शिवराज्यभिषेकशिवराज्यभिषेक
4 0
Read Time:4 Minute, 22 Second

पुतळा किल्ल्यावरच उभारण्यात यावा: मालवणात रविवारी शिवप्रेमीं येणार एकत्र….

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा शिवलंका किल्ले सिंधुदुर्गवरच झाला पाहिजे, यासाठी रविवारी मालवण येथे होणाऱ्या बैठकीत तमाम शिवभक्त मावळ्यांनी एकत्र यावे असे आवाहन पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी केले आहे.

अखंड हिंदुस्थानमध्ये हिंदवी स्वराज्य स्थापन करत मोगली अत्याचारांपासून जनतेचे संरक्षण करणारे राजे श्री शिवछत्रपती आज निःशब्द झाले असतील. “लक्ष चौऱ्यांशी बंदरे ऐसा जागा दुसरा नाही” म्हणत ज्यांनी शिवलंका सिंधुदुर्गची स्थापना केली. आरमाराची कीर्ती दिगंत केली. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला त्याच सिंधुदुर्ग किल्ल्यावर जागा मिळण्याची अडचण व्हावी? किल्ले सिंधुदुर्ग हा आपल्या मराठी अस्मितेचा मानबिंदू असताना छत्रपतींचा पुतळा जागेअभावी किल्ल्याबाहेर बांधण्याची वेळ यावी? यापेक्षा दुर्दैव ते दुसरे काय असा खडा सवाल ही मोंडकर यांनी उपस्थित केला आहे.

मोंडकर यांनी मालवणात झालेल्या भगवा झेंडा आंदोलनाचीही मालवण वासियांना आठवण करून देताना, याच सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपतींच्या भगव्या झेंड्याचा अवमान झाला म्हणून मालवण मधील आम्ही सारे मावळे पेटून उठले होतो. अमानुष लाठीमार झेलला होता. भगवे रक्त जिथे महाराजांच्या भगव्या झेंड्याच्या अपमानातून पेटून उठते, तिथे प्रत्यक्ष शिवाजी महाराजांचा अवमान आपण कसा सहन करू शकतो? असाही सवाल मालवणवासियांना विचारला आहे.

ही भूमी कायदेशीररित्या कोणाच्या नावावर असेलही. पण छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते, तर आज काय अवस्था असती? या मातीच्या कणाकणावर राजांचे ऋण आहेत. मग मनात ते ऋण का नसावेत? जिथे मावळ्यांनी उभ्या आयुष्याची राजांच्या शब्दावर स्वराज्याच्या त्या रणयज्ञात आहुती दिली, तिथे आज राजांच्या पुतळ्यासाठी जागा देण्यासाठी आर्जवे करण्याची वेळ यावी? ज्यांनी यासाठी जीव तोडून प्रयत्न करण्याची गरज आहे, त्या आपल्याच लोकप्रतिनिधींनी राजेंच्या पुतळ्यासाठी बोटचेपी भूमिका घ्यावी? हे सारे निव्वळ असह्य असल्याचे मोंडकर म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सिंधुदुर्ग किल्ल्यावर व्हावा ही आपली तमाम शिवभक्ताची भूमिका असली पाहीजे. शिवछत्रपतींच्या अस्मितेशी शिवभक्तानि कधीही जातपात, धर्म, पक्ष पाहून तडजोड केली नाही! यापुढे करणार नाहीत! छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य दिव्य पुतळा भारतीय नौदल उभारत आहे, तो पुतळा कुठे आजूबाजूला नव्हे, तर शिवस्मारक असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावरच झाला पाहिजे ही आपली मागणी असेल. शिव प्रेमींनी एकत्र येवून आवाज उठविण्याची गरज निर्माण झाली असून त्यासाठी सर्वांनी कोणतेही राजकारण न आणता धूरीवाडा, संस्कार हॉल याठिकाणी सकाळीं ११ वाजता उपस्थित राहावे असे आवाहन मोंडकर यांनी केले आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
100 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
100%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

One thought on “छत्रपतींचा पुतळा जागेअभावी किल्ल्याबाहेर बांधण्याची वेळ यावी? यापेक्षा दुर्दैव ते काय ?? बाबा मोंडकर यांचा संतप्त सवाल…

  1. ज्यांची नावावर जमीन त्यांचा योग्य तो मोबदला देऊन जमीन खरेदी करून ,तिथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभारावे. खुद्द छत्रपती महाराजांची झाडे घेण्यासंदर्भात आणि इतर काही कामानिमित्त श्री छत्रपतींची हीच भूमिका होती. स्वराज्यातील जनतेला त्रास देऊ नये

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

You missed

Solar Energy