Chatrapati-shivaji-maharajChatrapati-shivaji-maharaj
1 0
Read Time:3 Minute, 38 Second
Loading poll ...

अखंड हिंदुस्थानमध्ये हिंदवी स्वराज्य स्थापन करत मोगली अत्याचारांपासून जनतेचे संरक्षण करणारे राजे श्री शिवछत्रपती आज निःशब्द झाले असतील. “लक्ष चौऱ्यांशी बंदरे ऐसा जागा दुसरा नाही” म्हणत ज्यांनी शिवलंका सिंधुदुर्गची स्थापना केली.. आरमाराची कीर्ती दिगंत केली… त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला त्याच सिंधुदुर्ग किल्ल्यावर जागा मिळण्याची अडचण व्हावी? किल्ले सिंधुदुर्ग हा आपल्या मराठी अस्मितेचा मानबिंदू असताना छत्रपतींचा पुतळा जागेअभावी किल्ल्याबाहेर बांधण्याची वेळ यावी?

आठवत असेल… याच सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपतींच्या भगव्या झेंड्याचा अवमान झाला म्हणून पुरे आम्ही मावळे पेटून उठले होतो अमानुष लाठीमार झेलला होता. अस्सल भगवे रक्त जिथे महाराजांच्या भगव्या झेंड्याच्या अपमानातून पेटून उठते, तिथे प्रत्यक्ष शिवाजी महाराजांचा अवमान कसा सहन करू शकतो आपण?

ही भूमी कायदेशीररित्या कोणाच्या नावावर असेलही… पण छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते, तर आज काय अवस्था असती? या मातीच्या कणाकणावर राजांचे ऋण आहेत. मग मनात ते ऋण का नसावेत? जिथे मावळ्यांनी उभ्या आयुष्याची राजांच्या शब्दावर स्वराज्याच्या त्या रणयज्ञात आहुती दिली, तिथे आज राजांच्या पुतळ्यासाठी जागा देण्यासाठी आर्जवे करण्याची वेळ यावी? ज्यांनी यासाठी जीव तोडून प्रयत्न करण्याची गरज आहे, त्या आपल्याच लोकप्रतिनिधींनी राजेंच्या पुतळ्यासाठी बोटचेपी भूमिका घ्यावी? असह्य… निव्वळ असह्य!

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सिंधुदुर्ग किल्ल्यावर व्हावा ही आपली तमाम शिवभक्ताची भूमिका असली पाहीजे. शिवछत्रपतींच्या अस्मितेशी शिवभक्तानि कधीही जातपात, धर्म, पक्ष पाहून तडजोड केली नाही! यापुढे करणार नाहीत!

छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य दिव्य पुतळा भारतीय नौदल उभारत आहे, तो पुतळा कुठे आजूबाजूला नव्हे, तर शिवस्मारक असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावरच झाला पाहिजे ही आपली मागणी असेल…आणि त्यासाठी उद्या आपण सर्वांनी मालवणमध्ये एक बैठक घेऊन त्यासाठी आवाज उठवला पाहिजे. शिवछत्रपतींसाठी… नो पॉलिटिक्स प्लिज! उभा महाराष्ट्र मालवणी मावळ्यांच्या भूमिकेकडे पाहतो आहे!!
दिनांक :-17/9/23
बैठक स्थळ :संस्कार हॉल ,धुरीवाडा मालवण
वेळ: सकाळी 11 वाजता एकत्र येण्याचे आवाहन श्री विष्णू मोंडकर अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ यांनी केले आहे

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
100 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

You missed

Solar Energy