Paryatan Samiti Sindhudurg MeetParyatan Samiti Sindhudurg Meet
0 0
Read Time:3 Minute, 14 Second

प्रवासी रिक्षा चालक मालक यांची रविवार दिनांक 23/7/23 रोजी संध्याकाळी 4 वाजता पर्यटन व्यावसायिक महासंघ व पर्यटन संचानलाय यांच्या माध्यमातून पर्यटन आदरतिथ्य मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन केले असून यासाठी जिह्यातील रिक्षा प्रवासी चालक ,मालक यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पर्यटन व्यावसायिक महासंघातर्फे करण्यात येत आहे .
सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा असून सागरी पर्यटना सोबत जिल्ह्यातील ऍग्रो ,हिस्ट्री ,कल्चर,मेडिकल टुरिझम ,कातळशिल्प पर्यटन,साहसी पर्यटन फूड टुरिझम क्षेत्रात जिल्हा अग्रेसर होण्यासाठी पर्यटन व्यावसायिक महासंघ कार्यरत आहे .सिंधुदुर्ग जिल्हातील ग्रामपंचायत स्तरावर सरपंच यांच्या अध्यतेखाली जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावर पर्यटन ग्राम समिती गठीत होत आहेत पर्यटन जिल्हा घोषित होऊन २५ वर्ष प्रतिशेत असलेल्या जिल्ह्यांत पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या माध्यमातून ग्रामस्तरावर पर्यटन वाढींसाठी नियोजित कार्यास सुरुवात झाली आहे परंतु पर्यटन व्यवसायास खऱ्या अर्थाने समन्वयक असलेले रिक्षा व्यावसायिक मात्र उपेक्षित आहेत त्या व्यवसायिकांना पर्यटन क्षेत्राच्या मुख्य प्रवाहात आणून प्रशासकीय पातळीवर त्यांच्या असलेल्या अडचणी त्यांच्या समस्या मार्गी लावून प्रशासकीय पातळीवर रिक्षा व्यावसायिकास टुरिस्ट गाईड म्हणून मान्यता देणे तसेच त्यांना पर्यटकांना आदरतिथ्या विषयी मार्गदर्शन करणेसाठी रविवार दिनांक 23/7/23 रोजी संध्याकाळी 4 वाजता रिक्षा प्रवासी वाहतूक चालक मालक यांना पर्यटक आदरतिथ्य मार्गदर्शन कार्यशाळेचे हॉटेल चिवला बीच या ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे. यासाठी राज्य सरकारच्या वतीने मा .जिल्ह्याचे पालकमंत्री श्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या सहकार्याने श्री हनुमंत हेडे,उपसंचालक पर्यटन संचनालय ,कोकण विभाग हे स्वतः उपस्थित राहून गठीत पर्यटन समितीस मार्गदर्शन करणार आहेत.ज्या माध्यमातून ग्राम स्तरावर पर्यटन वाढीसाठी नियोजित कामाची सुरवात होईल.

Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

One thought on “सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन वाढीसाठी पर्यटन महासंघाच्या वतीने रिक्षा व्यावसायिकांच्या पर्यटक आदरतिथ्य मार्गदर्शन विषयी जिल्हास्तरीय पर्यटन मार्गदर्शन कार्यशाळा :-श्री विष्णू मोंडकर अध्यक्ष ,पर्यटन व्यावसायिक व्यावसायिक महासंघ

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

You missed

Solar Energy