पर्यटन व्यवसाय वाढीसाठी हरणाई-दापोलीपर्यटन व्यवसाय वाढीसाठी हरणाई-दापोली येथे पर्यटन महासंघाचे चर्चासत्र संपन्न
3 0
Read Time:3 Minute, 37 Second

श्री.संजय काशीद पर्यटन व्यवसायिक महासंघ रत्नागिरी जिल्हा संघटक

दि. ४ सप्टेंबर २०२२ रोजी पर्यटन व्यवसाय वाढीसाठी हरणाई-दापोली, श्री. मुझम्मिल काझी यांच्या सी स्टार हॉटेल येथे संपन्न झाली. या चर्चासत्रामध्ये हरणाई परिसर पर्यटन विकासासाठी विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. पर्यटन व्यवसाय वाढीसाठी हरणाई-दापोली परिसर सुशोभिकरण, रिक्षा व्यवसाय वाढ नियोजन, स्थानिकासाठी जास्तीत जास्त व्यवसाय वाढीतून रोजगार कसा वाढवता येईल , समुद्र किनारा स्वच्छाता, सेल्फी पॉईंट तयार करणे,कचरा नियोजन,टॉयलेट, चेंजींग रुम , मुतारी यांसाठी स्थानिक ग्रांमपंचायतीला विश्वासात घेऊन पर्यटन वाढीसाठी आवश्यक नियोजन करण्यात आले.
या संदर्भात पर्यटन स्थळांचा आढावा , सोयीसुविधा , पर्यटकासाठी नवीन पर्यटन स्थळे तयार करणे , जुन्या पर्यटन स्थळांची माहिती व दुरुस्ती , होम स्टे व पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी फूड फेस्टिवल सारखे कार्यक्रमाँचे नियोजन, सरकारी कामासाठी दिलेल्या मंजुरी आराखड्यांसाठी पाठपुराव, मस्यउदयोग व हाऊसबोट सेवा उपलब्ध करण्यासाठीचे मार्गदर्शन व प्रोसेस , पर्यटन स्थळांची माहीती जगासमोर कशी आणता येईल यावर चर्चा करण्यात आली.

बरीचशी नियोजने परवानगी साठी प्रलंबीत आहेत त्यातील अडचणी यांची चर्चा झाली. व या कामाच्या पुर्णत्वाचे नियोजन करण्यात आले. तसेच पर्यटकां साठी पार्कींग व्यवस्था, कचराकुंड्या नियोजन, बंदरावर मासे विकणे व माश्यांचे वेस्टेज योग्यप्रकारे विल्हेवाट, समुद्र किनारा स्वच्छता व पर्यटकांसाठी विश्राम व्यवस्था , सेल्फी पॉईंट चे नियोजन यांची सुरुवात करण्याचे नियोजन करण्यात आले.

या चर्चासत्रात पर्यटन व्यवसायिक महासंघाचे रत्नागिरी जिल्हा संघटक श्री.संजय काशीद, दिपक विचारे पर्यटन मार्गदर्शक, सौ. पुजा साखळकर कोंकण पर्यटन महासंघ,दापोली प्रतिनिधी, श्री. मुझम्मिल काझी, श्रीम. साना काझी ग्रामपंचायत सदस्य हरणाई, श्री. महेश पवार,उपसरपंच, श्री.इस्माईल मेमन ग्रामपंचायत सदस्य, श्री. राकेश तवसळकर ग्रामपंचायत सदस्य, श्री. अजय बोरकर, श्री. फहाद जामदार, श्री.प्रल्हाद बटवले, श्री. परेश बटवले हरणाई ग्रामपंचायत मान्यवर , सदस्य दापोली येथून पर्यटन व्यवसायिक तसेच पाळंदे भागातून प्रतिनिधी व ग्रामस्थ प्रतिनिधी आदी मान्यवर उपस्थित होते.

Join App कोंकण पर्यटन

Happy
Happy
75 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
25 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

You missed

Solar Energy