रत्नागिरी जिल्हास्तरीय विकासरत्नागिरी जिल्हास्तरीय विकास
0 0
Read Time:2 Minute, 2 Second

रत्नागिरी जिल्हाधिकारी श्री एम देवेंदर सिंघ यांनी रत्नागिरी जिल्हास्तरीय पर्यटन उपसमिती सदस्य पदी श्री विष्णू मोंडकर अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ यांची नियुक्ती केली असून १३ सदस्य या समिती मध्ये असून या समितीचे अध्यक्ष उपसंचालक पर्यटन संचालक मुंबई हे असणार आहेत या समितीच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्याचा पर्यटन विकास आराखडा बनविला जाणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करताना पर्यटन क्षेत्रातील शक्तीस्थानाचा विचार करतांनाच कच्चे दुवेही अधोरेखित करून त्यावर उपाययोजना सुचवून जिल्ह्याचा विकास आराखडा बनवायचा असून सदर पर्यटन विकास आरखडा तयार झाल्यानंतर तो इतरांसाठी पथदर्शी ठरेल असा असावा हा मुख्य उद्धेश आहे.
या संबंधी श्री विष्णू मोंडकर यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी यांचे आभार मानले असून रत्नागिरी जिल्हा पर्यटन विकास आराखडा बनविताना येणाऱ्या काळात रत्नागिरी जिल्ह्यासोबत संपूर्ण कोकणच्या पर्यटन व्यवसाय वाढीसाठी सदर विकास आराखडा मार्गदर्शक ठरेल या साठी पर्यटन व्यावसायिक महासंघ पूर्ण पणे प्रशासना सोबत राहून स्थानिक पर्यटन व्यावसायिक व जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने रत्नागिरी जिल्हा पर्यटन विकास आराखड्याची कटिबद्ध आहे असे मत व्यक्त केले

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

You missed

Solar Energy