Petroling BoatPetroling Boat
1 0
Read Time:3 Minute, 31 Second

महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, 1981 या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्य कार्यालयामार्फत ई निविदा प्रक्रीया पूर्ण होई पर्यंतच्या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात तात्पुरत्या स्वरुपात गस्ती नौका भाडेपट्टीवर घेण्यात येणार आहे. तरी इच्छुक नौका मालकांनी आवश्यक कागदपत्रासह या मत्स्यव्यवसाय कार्यालय मालवण सिंधुदुर्ग कार्यालयास अर्ज सादर करावे.
तात्पुरत्या स्वरुपात गस्ती नौका भाडेपट्टीवर घेण्याकरीता नौकेवर आवश्यक बाबी- नौकेची लांबी -45 फुट (13.7 मी.), नौकेची रुंदी-15 फुट (4.6मी.), केबिन-10×7×6, नौकेचा वेग-12 नॉट किंवा अधिक, बैठक व्यवस्था-08 व्यक्तींची, प्रसाधन गृह व्यवस्था-01, प्रथमोचार साधने-1 पेटी, जीवनरक्षक साधने- रिंग बोया-8, फ्लोटिंग राफ्ट-8, लाइफ जेकेट-8, नौका नयन उपकरणे- वायर लेस-1, जी.पी.एस-1, DAT उपकरण-1, VTS उपकरण -1, CCTV- किमान 4 कॅमेरा, इतर सामग्री, विद्युत दिवे, सर्च लाईट, सिग्नल, भोंगे, अग्निशामक उपकरणे.
तात्पुरत्या स्वरुपात गस्ती नौका भाडेपट्टीवर घेण्याकरिता अटी-
शासन निर्णय 1/9/2015 च्या मधील सर्व अटी शर्ती नौका मालकास बंधनकारक राहतील. मुख्य कार्यालय मार्फत ई निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन नवीन गस्ती नौका उपलब्ध होईपर्यं सदर नौका कार्यरत राहील. मागील वर्षीच्या गस्ती नौके प्रमाणे प्रतिदिन भाड्याचा न्यूनतम दर 20,500 /- असा असेल. सागरी गस्तीचे काम एका दिवसात आठ तासाचे राहील. नौकेने दररोज 50 सागरी मैल अंतर पार पाडणे आवश्यक, वेळेनुसार दिवसा रात्री गस्त घालावी लागेल. नौकेवर असणारी साधने, इंधन खर्च, दुरस्ती यासारखे खर्च व खलाशी यांचे सर्व खर्च याची जबाबदारी नौका मालकाची राहील. नैसर्गिक आपत्ती अथवा इतर कामामुळे गस्त न झाल्यास प्रतिदिन देय रक्कमेच्या 50 टक्के रक्कम देय राहील. नौका गस्ती करीता मंजूर करण्याचे सर्व अधिकार आयुक्त मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य मुंबई व प्रादेशिक उपायुक्त मत्स्यव्यवसाय, मुंबई विभाग मुंबई यांना असून प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यात येणार आहे.तरी इच्छूक व्यावसायिकांनी गस्ती नौकेसाठी अर्ज सादर करावा असे आवाहन श्री विष्णू मोंडकर अध्यक्ष गाबीत फिशरमेन फेडरेशन यांनी केले आहे.

Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

सोलर रूफ टॉप