क्लस्टर स्थापना
1 0
Read Time:3 Minute, 7 Second


देशाचे सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री ना. नारायणराव राणे यांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यवसायिक महासंघ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायाला उर्जितावस्था आणण्यासाठी पर्यटन व्यवसायिकांचा क्लस्टर तयार करुन राणेसाहेबांच्या मंञालयाशी निगडित योजनांचा लाभ पर्यटन व्यवसायाशी निगडित सर्व घटकांना मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यवसायिकांची महत्वपूर्ण बैठक मालवण महाराजा हाॅटेलमध्ये संपन्न झाली.
महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री बाबा मोंडकर यांनी सुरुवातीला या बैठकीचा उद्देश सर्वांसमोर मांडला. विशेष म्हणजे या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी खास नवी दिल्लीहून संबंधित मंञालयाचे सयुक्त सचिव मा. राकेशकुमार उपस्थित होते. मा. राणेसाहेबांच्या आदेशानुसार भारत सरकारच्या सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंञालयाचे अनेक अधिकारी या जिल्ह्यात येवून विविध उद्योगातील घटकांना एकञित करून बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असून जिल्ह्यातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य प्रकारे विनीयोग करून त्या त्या क्षेञातील घटकांचा व व्यवसायिंकाचा क्लस्टर करण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन श्री राकेशकुमार यांनी दिले. तसेच उपस्थित व्यवसायिंकाच्या समस्या ऐकून त्याबाबतही सविस्तर मार्गदर्शन केले.
या बैठकीला श्री जितेंद्र पंडित, विजय गोंधावळे, मंगेश जावकर, किशोर दाभोलकर, गुरूनाथ राणे, भालचंद्र सामंत, सौ. मेघा सावंत, सौ अन्वेषा आचरेकर, डॉ. कमलेश चव्हाण, हरिश्चंद्र वेंगुर्लेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंञालयाचे सयुक्त सचिव श्री राकेशकुमार यांचा महासंघाच्या वतीने शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. बैठकीचा
समारोप व आभार महासंघाचे जिल्हा सचिव अॅड नकुल पार्सेकर यानी केले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

You missed

Solar Energy