पेंडूर देवीचा मांड एक अद्भुत विलक्षण सोहळा
पेंडूर देवीचा मांड एक अद्भुत विलक्षण सोहळा डॉक्टर सोमनाथ परब पेंडूर पेंडूर तालुका मालवण मधील मोठे गाव निसर्गरम्य सुंदर गाव. एका बाजूला वेताळगड, लागूनच हनुमान
प्रति पंढरपूर ओळखल्या जाणा-या पेंडूर गावात 360 स्थळाचा अधिपती श्री देव वेताळ, स्वयंभू श्री सातेरी देवी, नवसाला पावणारा श्री देव रवळनाथ, श्री देवी पावणाई श्री देव लिंगेश्वर, श्री ब्राम्हणदेव, जैन कालीन संकिनी डंकिनी, श्री देव मारुती असे अनेक देव देवता या गावात वास्तव्यात आहेत. संपुर्ण वर्षभरात या गावात देवदेवताचे अनेक उत्सव साजरे केले जातात.
या मंदिरामध्ये प्राचीन काळापासूनचे स्वयंभू मोठे वारुळ (पेड) आहे.या वारुळामध्ये भूमी देवता म्हणून पुजली जाते.आणि त्यामध्ये वास्तव्याला सर्प आहे.जर गावक-याकडून काही चूक झाल्यास सर्प दृष्टीस पडतो.अशी गावक-यची धारणा आहे.श्री देवी सातेरीच्या उजव्या बाजुला प्राचीन काळचे जैन धर्मियाची महावीर सांगाडा आणि त्यावेळच्या लेण्या मुर्त्याचे भग्न अवस्थेतील अवशेष आहेत
हे मंदिर उत्तर दक्षिण दिशेला असलेले हेमाडपंथी मंदिर आहे.श्री देव रवळनाथ ही सुर्य देवता आहे.या मंदिरामध्ये श्री देवी पावणाईचे स्थान आहे आणि शेतमळया मध्ये अति प्राचीन श्री देव लिंगेश्वराचे प्रवित्र मंदिर आहे.यात गणपतीची प्राचीन मुर्ती आहे.या मंदिरात दस-याच्या वेळी देवांची लग्न होतात.अशा प्रकारे पेंडूर गावातील ही पाच मुख्य देवस्थाने आहेत.इतर ही गावातील वाडयामध्ये विठठल रखुमाई
दिगंबर जैन परंपरेतील ११ व्या शतकातील असाव्यात असा अंदाज बांधण्यात आला त्या नंतर पुन्हा १९९५-९६ दरम्यान पुन्हा शोध घेण्याचा प्रयत्न त्यानी केला असता त्या पैकी ५ मुर्त्या गायब झाल्याचे लक्षात आले. पुढे पाच वर्षांनी अजून पाच मुर्त्या गायब झाल्याचे लक्षात आले त्यानंतर या सर्व भग्न अवस्थेतील मुर्त्या गावकऱयांनी एकत्र करून एका जुन्या मंदिरात ठेवल्या.
गावातील महत्त्वाच्या ठिकाणांमध्ये वेताळ मंदिर (काळ्या पाषाणातील वेताळाची मूर्ती पंचक्रोशीचा कुलदेव म्हणून प्रसिद्ध आहे) वेताळ मंदिरापासूनच काही अंतरावर सातेरी मंदिर असून पंचक्रोशीतील गावांमध्ये ती कुलदेवता मानली जाते. महत्त्वाचे म्हणजे कोकणात अनेक ठिकाणी सातेरीची मूर्ती नसते तर मोठ्या वारुळाचीच पूजा सातेरी म्हणून केली जाते. सृजनात्मक मातृदेवतेचे हे प्रतिकात्मक पूजन मानले जाते. यातील वेताळ मंदिराचा जीर्णोद्धार अलीकडेच काही वर्षांपूर्वी करण्यात आला आहे. ग्रामदेवतेचे हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. गावातील सर्व परंपरा आणि बैठका याच वेताळ मंदिरात होतात. इथूनच सर्व सणवारांची सुरुवातही होते.
याशिवाय महत्त्वाच्या असलेल्या मंदिरांमध्ये महापुरुष मंदिर (परबवाडा), डोंगरावरच्या मारुतीचे मंदिर, म्हाळसा मंदिर, रवळनाथ मंदिर आणि संतीण ढंकीण (जैन मूर्ती- मंदिर) यांचा समावेश होतो.
