कसाल मालवण मार्गावर अर्ध्या तासाच्या अंतरावर कट्टा गांव आहे कट्ट्याहून डावीकडे 3-4 कि.मी. चरीवाडी आहे. किंवा कुडाळ मालवण मार्गावर धामापूरला उतरावे व अर्ध्या तासात चरीवाडी गाठावी.
” हे गोष्ट ठीक नसे. तटबंदी व मेढा पाडून टाकणे. तुमचे काय लढे असतील ते माहितगार कारकुना बरोबर सांगोन हुजुर पाठवणे – नारायणराव पेशवे.
सावंतवाडीच्या सावंतांनी करवीरांच्या रांगणा व सिंधुदुर्ग यांच्या मार्गावर बरोबर मध्ये नेमके स्थळ फिरून तिथे किल्ला बांधून त्यास वेताळगड नाव दिले नोव्हेंबर 1776 ते जानेवारी 1787 सावंतांनी गडास वेताळगड असे भयंकर नाव देण्याचे कारण की गडाजवळ पेंडूर येथे वेताळाचे खूप प्रसिद्ध व मोठे मंदिर आहे या वेताळाचे प्रस्थही मोठे आहे या वेताळामुळे सावंतांनी गडास वेताळगड नाव दिले.
एका उंच टेकडीवर घाई गडबडीत गर्दीत बांधलेला वेताळगड म्हणावा तेवढा मजबूत झाला नव्हता पाण्याची कमतरता जाणवत होतीच पण वेताळामुळे करवीरांचा सिंधुदुर्गाशी संपर्क तुटण्याचा धोका होता आणि हेच सावंतांना हवे होते.
सावंतांनी वेताळगडाची केलेली बांधणी व त्यांनी रांगण्यास चालवलेली कारस्थाने समजल्यावर नारायण पेशवे यांनी खेम सावंतांना 19 जानेवारी 1787 रोजी लिहीले की “तुम्हांकडील फितूरही लोकही (करवीरांनी) धरिले व तुम्ही किल्ले रांगणा व किल्ले सिंधुदुर्ग या दोन्ही किल्ल्यांमध्ये तिपणकडा व वेतालखडी (गडी वेताळगड या ठिकाणी बांधले) येथे हाली चिऱ्याची तटबंदी बांधली आहे व लाकडाचा मेंढा घालून लोकांचा जमाव करून किल्ल्यास जमा करून किल्ल्यास व करवीर प्रांतात उपसर्ग करितां.”
वेताळगड वेताळाप्रमाणे करवीरांना सतावणार हे करवीरकर व पेशवे देखील जाणून होते त्यामुळेच पेशवे वरील पत्रात सावंतांना पुढे ताकीद करतात की, “हे गोष्ट ठीक नसे…. तटबंदी व मेंढा पाडून टाकणे… तुमचे काय लढे असतील ते माहितगार कारकुना बरोबर सांगोन हुजूर पाठवणे समजोव घेऊन आज्ञा करणे ते केला जाईल तोपर्यंत करवीर प्रांतात कोणाविसी उपद्रव न करणे फिरून बोंभाट येऊ न देणे”
पहिले मोर्चिल प्रकरण व आता सावंत यांनी किल्ला बांधण्याची पाहून करवीर छत्रपतींनी सन १७८७ मध्ये घोटगे घाटाने खाली उतरत मालवण मार्गावरील नांदोसीस तळ दिला होता. करवीरांनी सावंतांचे काही गड ताब्यात घेतले.सावंतची पीछेहाट चालू होती. पेशव्यांनी मध्यस्थीसाठी कारकून पाठवले आणि करवीरकरांनी आपला कारकून सावंताकडे पाठवला परंतु करवीरकर बोलल्याप्रमाणे वागले नाहीत असा आरोप सावंतानी केला यासंबंधी 27 जानेवारी 1788 रोजी खेम सावंत यांनी शिंदे यांना लिहिले की,
” महाराजांनी तीपनखडी व वेताळगडीविसी…. कारकून आला म्हणावा त्याचे बोलणे दोही ठाणेतील सीबंदी काढोन पाच माणसे ठेवावी हे व कागदी ही तोच आशये त्यास आम्हास पंतप्रधान यांचे लक्ष राखणे हे सर्वपरी त्या अर्थे दोन्ही मेढेतील सीबंदी काढून पाच माणसे ठेवावी हा करार करोन चिंटया दिल्या.”
