1 0
Read Time:3 Minute, 58 Second

श्री विष्णू मोंडकर ,जिल्ह्याध्यक्ष.पर्यटन व्यावसायिक महासंघ.

जिह्यातील प्रलंबित पर्यटन प्रकल्प व पर्यटन व्यावसायिकाची येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी पर्यटन मंत्री श्री आदित्यजी ठाकरे जी येणार सिंधुदुर्ग दौऱ्यावर.
सिवल्डॅ प्रकल्प हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पर्यटन क्षेत्रात माईल्डस्टोन ठरणारा प्रकल्प असून जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी या प्रकल्पाची नितांत गरज आहे सदर प्रकल्प हा मालवण तालुक्यात तोंडवळी येथे होत असून सदर प्रकल्प राज्य सरकारने १३९० एकर क्षेत्रात मध्ये मंजूर केला होता नंतर २८/०१/२०१५ रोजी माजी मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मंत्रालय मुंबई येथे झालेल्या मिटींग मध्ये सदर प्रकल्पाचे क्षेत्र कमी करून ३५० एकर मध्ये सदर प्रकल्प करण्यात यावा अश्या सूचना देण्यात आल्या त्यानंतर सदर प्रकल्प मध्ये सायन्स व टेनॉलॉजी पार्क पुणे या कंपनीला सिवल्डॅ प्रकल्प अहवाल बनविण्याविषयी सूचना देण्यात आल्या परंतु सदर कंपनीकडे अश्या प्रकारची काम करणारी व्यक्ती नसल्यामूळे त्यांना दिलेली जबाबदारी सरकारकडून रद्द करण्यात आली.स्थानिक जमीन मालक यांनी सदर प्रकल्प आपल्या जागेत होण्यासाठी महाराष्ट्र सरकारला जमिनीची समंतीपत्रे सादर केली यांची दखल घेऊन तत्कालीन पर्यटनमंत्री श्री जयकुमार रावल ,जिल्ह्याधिकारी श्री .पांढरपट्टे व जमीन मालक यांच्या उपस्थितीत मंत्रालयात झालेल्या मिटिंग मध्ये सदर प्रकल्पास मंजुरी देण्यात आली प्रकल्प होण्यासाठी जमीन मालकांना प्रति हेक्टर १ कोटी रुपये देण्याचं जाहीर करण्यात आले तसेच सिवल्डॅ प्रकल्प व अन्य कोंकणातील पर्यटन प्रकल्प होण्यासाठी पर्यटन संचालनालयाची स्थापना करण्यात आली.परंतु त्यानंतर राज्यात सरकार बदलून महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर व गेल्या दोन वर्षे कोरोना व्हायरस मुळे सदरप्रकल्पाची गती मंदावली असून आताच कोकण दौऱ्यावर असलेल्या मा.पर्यटन मंत्री श्री आदित्यजी ठाकरे यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर असताना सिवल्डॅ व आंग्रीया बेट विषयी पर्यटन महासंघाची सकारात्मक चर्चा झाली असून येत्या महिन्याभरात सदर विषयी व जिल्ह्यातील अन्य पर्यटन सुविधा मार्गी लावण्यासंधर्भात मंत्री महोदय सिंधुदुर्ग येथे येणार आहेत .सिवल्डॅ प्रकल्प लवकरच सुरु होण्याची महासंघास अपेक्षा असून यामुळे जिल्ह्याचे पर्यटन क्षेत्र बारमाही वाढेल अशी महासंघास अपेक्षा आहे अशी माहिती पर्यटन व्यावसायिक महासंघाचे जिल्ह्याध्यक्ष श्री विष्णू मोंडकर यांनी दिली आहे .

Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

You missed

Solar Energy