Launch e Book
0 0
Read Time:4 Minute, 12 Second

पर्यटन व्यावसायिक महासंघ, गिर्यारोहण संघटना, इतिहास संकलन समिती, कोकण इतिहास परिषद, डिस्कव्हरी ऑफ सिंधुदुर्ग आणि पेंडुर देवस्थान विश्वस्त समिती यांचे संयुक्त विद्यमाने पेंडुर एक धर्मपिठ इ-बुकचे मा.तहसिलदार श्री पाटिल साहेब यांचे शुभहस्ते क्युआर कोडच्या माध्य्मातुन श्री देव वेताळ मंदिर पेंडुर येथे अनावरण करण्यात आले. या प्रसंगी बोलताना तहसीलदार श्री.पाटिल म्हणाले खरच हा एक आगळा वेगळा टेक्नॉलॉजी चा पुरेपुर वापर करुन केलेला प्रयत्न प्रशंसणिय आहे. प्रकाश नारकर यानी या प्रसंगी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासाचा 5000वर्षांचा लेखाजोखा मांडला. या वेळी त्यांनी सांगितले की हा इतिहास मंदिरा भोवताली फिरताना दिसतो.त्यावेळी आपल्या पुर्वजानी उभारलेला ठेवा आपण जपला पाहीजेत. आपल्याकडे जगातून जो पर्यटक येणार तो प्राचिन परंपरा, संकृती, मंदिरे पाहायला,त्या साठी गड किल्ले, नद्या, विरगळ, ताम्रपट, बारव, देवराया, शिलालेख, कातळशिल्पे जपणं ही सर्वांचीच जबाबदारी आहे, कालांतराने हे झालं नाही तर आपल्या सारखे दुर्दैवी आपणच ठरु.या निसर्गनिर्मित नंदनवनाचे वाळवंट नको होऊ देवुया.
ई-बुक साठी पर्यटन व्यावसायिक महासंघ चे श्री.किशोर दाभोलकर, इतिहास संकलन समिती चे श्री.प्रकाशजी नारकर डिस्कव्हरी ऑफ सिंधुदुर्ग चे श्री. विजय शेट्टी आणि पेंडुर विश्वस्त समितीचे श्री अमित रेगे-कुळकर्णी यांनी विशेष प्रयत्न केले.

पेंडूर मांड उत्सव २०२३


या ई-बुक साठी पालक मंत्री मा.श्री.रविंद्रजी चव्हाण, मा.कलेक्टर सिंधुदुर्ग श्रीमती के. मंजुलक्ष्मी यानी शुभसंदेश दिले.
असेच संपुर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे ई-बुक करण्याचा पर्यटन व्यावसायिक महासंघ चा माणसं आहे. त्यासाठी प्रत्येक गावाने पुढाकार घेऊन पर्यटन व्यावसायिक महांघास सहकार्य करावे. येत्या ३० एप्रिलला आपला सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा होउन २५ वर्ष पुर्ण होत आहेत. त्यादिवशी संपुर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे ई-बुक तयार करण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. अशी माहिती पर्यटन महासंघाचे सोशल मिडीया प्रमुख किशोर दाभोलकर यांनी दिली.

या प्रसंगी कोकण इतिहास परिषद सिंधुदुर्ग चे अध्यक्ष श्री. प्रकाशजी नारकर, पर्यटन व्यावसायिक महासंघ चे श्री.विष्णू मोंडकर, सोशल मिडिया प्रमुख श्री.किशोर दाभोलकर, उपाध्यक्ष डॉ. कमलेश चव्हाण, मालवण तालुकाध्यक्ष श्री.अविनाश सामंत, मालवण शहर अध्यक्ष श्री.मंगेश जावकर, मालवण ता.सोशल मिडिया प्रमुख श्री.प्रफुल्ल देसाई, देवस्थान समिती अध्यक्ष श्री. शिवराम सावंत, सचिव श्री.अमित रेगे-कुळकर्णी, श्री.सञंय नाईक पेंडुर मंडल अधिकारी श्री. राठोड आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

You missed

Solar Energy