सिंधुदुर्ग पर्यटन महासंघ
0 0
Read Time:4 Minute, 9 Second

श्री विष्णु मोंडकर जिल्ह्याध्यक्ष ,पर्यटन व्यावसायिक महासंघ सिंधुदुर्ग.

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून सागरी क्रीडा व्यवसायावर लक्ष देण्यासाठी टेहळणी पथक नेमण्याचे आदेश देण्यात आले आहेत ज्यामध्ये अनेक शासकीय खात्यांच्या अधिकारी वर्गाचा समावेश करण्यात आला आहे परंतु यामध्ये सागरी पर्यंटन क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांचा,व्यक्तीचा समावेशच नसल्यामुळे या पथकांचा उद्धेशच सफल होणार नाही.हा निर्णय घेताना स्थानिक व्यावसायिकांना विश्वासात घेऊन निर्णय घेणे अपेक्षित होते .जिल्ह्यातील साहसीक्रीडा पर्यटन प्रकारातील सुरक्षेची जबाबदारी कुठल्याही शासकीय यंत्रणेने आज पर्यंत पार पाडलेली नाही महाराष्ट्र मेटाईम बोर्डाच्या माध्यमातून शासनाने गेल्या अनेक वर्षात करोडो रुपये शासकीय कर घेऊन त्याबदल्यात पर्यटक व या क्षेत्रातील व्यावसायिकांच्या सुरक्षेतेसाठी एकही रुपया प्रशासना मार्फत खर्च झालेला नाही वारंवार विनंती करूनही पर्यटन संस्थांच्या विनंती ,अर्जांना केराची टोपली दाखविण्याचे काम सोडून कुठलेही काम जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातुन झालेले नाही जिल्हा पर्यटन जिल्ह्णा जाहीर झाल्यानंतर किनारपट्टी भागात दरवर्षी येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत जाऊन आज दरवर्षी 10 लाखापेशा जास्त पर्यटक स्कुबा डायव्हिंग ,जलक्रीडा पर्यटनासाठी या भागास भेट देतात गेल्या 20 वर्षांत सागरी पर्यटनासाठी देशविदेशातील करोडो पर्यटकांनी भेट दिली त्यांना साहसी जलक्रीडा पर्यटन करण्याची यशस्वी जबाबदारी स्थानिक जलक्रीडा व्यावसायिकांनि आपल्या योग्य नियोजनाने व व्यावसायिक अंतर्गत उभारलेल्या लाईफगार्ड यंत्रणेद्वारे यशस्वीरित्या पार पाडली त्आहे यामुळेच 24 मे रोजी स्कुबा डायव्हिंग बोट अपघातामध्ये 18 लोकांना वाचविण्यात आले याउलट या दुर्घटनेमुळे दोन दशकापेक्षा जास्त काळानंतर अचानक जाग्या झालेल्या स्थनिक प्रशासनास खऱ्या अर्थाने पर्यटकांची सुरक्षेवर काम करायचे असल्यास जलक्रीडा संघटना ,जलक्रीडा व्यावसायिक यांची त्वरित मिटींग आयोजित करून या व्यवसायात सुसूत्रता आणण्यासाठी आवश्यक लाईफगार्ड ,वैद्यकीय सुविधा,रेस्क्यूटिम ,सागरी प्रशिक्षण ,एक खिडकीयंत्रणा ,व्यवसाय अधिकृत करण्यासंदर्भात सहकार्य होणे गरजेचे आहे तरच खऱ्या अर्थाने स्थानिक प्रशासनाची मदत पर्यटकांस व स्थानिक जलक्रीडा व्यावसायिकांना होणारी आहे याविषयी जिल्हाधिकारी यांनी त्वरित दखल घ्यावी अशी विनंती श्री विष्णु मोंडकर जिल्हाध्यक्ष.पर्यटन व्यावसायिक महासंघ सिंधुदुर्ग वतीने करण्यात येत आहे .

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

You missed

Solar Energy