1 1
Read Time:2 Minute, 1 Second

दि. २८ ऑगस्ट रोजी गारवा बीच रिसॉर्ट कोळथरे ता.दापोली, जिल्हा रत्नागिरी येथे पर्यटन विकासाविषयी चर्चासत्रात कोकण पर्यटन व्यवसायिक महासंघाचे कोकण समन्वयक श्री.संजय नाईक रायगड यांनी मार्गदर्शन केले ह्या वेळी पर्यटन कसे वाढवता येईल. तसेच पर्यटकांना कश्या चांगल्या सुविधा देता येतील बीच पर्यटन, ग्रामीण पर्यटन, साहसी पर्यटन, तसेच टुरिस्ट गाईड प्रशिक्षण, हॉस्पिलिटी प्रक्षिशण देऊन काही मुलांना तसेच हॉटेल व्यावसायिकांना कसे तयार करता येईल. त्यातून कश्या प्रकारे रोजगार निर्मिती करता येईल? ह्या सगळ्या विषयावर सकारात्मक चर्चा करण्यात आली.

जिल्हा जलपर्यटन सुरू करण्यासाठी आता पर्यटन संचनालयाच्या नोंदणीची आवश्यकता असल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील जलपर्यटन व्यवसायिकांसाठी नोंदणी प्रक्रियेत मदत करण्यासंबंधी जलपर्यटन व्यवसायिकांना एकत्र करून त्याच्या साठी लवकरच चर्चासत्र तसेच नोंदणी कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे कोकण पर्यटन व्यवसायिक महासंघाचे अध्यक्ष श्री. विष्णू मोंडकर यांनी दूरध्वनीवर सांगितले.

यावेळी श्री संजय नाईक. सौ श्वेता नाईक, श्री. संजय काशीद आणि इतरदापोली मुरुड यथील पर्यटन व्यवसायिक उपस्थित होते. सर्व मान्यवर व उपस्थितांचे रत्नागिरी जिल्हा समन्वयक श्री संजय काशीद यांनी आभार मानले.

Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

You missed

Solar Energy