छत्रपती शिवाजी महाराज*शिवलंका सिंधुदुर्ग किल्लेवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य दिव्य पुतळा होणेसाठी पालकमंत्री श्री रवींद्रजी चव्हाण यांची शिवभक्तांनी घेतली भेट....* किल्ले सिंधुदुर्ग वर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व्हावा म्हणून पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या वतीने शिवभक्तांच्या शिष्टमंडळाने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा.श्री रविंद्रजी चव्हाण साहेब यांची ओरोस सिंधुदुर्ग येथे भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले सदर निवेदनात मागणी करण्यात आली की ....
0 0
Read Time:3 Minute, 59 Second

             किल्ले सिंधुदुर्ग वर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व्हावा म्हणून पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या वतीने शिवभक्तांच्या शिष्टमंडळाने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा.श्री रविंद्रजी चव्हाण साहेब यांची ओरोस सिंधुदुर्ग येथे भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले सदर निवेदनात मागणी करण्यात आली की केंद्र सरकारच्या वतीने नौसेना दिन 4 डिसेंबर 23 मध्ये किल्ले सिंधुदुर्ग वर साजरा होत आहे यासाठी मा.पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी व राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्गु यांच्या प्रमुख उपस्थितीत नौसेना दिन साजरा साजरा होणार आहे.
                यासाठी नेव्ही ने आपली तयारी चालू केली असून किल्ले सिंधुदुर्ग वर छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य दिव्य पुतळा उभारण्यासाठी जागा निश्चिती चालू आहे किल्ले सिंधुदुर्ग वर महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी अनेक किल्ले सिंधुदुर्ग वरील जमीन मालक तयार असताना स्थानिक जिल्हा प्रशासन सदर किल्ल्यावर जागा उपलब्ध नसल्याचे कारण दाखवून पुतळा किल्ले सिंधुदुर्ग व्यतिरिक्त उभारण्याच्या तयारीत आहेत हे तमाम देश विदेशातील शिवप्रेमी वर अन्याय करण्यासारखे आहे .या संबंधी आपण विशेष लक्ष देऊन सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांना सदर पुतळा किल्ले सिंधुदुर्ग वर होण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश देण्यात यावेत ही विनंती कारण्यात आली यावेळी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी श्री किशोर तावडे हे उपस्थित होते यावेळी पालकमंत्री यांनी सूचित केले की सदर जागेसाठी प्रशासन गेले तीन महिने प्रयत्न करत असून शासनाने प्रयत्न करूनही जमीन मालकांची अजून संमती आली नाही अन्य किल्ल्यावर असलेले जागा मालक तयार असून त्याजागी पुतळा उभारणी शक्य नाही त्यामुळे सदर मालक तयार न झाल्यास सिंधुदुर्ग किल्ला व्यतिरिक्त 3 ते 4 जागेत पुतळा उभारणी साठी माहिती घेणे चालू आहे यावेळी शिवभक्तांनी किल्ले सिंधुदुर्ग वरच पुतळा उभारला जावा अशी मागणी शिवभक्त शिष्टमंडळांनी केली यावेळी श्री सूर्यकांत फणसेकर, श्री अवि सामंत, श्री किशोर दाभोलकर, श्री रवींद्र खानविलकर, श्री मंगेश जावकर, श्री मिलिंद झाड, श्री रुपेश प्रभू, श्री अभय पाटकर, श्री दादा वेंगुर्लेकर, श्री सौरभ ताम्हणकर, श्री कोयंडे, श्री सुरेश बापर्डेकर, श्री अविनाश पराडकर, श्री आशिष हडकर, आदी शिवभक्त होते उपस्थित होते. अशी माहिती श्री विष्णू मोंडकर अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ यांनी दिली.,

Join us whatsapp

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

You missed

Solar Energy