रत्नागिरी जिल्हास्तरीय विकासरत्नागिरी जिल्हास्तरीय विकास
0 0
Read Time:3 Minute, 52 Second

श्री विष्णू मोंडकर अध्यक्,पर्यटन व्यावसायिक महासंघ

सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा असून सागरी पर्यटना सोबत जिल्ह्यातील ऍग्रो ,हिस्ट्री ,कल्चर,मेडिकल टुरिझम ,कातळशिल्प पर्यटन,साहसी पर्यटन फूड टुरिझम क्षेत्रात जिल्हा अग्रेसर होण्यासाठी पर्यटन व्यावसायिक महासंघ कार्यरत आहे .सिंधुदुर्ग जिल्हातील ग्रामपंचायत स्तरावर सरपंच यांच्या अध्यतेखाली जिल्ह्यातील 431 ग्रामपंचायत स्तरावर पर्यटन ग्राम समिती गठीत होत आहेत पर्यटन जिल्हा घोषित होऊन २५ वर्ष प्रतिक्षेत असलेल्या जिल्ह्यांत पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या माध्यमातून ग्रामस्तरावर पर्यटन वाढींसाठी नियोजित कार्यास सुरुवात झाली आहे.महाराष्ट्र राज्यातील कोकण विभागातील सिंधुदुर्ग हा एकमेव जिल्हा आहे त्यांच्या ग्रामपर्यटन समिती ग्रामपंचायत स्तरावर गठीत झाल्या आहेत या बद्दल श्री प्रजीत नायर ,मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे योगदान महत्वाचे असून ग्रामविकासअधिकारी ,सरपंच,ग्रामसेवक यांचे ही सहकार्य लाभले आहे .ग्रामस्तरावर गठीत झालेल्या पर्यटन समितीची पुढील कार्यपद्धती काय असावी,कशा प्रकारे पर्यटन क्षेत्रात कार्य व्हावे यासाठी जिल्ह्यापारिषद सिंधुदुर्ग व पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या वतीने पर्यटन मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून जिह्यातील प्रत्येक तालुका स्तरावर दिनांक २०/७/२३ ते२४/७/२३ या काळात प्रत्येक तालुक्याच्या पंचायत समिती सभागृहात पर्यटन कार्यशाळा आयोजित होणार असून तसे आदेश श्री प्रजीत नायर मुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग यांनी गट विकास अधिकारी यांना दिले आहेत गुरवार दिनांक 20/7/23 रोजा सकाळी 10.30 कणकवली दुपारी 2 वाजता वैभववाडी शुक्रवार दिनांक 21/7/23 रोजी सकाळी 10.30 वाजता सावंतवाडी दुपारी 2 वाजता दोडामार्ग शनिवार दिनांक 22/7/23 रोजी सकाळी 10.30 वा.मालवण दुपारी 2 वाजता देवगड दिनांक 24/7/23 रोजी सकाळी 10.30 वा .वेंगुर्ला दूपारी 2 वाजता कुडाळ तालुक्यात पर्यटन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे यासाठी राज्य सरकारच्या वतीने मा .जिल्ह्याचे पालकमंत्री श्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या सहकार्याने श्री हनुमंत हेडे,उपसंचालक पर्यटन संचानलाय ,कोकण विभाग हे स्वतः उपस्थित राहून गठीत पर्यटन समितीस मार्गदर्शन करणार आहेत.ज्या माध्यमातून ग्राम स्तरावर पर्यटन वाढीसाठी नियोजित कामाची सुरवात होईल.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

You missed

Solar Energy