पेंडूरची ग्रामदेवता असलेल्या सातेरीदेवीच्या मंदिरामागे काही अंतरावर `जैनाचा डोंगर` आहे. आता जंगल बरेचसे विरळ झाले आहे, तरी जाणवण्याइतका रानवटा आहे. आता या गावात एकही जैन कुटुंब नाही, तरी `जैनाचा डोंगर` या स्थळनामाने गावाने येथील प्राचीन जैन संस्कृतीची आठवण जपली आहे. भल्या मोठ्या वारूळ रुपातील सातेरी आणि न्यायदान करणारा वेताळ ही या गावाची मुख्य दैवते. सातेरी मंदिराच्या मागच्या बाजूने जैनाच्या डोंगराकडे पायवाट जाते. काही अंतरावर गेल्यावर रानवटा सुरू होतो. थोडे आत गेल्यावर मंदिराचे भग्नावशेष दिसतात. एक मोठा चौथरा व अर्धवट खांब तेथे पूर्वी मंदिर होते, असे सांगतात. गर्भालयाचे व सभामंडपाचे अवशेष दिसतात. पण मूर्तींची संख्या पाहता हे मंदिर आता चौथरा दिसतो त्याहून खूप मोठे असावे. कदाचित त्या परिसरात मंदिर समूह असावा. येथे पूर्वी नक्षीदार खांब होते, असे गावकरी सांगतात. पण तसे निसर्गहत झालेले खांबही दृष्टीस पडत नाहीत. याचा अर्थ ते पळवले गेले आहेत.
दुर्ग प्रकार : गिरी दुर्ग जवळचे ठिकाण कसाल, समुद्र सपाटी पासून उंची ५५० फूट. निवारा व भोजन व्यवस्था कट्टा, सुकळवाड, कसाल जवळचा महामार्ग क्रमांक ६६, कसाल मालवण रस्त्यावर कसाल पासून १२ किलोमीटर वर कट्टा गाव आहे. कट्ट्यापासून ३-४ किलोमीटर अंतरावर चरीवाडी आहे किंवा कुडाळ मालवण रस्त्यावर काळसे येथे उतरावे. आणि अर्ध्या तासात चरीवाडी गाठावी.
सावंतवाडीच्या सावंतांनी करवीर करांच्या करवीरकरांच्या रांगणा व सिंधुदुर्ग यांच्या मार्गावर बरोबर नेमके स्थळ हेरून तिथे किल्ला बांधून त्यास वेताळ गड नाव दिले. नोव्हेंबर १७८६ ते जाने.१७८७ सावंतांनी गडास वेताळगड असे भयंकर नाव दिले. देण्याचे कारण की गडाजवळ पेंडूर येथे वेताळाचे खूप प्रसिद्ध व मोठे मंदिर आहे. या वेताळाचे प्रस्तही फार मोठे आहे.या वेताळ मुळे सावंतांनी गडास वेताळ असे नाव दिले.
पेंडूर देवीचा मांड एक अद्भुत विलक्षण सोहळा डॉक्टर सोमनाथ परब पेंडूर पेंडूर तालुका मालवण मधील मोठे गाव निसर्गरम्य सुंदर गाव. एका बाजूला वेताळगड, लागूनच हनुमान
पेंडूर गावचा पूर्व इतिहास सुमारे २००० हजार वर्षांपूर्वीची पेंडूर गावाची आख्यायिका अशी सांगितली जाते की, फार पूर्वी या गावात
“देवीच्या गावा”त देवीचा मांड भूमी आणि संस्कृती यांचं नातं मोठं विलक्षण असतं. भूमीच्या अधिष्ठानावर संस्कृती विकसित होत असते. या सदराच्या आरंभीच्या लेखांमधून सिंधुदुर्गाच्या भौगोलिकता, प्रादेशिकता
सातेरी – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाव पंचायतनातील प्रमुख पाच देवतापैकी सातेरी – (शक्ती शांतादुर्गा) ही पंचायतनातील प्रमुख देवता होय. हिला पूर्वसत्तेचे स्थळ मानतात. ही देवता द्रविड
लोकदेव क्षेत्रपाळ श्री रवळनाथ ही कथा कोकणातील रवळनाथ हे शिवाचेच एक रूप. स्वभावाने उग्र व वृत्तीने लढाऊ म्हणजे हा मूळ यक्ष देवाच्या प्रकृतीचा. शाक्तांनी प्राचीन
संतोष शेणई मालवणी मुलुखातील जैन संस्कृतीच्या खुणा पेंडूर (ता. मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग) येथील जंगलात जैन मूर्ती विखुरलेल्या अवस्थेत पडलेल्या
किल्ल्याची ऊंची : 440किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्गडोंगररांग: मालवण, सिंधुदुर्गजिल्हा : सिंधुदुर्गश्रेणी : मध्यम निवारा व भोजन व्यवस्था: कट्टा,सुकळवाड, कसाल कसाल मालवण मार्गावर
उदे ग अंबे उदे ! कोकणातील देवस्थान : देवीचा मांड, पेंडुर (मालवण) संपूर्ण देशभरात एकूण ५१ शक्तीपीठ आहेत आणि त्यातील साडेतीन शक्तिपीठ आपल्या महाराष्ट्रात आहेत.