Tourist Guiding Identification Card
0 0
Read Time:6 Minute, 51 Second

– हनुमंत हेडे पर्यटन संचनालय कोकण विभाग

मालवण (प्रतिनिधी)
सिंधुदुर्ग जिल्हा हा आज पर्यटन जिल्हा म्हणून नावारूपाला आला असल्याने पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या साहसी जलक्रीडा व्यवसायातही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे त्यामुळे जलक्रीडा व्यावसायिकांनी व्यवसाय नोंदणी करणे महत्वाचे असून या व्यवसायातील जलक्रीडा करणाऱ्या बोट चालक व कर्मचाऱ्यांना पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या प्रशिक्षण देणे गरजेचे आहे हे जाणून घेऊनच आजचे हे प्रशिक्षण आयोजित केले गेले आहे. या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन जलक्रीडा व्यावसायिकांनी आपल्याकडे येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन चांगली सेवा देत आपल्या प्रगतीबरोबरच पर्यटन वृद्धीसाठी प्रयत्न करावेत असे प्रतिपादन महाराष्ट्र पर्यटन विकास संचालनालय कोकण विभागाचे उपसंचालक हनुमंत हेडे यांनी येथे बोलताना केले.

जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग, मेरीटाइम बोर्ड वेंगुर्ला , पर्यटन संचालनालय कोकण विभाग आपत्ती व्यवस्थापन आणि पर्यटन महासंघ यांच्या वतीने कोळंब येथील समर्थ मंगल कार्यालयात जलपर्यटन व्यावसायिक यांच्यासाठी बोट सुरक्षितता प्रशिक्षण २४ ते २६ ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात आले असून त्याचे उद्घाटन पर्यटन संचालनालय कोकण विभागाचे उपसंचालक हनुमंत हेडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रादेशिक बंदर अधिकारी कॅ. संदीप भुजबळ, सिंधुदुर्गच्या आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीमती राजश्री सामंत, सागरी सुरक्षा शाखा देवगडचे पोलीस उपनिरीक्षक विक्रांत कुंभार, राष्ट्रीय जलक्रीडा संस्थेचे समीर कोसबे, निसर्ग पर्यटन संस्थेचे संचालक संजय नाईक, कोकण पर्यटन व्यवसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर, कोकण समनव्यक रायगड संजय नाईक तालुकाध्यक्ष अविनाश सामंत, गुरुनाथ राणे, राजेंद्र परुळेकर, दामोदर तोडणकर, सहदेव बापर्डेकर आदी व इतर उपस्थित होते.

यावेळी बाबा मोंडकर यांनी प्रास्ताविक करत प्रशिक्षणाची माहिती दिली. तर अविनाश सामंत यांनी उपस्थितांचे स्वागत केले

यावेळी मार्गदर्शन करताना हनुमंत हेडे म्हणाले, जलक्रीडा व्यावसायिकांनी पर्यटकांना चांगली सेवा दिली तरच पर्यटक स्तुती करतील मात्र फसवेगिरी केली तर येथील पर्यटनाबाबत चुकीची माहिती व संदेश पसरविले जातील. त्यातून पर्यटन व्यावसायिकांचे नुकसान होऊन या भागाचीही बदनामी होईल. यामुळे प्रशासनाला देखील अनेक गोष्टींना सामोरे जावे लागते. हे होऊ नये म्हणूनच नियम पाळून सेवा चांगली द्यावी. प्रशासन नियम करत असते, मात्र सर्वच गोष्टींवर प्रशासन लक्ष ठेवू शकत नाही. नियमांची अंमलबजावणी ही व्यावसायिकांनी केली पाहिजे. पर्यटक कोणत्याही वर्गातील असो त्याच्या कडून नियमांचे पालन करून घेतले पाहिजे. त्याला सुरक्षिततेचे महत्व पटवून देऊन प्रत्येकाला नियम बंधनकारक केले पाहिजे. आजच्या प्रशिक्षणाचा लाभ व्यावसायिकांनी घेऊन व्यवसायात प्रगती करावी असेही श्री. हेडे म्हणाले.

यावेळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत यांनी जिल्ह्यातील साहसी जलक्रीडा पर्यटन व्यवसाय सुस्थितीत व नियमबद्ध चालण्यासाठी प्रशासन नेहमीच प्रयत्न करत आहे. मात्र एखाद्या दुर्घटनेमुळे गालबोट लागते. हे टाळण्यासाठी जलक्रीडा व्यवसायात योग्य ती खबरदारी घेण्यासाठी आजच्या प्रशिक्षणाचा जकक्रीडा व्यावसायिकांनी लाभ घ्यावा. प्रशासनाने प्रयत्न केले तरी स्थानिक व्यावसायिकांनी साथ देणे महत्वाचे आहे. दोघांनीही हातात हात घालून काम केल्यास पर्यटन वृद्धी होण्यासही मदत होईल असेही सामंत म्हणाल्या. तर प्रादेशिक बंदर अधिकारी कॅ. भुजबळ म्हणाले, आज जिल्ह्याच्या किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात जलक्रीडा व्यवसाय होत असून यात एखाद्या चुकीमुळे अपघात किंवा जीवितहानी झाल्यास त्याचा मोठा आघात पर्यटनावर होऊ शकतो. म्हणूनच व्यावसायिकांनी कायदेशीर प्रवाहात येऊन व्यवसाय नोंदणी करावी, प्रशिक्षण घ्यावे. पर्यटकांची सुरक्षितता ही व्यावसायिकांच्या हातात असून पर्यटकांची पार्श्वभूमी लक्षात घेऊन जलक्रीडा व्यावसायिकांनी व्यवसायात चांगले बदल करत राहावे असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय सातार्डेकर यांनी केले. उद्घाटन कार्यक्रमानंतर दिवसभर उपस्थित जलक्रीडा व बोट व्यावसायिकांना मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षणास जलक्रीडा व बोट व्यावसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठी उपस्थिती दर्शवली होती.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

You missed

Solar Energy