0 0
Read Time:5 Minute, 53 Second

मालवण दि प्रतिनिधी
गेल्या कित्येक वर्षापासून झाडाझुडुपांच्या विळख्यात सापडलेल्या आणि काहीशी दुर्लक्षित असलेल्या मालवण कसाल हमरस्त्यावरील साळेल गावातील पोखरबाव अर्थात शिवकालीन विहीरीला झाडाझुडुपांपासून शेकडो शिवप्रेमी आणि ग्रामस्थांनी मुक्तता केल्याने या शिवकालीन विहिरीने काहीसा मोकळा श्वास घेतला. साळेल येथील पुरातन अशा या शिवकालीन विहिरीबरोबरच आजूबाजूच्या परिसराची साफसफाई आणि डागडुजी शिवप्रेमी व ग्रामस्थांनी केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराने सारा आसमंत दुमदुमून गेला.

मालवण कसाल हमरस्त्यावरील साळेल मुख्य एसटी बस थांब्या नजीक दुर्लक्षित असलेली पोखरबाव अर्थात शिवकालीन विहिर ही सिंधुदुर्ग एडव्हेंचरच डॉ. कमलेश चव्हाण यांनी गेल्याच महिन्यात युट्युब आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रकाशझोतात आणली होती. ही विहीर झाडाझुडुपांच्या विळख्यात सापडल्याचे डॉ. चव्हाण यांनी सोशल मीडियाद्वारे प्रसारित करून या शिवकालीन विहिरीची डागडुजी होणे गरजेचे असल्याचे म्हटले होते. सोशल मीडियावरील या वृत्ताची माहिती ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल देसाई यांना समजताच त्यांनी डॉ. कमलेश चव्हाण यांच्याशी संपर्क साधून माहिती जाणून घेत मातृत्व आधार फाउंडेशनचे संस्थापक संतोष लुडबे यांच्या बरोबर चव्हाण यांची चर्चा घडवून आणली होती. या चर्चेत या विहिरीची साफसफाई करून डागडुजी करण्याचे ठरविण्यात आले होते. त्यानंतर या कामाला अनेक सामाजिक संस्थांनी तसेच ग्रामस्थ आणि सेवानिवृत्त पोलीस अधिकारी शिवाजी फोफळे, माजी प. स. सदस्य कमलाकर गावडे, मातृत्व आधार फाउंडेशनचे संतोष लुडबे, दादा वेंगुर्लेकर, पत्रकार सिद्धेश आचरेकर यांनी श्रमदान मोहीम राबविण्याचे ठरविले त्यासाठी आजचा दिवस करण्यात आला होता. आज सकाळी साळेल ग्रामस्थ, सिंधुदुर्ग एडव्हेंचर, पर्यटन व्यवसायिक महासंघ, मातृत्व आधार फाउंडेशन, दुर्गवीर प्रतिष्ठान, कांदळवन प्रतिष्ठान, ऍट युथ बिट्स फॉर क्लायमेट हे साळेल पोखरबाव येथे एकत्र आले. यावेळी माजी प. स. सदस्य कमलाकर गावडे, कमलेश चव्हाण, संतोष लुडबे, सहाय्यक गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, सरकारी वकील हृदयनाथ चव्हाण, पर्यटन व्यावसायिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाबा मोंडकर, अविनाश सामंत, दादा वेंगुर्लेकर, मिथिलेश मिठबावकर, साळेल सरपंच साक्षी जाधव, उपसरपंच रवींद्र साळकर, भानजी गावडे, भटा परब, पोलीस पाटील रवींद्र गावडे, स्वाती पारकर, दिक्षा लुडबे, मीना घुर्ये, समीक्षा मयेकर, कांदळवन प्रतिष्ठानचे केदार पालव, दिपक जाधव, मोहिनी भिंगारे, शुभम सावंत, मयूर पानसरे आदी व इतर उपस्थित होते

विहिरीच्या दगडांमधून उगवलेल्या झाडांमुळे पुरातन बांधकाम ढासळत चालले होते. ही बाब लक्षात घेता विहिरीमध्ये वाढलेल्या झाडांची कटाई करण्यात आली. पर्यावरणाचा विचार करताना पर्यटन दिनी साळेल गावामध्ये घरोघरी वृक्षारोपण करण्यात येणार असल्याचे कमलाकर गावडे यांनी सांगितले. विहिरीला गतवैभव प्राप्त करण्यासाठी साळेलवासीय व शिवप्रेमींनी उचललेले पाऊल कौतुकास्पद आहे. येणाऱ्या काळात पर्यटनाच्या माध्यमातून शिवकालीन विहिरीला प्रकाशझोतात आणण्यासाठी पर्यटन व्यावसायिक महासंघ पुढाकार घेईल, असे मोंडकर यांनी सांगितले. यावेळी पोफळे यांनीही मार्गदर्शन करत युवा वर्गाला स्पर्धा परीक्षांकडे वळा, आपले सदैव मार्गदर्शन राहील असे सांगितले.

दीपोत्सव साजरा करणार!
साळेल गाव पर्यटन नकाशावर आणायचा आहे. त्यादृष्टीने येणाऱ्या काळात नियोजन केले जाणार आहे. शिवकालीन विहिरीची महाराष्ट्र पर्यटन तसेच भारत पर्यटन च्या संकेतस्थळावर नोंद घेतली जाणार आहे. त्यासाठी वार्षिक दीपोत्सवही साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

You missed

Solar Energy