0 0
Read Time:6 Minute, 14 Second

जागतिक पर्यटन दिवस दरवर्षी 27 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येतो. संयुक्तराष्ट्राची जागतिक पर्यटन संस्था UNWTO 1970 सालात याच दिवशी स्थापन झालेली होती म्हणून याच दिवशी 1980 पासून जागतिक पर्यटन दिवस साजरा केला जातो. पर्यटन विषयक नवनवीन संकल्पना साकारकरण्याचा प्रयत्नकेला ‍जातो.

आपला सिंधुदूर्ग निसर्ग संपन्न आहे. पर्यटन जिल्हा घोषीत करण्यात आलेला आहे. मोठा गाजावाजा करुन मोठ मोठी स्वप्ने जनतेला दाखवीण्यात आली. ती सर्व स्वप्ने सत्यात उतरली देखील असती. मात्र राजकीय अनास्थेमुळे आजही आपल्या जिल्हयाचा पर्यटनाच्या दृष्टीने काय विकास झाला ? याचा विचार केला तर आपला अपेक्षाभंग होतो.

आपल्या जिल्हयाला लाभलेली विस्तर्ण किनारपटटी असो कींवा दुस-या बाजूने असलेल्या सहयाद्रीच्या पर्वतरांगा असतील यामध्ये अनेक पर्यटन स्थळे जगातील सर्वच पर्यटकांना आकर्षीत करत आहेत.

आज आपण पर्यटन विकासाच्या अनुषंगाने येथील जनतेचा विचार केला तर आपण फक्त आणि फक्त न्याहरी निवास योजनेतच गुरफटलेलो दिसतोय. पर्यटनाच्या दृष्टीने आपश्यक पायाभूत सुवीधा कधी निर्माण होणार ?‍ उभारलेल्या सुवीधांची देखभाल कोण करणार ? हे सर्व प्रश्न अनुत्तरीतच आहेत. आज एखाद्या पर्यटन स्थळी पर्यटकाने भेट दील्यावर आवश्यक त्या पायभूत सुवीधा देखील नाहीत. वेंगुर्ला बंदर असो, आंबोली येथील मुख्य धबधबा असो कोणतेही पर्यटन स्थळ विचारात घ्या त्याठीकाणी किमान महीलांकरीता तरी प्रसाधन गृह आवश्यक आहेत ती नाहीत ज्या एक दोन ठीकाणी आहेत त्याची अवस्था पाहीली तर त्याचा वापर कुणीही करणार नाहीत अशीच दिसतील.

आज सिंधुदूर्ग मधील रस्त्यांबाबतीत तर आपण सर्वजण जाणतो एकही रस्ता व्यवस्थीत नाही. पर्यटन स्थळांकडे जाणारे रस्तेच चांगले नसतील तर त्या पर्यटकांचा प्रवास कसा होत असेल याचाही विचार न केलेला बरा.. आज आपल्या जिल्हयातील बहुसंख्य पर्यटन स्थळांपर्यंन्त व्होल्वो सारख्या आरामदायी बस जाऊ शकत नाहीत. अनेक टुर कंपन्या विविध सहलींचे आयोजन करीत असतात मात्र पर्यटकांची पसंती सिंधुदूर्ग साठी असते अपू-या सुवीधांमुळे ती पूर्ण होत नाही. एखाद्या कंपीनेचे कीमान 40 पर्यटक म्हणजे कीमान 20 कपल जर सिंधुदूर्गात आणायचे म्हटले तर किमान 20 ते 25 रुम एकत्र असणारी हॉटेल आज तरी उपलब्धनाहीत.यामुळे अनेक टूर कंपन्या पर्यटकांना गोव्यात राहण्याची सोय करतात आणी लहान आकाराच्या गाडीने एकाद्या दिवसा करीता सिंधुदूर्गात आणतात. आपण कधी या सर्वसेवा सुवीधी पुरवीण्यासाठी कधी सक्षम होणार आहोत हा विचार सर्व सिधुदूर्ग वासीयांनी करणे गरजेचे आहे.

सिंधुदूर्ग जिल्हयाच्या पर्यटन विकासासाठी प्रत्येक राजकीय पक्ष विविध प्रकल्पांच्या घोषणा करीत असतात त्यातले काही प्रकल्प सुरु होतात काही अर्धवट राहतात सर्व राजकीय पक्ष एकमेकांच्या प्रकल्पाना विरोध करतांना दिसतात. सागरी महामार्ग असेल, मुंबई गोवामहा मार्ग असेले कींवा जिल्हयातील अंतर्गत रस्ते असतील एकही रस्ता चांगला दिसत नाही.

सर्व कीनारपटटी रेल्वेने जोडण्याबाबतचा एक नवीन पर्यटनाच्या वाढीसाठीचा प्रकल्पावर वीचार सुरु आहे. अशी रेल्वे सेवा सुरु झाली तर फायदा आहेच. मात्र आपल्याकडे विस्तीर्ण अशी कीनारपटटी आहे त्याचा वापर पूर्वी प्रमाणे प्रवासी वाहतूकी साठी झाला तर कीतीतरी गावांचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. प्रवासी आणि पर्यटनाच्या बाबतीत एक नवीन संकल्पना आपल्या कडे राबवीली जाऊ शकते. हाऊसबोट सारखे प्रकल्पअसोत कींवा प्रवासी व माल वाहतूक देखील जलमार्गाने होऊ शकते.

मात्र अशा योजनांचा अभ्यास करण्यासाठी आपल्या कडील राजकीय पक्ष नेते यांना वेळ नाही हे आपले दुर्दव म्हणावे लागेल.

आज जागतिक पर्यटन दिन आपल्या सिंधुदूर्गात देखील मोठया उत्साहात साजरा केला जाईल. आपल्या पर्यटन जिल्हयाच्या विकासासाठी मोठ मोठया घोषणा देखील दिल्या जातील मात्र त्या सर्व पूर्णत्वास कधी जातील याचे नेमके उत्तर कुणाकडेच नसेल.

प्राचार्य समीर बाळकृष्ण तारी,
माता वैष्णोदेवी महाविद्यालय,
ओसारगाव, सिंधुदूर्ग

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

You missed

Solar Energy