंघ उपाध्यक्ष एडव्होकेट श्री प्रसाद करंदीकर ,श्री कमलेश चव्हाण ,महासंघ सोशल मीडिया प्रमुख श्री किशीर दाभोलकर ,लिकर संघटना अध्यक्ष श्री शेखर गाड मालवण तालुका अध्यक्ष श्री अवि सामंत,श्री अविनाश पराडकर,श्री दादा वेंगुर्लेकर,श्री संदीप बोडवे आदी पर्यटन व्यावसायिक उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
33 %
Excited
Excited
67 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

You missed

Solar Energy