Chatrapati-shivaji-maharajChatrapati-shivaji-maharaj
2 0
Read Time:7 Minute, 43 Second
Loading poll ...

हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्याच सिंधुदुर्ग किल्यावर महाराजांच्या स्मारकाला जागा नाकारणाऱ्याचे समर्थन एखाद्या खासदाराने करावं यापेक्षा वाईट काय असू शकेल?

मालवण मधील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यावर होणाऱ्या नौदल दिना निमित्त नौदलातर्फे सिंधुदुर्ग किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यास किल्ल्यातील संबंधित जागा मालकाने जागा देण्यास नकार दिल्याने पुतळा किल्ल्या बाहेर मालवणात अन्य जागी उभारण्यास प्रयत्न होत आहेत. मात्र, शिवरायांचा पुतळा सिंधुदुर्ग किल्ल्यातच उभारला गेला पाहिजे, अशी आग्रही मागणी शिवप्रेमींची आहे. यासाठी जागा मालकाची भूमिका बदलण्यासाठी पर्यटन व्यावसायिक महासंघ प्रयत्न करीत आहे. मात्र राज्यातील एक खासदार किल्ल्यात शिवरायांचा पुतळा होण्यासाठी सकारात्मक भूमिका घेताना दिसत नाही, असा खळबळजनक दावा जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी पत्रकार परिषदेत करताना त्या खासदाराचे नाव गुलदस्त्यात ठेवणे पसंत केले.

दरम्यान, त्या खासदारांनी सकारात्मक भूमिका घेऊन किल्ल्यात पुतळ्यासाठी शासनाला जमीन उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशीही मागणी बाबा मोंडकर यांनी करताना शिवरायांचा पुतळा किल्ल्यातच व्हावा, या मागणीसाठी दि. १७ सप्टेंबर रोजी मालवणात शिवप्रेमींची बैठक आयोजित करण्यात आली आहे, असेही सांगितले.

मालवण येथील हॉटेल ऐश्वर्य मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बाबा मोंडकर बोलत होते. यावेळी किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे अध्यक्ष गुरु राणे, तारकर्ली पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष सहदेव साळगावकर, अविनाश सामंत, मंगेश जावकर, भाऊ सामंत, शेखर गाड, मिलिंद झाड, दादा वेंगुर्लेकर, रामा चोपडेकर, दर्शन वेंगुर्लेकर, रवींद्र खानोलकर, श्री. वालकर आदी उपस्थित होते.

यावेळी बाबा मोंडकर म्हणाले, सिंधुदुर्ग किल्ल्यात साजऱ्या होणाऱ्या नौदल दिना निमित्त नौदलाचा सिंधुदुर्ग किल्ल्यात शिवरायांचा पुतळा उभारण्याचा मानस आहे. किल्ल्यात पुतळा बसविण्यासाठी नौदल व शासनाकडून जमिनीचा शोध घेण्यात येत होता. मात्र पुतळ्यासाठी किल्ल्यात निश्चित केलेल्या जागेच्या मालकाने शासनाला जमीन देण्यास विरोध दर्शविल्यामुळे गेले दोन महिने शासनाकडून घेण्यात येत असलेल्या जमीन शोध मोहिमेच्या मेहनतीवर पाणी पडले आहे. आता शिवरायांचा पुतळा मालवण शहरात बसविण्यासाठी किनारपट्टीवरील जागेचा शोध घेतला जात आहे. मात्र किल्ले सिंधुदुर्गवरच छत्रपती शिवरायांचा पुतळा व्हावा ही शिवप्रेमींची इच्छा आहे. यापूर्वी स्व. बाबासाहेब पुरंदरे यांनीही नौदलाने जी जागा निश्चित केली त्याच जागेत संग्रहालय उभारण्याची इच्छा व्यक्त केली होती. पुतळा किल्ल्यात उभारल्यावर त्या पुतळ्यास जे महत्व प्राप्त होणार आहे, ते महत्व अन्यत्र उभारलेल्या पुतळ्यास प्राप्त होणार नाही. पुतळ्यामुळे किल्ल्याच्या वैभवात भर पडतानाच पर्यटन वाढीसही चालना मिळणार आहे. त्यामुळे किल्ल्यातच शिवरायांचा पुतळा विराजमान होणे आवश्यक आहे, असेही मोंडकर म्हणाले.

किल्ल्यातील जागा देण्यास नकार देणाऱ्या जागा मालकाशी पर्यटन व्यावसायिक महासंघाने संपर्क साधत त्याची भूमिका बदलण्यासाठी प्रयत्न केले. मात्र जागा मालकाशी चर्चा झाल्यानंतर राज्यातील एका खासदाराचा आपणास फोन येऊन “पुतळ्याच्या विषयात आपण लक्ष ठेवून आहोत, हा विषय पेंडिंग ठेवावा”, असे खासदाराकडून सांगण्यात आले. खासदारांशी झालेल्या चर्चेत त्या खासदारांची किल्ल्यात पुतळा होण्यासाठी सकारात्मक भूमिका दिसून आली नाही. याबाबत आपण त्या खासदारांच्या पक्षाच्या जिल्हाध्यक्षाशी देखील चर्चा केली. संबंधित खासदारांच्या मध्यस्थीने पुतळ्याचा विषय मार्गी लागणार असेल तर त्या खासदारांनी पुतळ्यासाठी सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी मोंडकर यांनी करत त्या खासदारांचे नाव गुलदस्त्यात ठेवले.

शिवप्रेमींची १७ रोजी बैठक

नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवरायांचा पुतळा इतरत्र कुठेही न बसविता तो किल्ले सिंधुदुर्ग येथे बसविण्यात यावा, अशी तमाम शिवप्रेमींची इच्छा असल्याने या विषयाच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी मालवणातील शिवप्रेमींची बैठक दि. १७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता मालवण धुरीवाडा येथील संस्कार हॉल येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस शिवप्रेमींनी उपस्थित राहवे, असे आवाहन बाबा मोंडकर यांनी केले आहे. यात स्थानिकांना विश्वासात घेणे गरजेचे आहे. त्यासाठी समन्वय समिती स्थापन करणे गरजेचे आहे, या बैठकीस संबंधित जागा मालकानेही उपस्थित राहिल्यास सकारात्मक चर्चा करता येईल,असेही मोंडकर यांनी स्पष्ट केले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावरच महाराजांच स्मारक उभं राहिलंच पाहिजे. की राहू नये या विषयी…

आपली मत नोंदवा.

Happy
Happy
25 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
75 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
100%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

2 thoughts on “छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी जागाच नाही.

  1. खरंतर हा प्रश्न उभा करणच चुकीचं आहे.
    शिवाजी महाराज किल्यावरच असायला हवेत.
    आणि त्या निमित्ताने किल्लाची डागडुजी ही झाली पाहिजे.
    🙏

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

You missed

Solar Energy