Collector SindhudurgCollector Sindhudurg
0 0
Read Time:3 Minute, 13 Second

पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हाच्या जिल्हाधिकारी पदावर नियुक्त झालेले श्री किशोर तावडे यांची पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष श्री विष्णू मोंडकर यांच्या प्रमुखत्वाखाली पर्यटन महासंघाच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन श्री किशोर तावडे यांची सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी पदावर झालेल्या नियुक्ती बद्दल त्याचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी श्री किशोर दाभोलकर पर्यटन महासंघ सोशल मीडिया प्रमुख श्री कमलेश चव्हाण पर्यटन महासंघ जिल्हा उपाध्यक्ष श्री मंगेश जावकर उपस्थित होते. त्याचवेळी श्री. प्रणव भूषणवार मुख्यमंत्री फेलो उपस्थित होते.
पर्यटन व्यावसायिक महासंघाच्यावतीने जिल्ह्यात पर्यटन वाढीसाठी महासंघ करीत असलेल्या कामाची माहिती देण्यात आली जिल्हापरिषदेच्या सहकार्याने जिल्हातील 431 ग्रामपंचायती मध्ये शाश्वत पर्यटन विकासासाठी ग्रामपंचायत स्तरावर ग्रामपर्यटन समिती गठीत करणे चालू असून राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या पर्यटन योजना राबविण्याचे काम महासंघ करीत असून केंद्र सरकार च्या माध्यमातून शालेय विद्याथ्यांना पर्यटन क्षेत्रात आवड निर्माण होण्यासाठी युवा पर्यटन क्लब स्थापन करत असून यासाठी समन्वयक म्हणून पर्यटन महासंघा निवड झाली असून टुरिझम क्लब निर्मिती साठी महासंघ काम करत असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांना महासंघाच्या वतीने देण्यात आली तसेच जिल्ह्यात सागरी पर्यटन बरोबर ऍग्री,कल्चर,वन ,हिस्ट्री,साहसी क्रीडा,मेडिकल टुरिझम,कातळशिल्प क्षेत्रात पर्यटन व्यवसाय विस्ताराची गरज असून या क्षेत्रात आपल्या मदतीची आवश्यक्यता आहे असे मत श्री विष्णू मोंडकर अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे मांडले त्यावर त्यांनी पर्यटन वाढीसाठी नियोजन करण्यात येईल तसेच जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी काम करणाऱ्या पर्यटन व्यावसायिक महासंघास पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

You missed

Solar Energy