कोंकण परंपरा
1 0
Read Time:4 Minute, 38 Second


कोकण जसा निसर्ग सौंदर्याने संपन्न आहे तसा तो वेगवेगळ्या रूढी परंपरानी संपन्न आहे हे कोणी नाकारू शकत नाही दिवाळी झाली की दिवाळीचा शेवटचा सण म्हणजे देव दिवाळी ती मोठ्या प्रमाणावर कोकणात साजरी केली जाते, ती वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते. गवळ देव म्हणजे गुराख्यांचा देव.रानातला देव. देवगड तालुक्यातील वानिवडे-पावणाई गावातील सरवणकर कुटूंबीय कशी साजरी करतात ते सांगत आहे विजयदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरमारावर सरवणकर घराण्याचा पूर्वज वतनदार म्हणून कार्यरत होते, त्यांचे वंशज वानिवडे सरवणकर वाडीत मोठया उत्सवात देव दिवाळी साजरी करतात देव दिवाळीच्या आदल्या दिवशी सरवणकर आणि करंजे कुटुंबातील प्रत्येक घरातून शिदोरी(डाळ,तांदूळ इत्यादी) जमा करतात तसेच गवळ देव हे घरापासून लांब म्हणजे सड्यावर असल्याने त्याची साफसफाई करून, देव दिवाळी दिवशी सर्व सरवणकर आणि करंजे बंधू जमा होऊन ,भात, भाजी, डाळ व तांदळाचे वडे बनवितात या सर्व जेवणात मिठाचा वापर केला जात नाही, तसेच वडे बनवितात. त्यात १२ वडे हे खूप मोठे बनवितात व त्याच्या मध्यभागी होल ठेवतात हे सर्व जेवण तयार झाल्यावर सड्यावर अनेक गुळगुळीत काळे दगड मांडून पूर्वीच्या काळी कधी गुरे राखणाऱ्यानी या देवांची स्थापना केली असावी त्यामुळे ते उघड्यावर माळरानात आहेत केवळ वर्षातून एकदा पूजा आरर्च्या केली जाते या सर्व देवांना प्रथम खोबरेल तेलाने पुसून नंतर त्या सर्वांची पूजा करून त्यांना जेवणाचा नेवेद्य दाखवून नंतर सर्व जण तेथे जेवतात हे एक प्रकार चे वन भोजनच असते जेवुन झाल्या वर सरवणकर करंजे कुटुंबातील लहान मोठी मुले उघडे होऊन, कोळसा घासून काळा रंग शरीराला फसतात तसेच तिकडचेच रंगीबेरंगी दगड घासून अंगाला लावतात व झाडाच्या फांद्या कमरेला बांधतात आणि त्यांना आम्ही वाघ म्हणतो त्याच्यातील एक मोठा वाघ होतो. मग त्याचा गळ्यात जे १२ मोठे वडे असतात ते केळीच्या सोफात गुंफून त्याची माळा बनवितात ती त्याच्या गळ्यात घालतात त्या नंतर गवळ देवाला गाऱ्हाणे घालून मोठा वाघ व इतर सर्व वाघ त्याचा मागून सर्व गवळ देवांना जोरजोरात ओरडत पाच फेऱ्या मारतात गळ्यात वड्याची माळा व हातात गोटणीवर ठेवलेला नेवैद्य घेऊन जोरात सड्यावरुन ओरडत सर्व वाघ पळत सुटतात त्या वेळी त्याच्या अंगावर शेण मारतात ते घाटीने सरवणकर वाडीतून पळत( गळ्यातील वडे टाकत येतात, ते वडे इतर उचलून देवचा प्रसाद म्हणून खातात) खाडीत येऊन पाण्यात उडी घेतात आणि खाडीच्या पाण्यात सर्व वाघ अंघोळी करतात आशा प्रकारे देव दिवाळी साजरी केली जाते.एक मात्र खरं, की गवळदेवाची मजा आणि निसर्गाचं सहभोजन घेण्याबरोबर पर्यावरण संवर्धनाचा वसा आणि वाघाला देव मानण्याची परंपरा ही गावाचं गावपण टिकवून आहे. हा अनुभव जे-जे अनुभवतात, त्यांना पुढच्या गवळदेवाचे वेध लागल्याशिवाय राहत नाहीत…..

✒️ श्री.श्रीविद्या सदाशिव सरवणकर
वानिवडे पावणाई गाव,देवगड
9324703404

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

You missed

Solar Energy