” करवीरासी फौजसुधा घाटामाथा माघारे स्वस्थलास जावे आणि कराराप्रमाणे सीबंदी आणावी त्यास करवीरवासी नारूराहून घाट चढोन (रांगणा जवळ) तिकडूनच घोडगेचे घाटांने नरसिंहगडाखाली उतरोन हेरडवेहून मालवण नजीक तळ दिला तेव्हा कारकून व खिजमतगार यांचे बोलणेस फेर (फरक) पडला तेव्हा सीबंदी मेंढेतील कसी काढावी ही विवंचना प्राप्त झाली.”
” करवीरकर यांणी वेताळगडीच येऊन मारामार करू लागले. ते समई कारकून येते आम्हापासी होते त्यासी आम्ही पुसिले की, तुम्ही बोलता हे काये आण ते घाटाखाली उतरोन पुन्हा कलह करू लागले तेव्हा तुमचे बोलणे कोठे राहिले त्यास कारकून यांणी आम्हास सांगितले की, वेताळगड व तीपनखडीची सीबंदी सरकार आज्ञेप्रमाणे पाच माणसे ठेवून वरकड काढावी महाराजास घाटावर घालवणे आम्ही करितो हा आग्रह केला तेव्हा आम्ही दोन्ही कडेस मागती चिठ्ठ्या देऊन घालविले तीपनखडीचे लोक इकडील आज्ञेप्रमाणे आले वेताळगड लोक पावेत व आगोदर त्यांणी गडी घेतली.”
म्हणजे करवीरांनी नांदोस ते सावंतांच्या सैन्याचा पराभव केल्यावर वेताळगडावर चाल केली तेथे मारामारी करीत गडहस्तगत केला अशा तऱ्हेने वेताळगड करवीरांच्या ताब्यात आला आता रांगणा मालवण मार्गावर देखरेख ठेवण्यासाठी करवीरांना वेताळगड सोयीचा झाला
कसाल मालवण मार्गावरुन कट्टापासून डाव्या हातात धामापूर तलावाच्या वाटेवरील तीन किमी अंतरावर चरीवाडी आहे. या लहानशा वाडीला खेटूनच वेताळगड उभा आहे गड फारसा उंच नाही. अर्धा पाहून तासात गडावर पोहोचता येईल. तर बुरुज दरवाजे इतिहास जमा झाले आहेत पाण्याच्या टाक्यांचे अवशेष आहेत. पण पाणी नाही गावातील लोकांच्या मते गडाबाहेर पाण्याची सोय आहे. मात्र त्याचे ठावठिकाण सापडणे अवघड चरिवाडीतून पाणी सोबत घेणे उत्तम
गडाला विस्तृत पठार बांधले आहे. गडावरून आजूबाजूचा परिसर पाहता असता सावधगिरी बाळगण्यास विसरू नये. कारण गडावर बिबट्यांची बिळे आहेत बिबटे व डुकरांची संख्या बऱ्याच पैकी आहे. बिबट्यांचे दर्शन होण्याची शक्यता फार तेव्हा थोडेच सांभाळून राहणे आवश्यक आहे.
सन 1862 मध्ये इंग्रजांच्या पाहणीत गडाची तटबंदी अगदीच मोडकळीस आली होती व किल्ल्यात धान्य व पाण्याचा चांगला पुरवठा होता.
जवळची प्रेक्षणीय ठिकाणे –
पेंडूर – कट्ट्यागांवातून गड पायथ्याच्या चरिवाडीत जाण्यापूर्वी धामापुर रस्त्यावरील पेंडूर गावात उतरणे या गावात वेताळ उर्फ वेतोबाचे खूप मोठे आणि प्रसिध्द मंदिर आहे. या वेताळाचा व पंचक्रोशीत खूप दरारा आहे असंख्य लोक आपली गा-हाणी घेऊन इथे येतात.इथे यात्रेच्या वेळी मोठ्या संख्येने भावी येतात.
धामापूर तलाव – पेंडूरच्या पुढे धामापूर गावालगद धामापूरचा सुंदर तलाव आहे गावातून दिशेने चालत निघाल्यावर पंधरा मिनिटात आपण धामापुर तलावासाठी पोहोचतो सर्व बाजूंनी डोंगरांनी वेढलेला हा भला मोठा तलाव सुंदर आहे तलावा काटच्या कच्च्या रस्त्याने वीस मिनिटात धामापूर गाठून धामापूरला तलावागाठी मुक्काम करता येईल.