जागतिक पर्यटन दिन 27 सप्टेंबरजागतिक पर्यटन दिन 27 सप्टेंबर
0 0
Read Time:2 Minute, 42 Second

तारकर्ली मध्ये एमटीडीसी ने सुरू केलेले पहिले रिसॅार्ट व त्यानंतर तारकर्ली,देवबाग,वायरी या संस्थेच्या कार्यक्षेत्रात आलेली पर्यटन समद्धी या सर्वांची साक्षीदार असलेली आपली संस्था आहे. दरम्यानच्या काळात पर्यटन संबंधीत आलेल्या अनेक समस्यांवर संस्थेने आपण सर्वांच्या संघटीतपणाने काम केले व समस्या सोडविल्या.

आजच्या डिजीटल युगात आपण संस्था म्हणून आपला ऑनलाइन प्रेज़ेंस असला पाहिजे व हि काळाची गरज आहे, त्यासाठी हे पहिले पाऊल आहे.

वेबसाईट लॅांन्च झाल्यानंतर संस्थेतील सर्व मेंबरच्या हॅाटेलची प्रथम वर्गवारी (होमस्टे,हॅाटेल,कॅाटेज,बंगलो ई. ) नुसार बनवली जाईल व सिजन/नॅानसिजन चे ढोबळमामाने रेट प्रमाणे द्वीतीय वर्गवारी करून यादी वेबसाईटवर दिली जाईल.

संस्थेचे तारकर्ली वायरी देवबाग या पर्यटन क्षेत्रात असलेले काम, अस्तित्व , जबाबदारी, शाश्वत पर्यटनाच्या अनुशंगाने कटिबद्धता, पर्यटकांना समस्या उद्भवल्यास समस्या निवारण्यासाठी रॅपिड ॲक्शन टीम व हेल्पलाईन नंबर व या सर्व गोष्टींच्या अनुशंगाने स्थानिक पर्यटन व्यवसायिकांना ग्लोबल प्लॅटफोर्म बनविणे या उद्देशांसाठी संस्थेने आपल्या जवळच्या लोकल सोशल मिडीया ईंन्फुएंसर जसे की अंकीता प्रभुवालावलकर,लकी कांबळी,वैभव तळगावकर यांच्याशी सकारात्मक चर्चा केलेली आहे व पुढील दिशा ठरविलेली आहे. तसेच प्रसाद गावडे,प्रगत लोके यांच्याही माध्यमातूनही काम करण्याचा संसथेचा मानस आहे.
या सर्व प्रक्रियेत पहिले पाऊल वेबसाईट उद्घाटन कार्यक्रमात सर्व टिटिडीएस कुटुंबीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे ही विनंती करत आहोत.
स्थळ :सिंधुदुर्ग किल्ला मालवण
सकाळी १०:३० वाजता बंदर जेटी येथे

  • सहदेव साळगांवकर
    अध्यक्ष
    तारकर्ली पर्यटन विकास संस्था (रजि.)
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

You missed

Solar Energy