किशोर दाभोलकर यांचा इंडिया टुरिझम कडून सत्कार.किशोर दाभोलकर यांचा इंडिया टुरिझम कडून सत्कार.
0 0
Read Time:2 Minute, 45 Second

मुंबई दि.७- पर्यटन क्षेत्रातील होणारे बदल आणि त्यादृष्टीने करावयाचे उपाय योजना आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकासाला गती देण्यासाठी भारत सरकारच्या पर्यटक मंत्रालयामार्फत दोन दिवसाची कार्यशाळा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात घेणार असल्याची माहिती केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचे सहसंचालक वेंकटेशन धट्टारेन यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक सोशल मीडिया प्रमुख किशोर दाभोळकर याना केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या मुंबई येथील कार्यालया कडून साऊथ रिजनल डायरेक्टर श्री. व्यंकटेशन यांनी कार्यालयात बोलावून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विस्तार संदर्भात चर्चा केली. त्यावेळी व्यंकटेशन यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन वाढीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले .यावेळी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचे सहाय्यक संचालक जगदीप ठोंबरे भावना शिंदे उपस्थित होत्या .यावेळी त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनवाढीसाठी निवास न्याहारी योजना तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टूर ऑपरेटरना मार्गदर्शन करणार असल्याचे सांगितले. सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातीलच नव्हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील एक निसर्गसंपन्न जिल्हा आहे. पर्यटनवाढीसाठी जिल्ह्यात अनेक प्रकारे वाढ करता येऊ शकते. त्यादृष्टीने केंद्र शासनाच्या पर्यटन मंत्रालयामार्फत वेळोवेळी सहाय्य केले जाईल असे श्री वेंकटेशन यांनी यावेळी सांगितले. दाभोलकर यांनी सोशल मीडियाद्वारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची ओळख देशवासियांना सनवी सर्व जगातील पर्यटकांना करून दिल्याबद्दल व्यंकटेशन यांनी दाभोलकर यांचा सत्कार यावेळी केला.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

You missed

Solar Energy