0 0
Read Time:4 Minute, 13 Second

श्री विष्णू मोंडकर ,जिल्हाध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ सिंधुदुर्ग.

व्यापारी वर्गाच्या न्यायहक्कासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी व संघटनांनी एकत्र येण्याचे महासंघाचे आवाहन

पर्यटन व्यावसायिक महासंघ सिंधुदुर्ग तर्फे मंगळवार दिनांक १५/२/२०२२ रोजी सकाळी ११ वाजता ओरोस येथे जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन जिल्ह्यातील व्यापारी वर्गाच्या समस्या मांडण्यात येणार आहेत.
कोरोना व्हायरस व विविध नैसर्गगिक आपदेमुळे जिल्ह्यातील वाहन क्षेत्र,प्रोसेसींग युनिट धारक , शेतकरी ,मच्छिमार,किराणा तसेच पर्यटन क्षेत्रातील व्यापारी वर्ग मेटाकुटीला आलेला असून या काळातील लाईटबील,व्यावसायिक कर,अन्य शासकीय,महसुली देणी प्रशासकीय यंत्रणेने व्यापारी वर्गाकडून कोणतीही दयामाया न दाखवता अक्षरशः ओरबडून वसूल केली व १०० % वसूलिचा किताब प्रशासकीय यंत्रणेने मिळवला वसुली करत असताना हा व्यापारी वर्ग व्यवसायात उभारी घेईल कसा यांचा काडीमात्रही विचार प्रशासनाने केला नाही.
ज्या व्यापारी वर्गाकडून बळजबरीने पैसे वसूल केले त्या व्यापारी वर्गास उभारी देण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने कोरोना काळात अनेक प्रकारच्या योजना जाहीर झाल्या .व्यापारी व नवउद्योजक यांना व्यवसाय वाढीसाठी विविध शासकीय ,महामंडळाच्या अनुदानित योजना राबवण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांनी पुढाकार घेणे गरजेचे होते यांचीही जिल्ह्यात कागदोपत्री अंबलबजावणी नियोजनबद्ध झाली प्रत्यक्षात मात्र व्यापारी वर्गाच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही झाली नाही आज राष्ट्रीयकृत बँकाकडून नवउद्योजकांना तसेच व्यापारी वर्गास आवश्यक बँकिंग धोरण राबविणे गरजेचे आहे परंतु या सर्व गोष्टींना बगल देऊन थकीत रक्कमेपोटी जिल्ह्यातील व्यापारी वर्गाच्या मालमत्ता ,राहती घरे जप्ती करण्याचे काम सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरु झाले असुन जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकेच्या बँकिंग अध्यक्ष या अधिकारात जिल्हाधिकारी मंजूलक्ष्मी यांनी जिल्ह्यातील व्यापारी वर्गाच्या मालमत्ता जप्ती कार्यवाही त्वरित थांबवून लीड बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँकेच्या झोनल मॅनेजर व्यापारी संघटना सोबत मिटींग घेऊन व्यापारी वर्गास न्याय द्यावा तसेच जिल्ह्यातील नवउद्योजकांसाठी कर्ज सुविधा सुलभपध्धतीने राबव्यात अशी मागणी करण्यात येणार आहे यासाठी व्यावसायिकांनी उपस्थित राहावे .व्यापारी वर्गाच्या न्यायहक्कासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी व संघटनांनी याविषयी व्यापारी वर्गास सहकार्य करावे असे आवाहन महासंघ अध्यक्ष श्री विष्णू मोंडकर यांनी केले आहे .

Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

You missed

Solar Energy