Amboli HillsAmboli Hills
0 0
Read Time:5 Minute, 50 Second

श्री विष्णू मोंडकर अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ

पर्यटन संचालनालयाच्या माध्यमातून ,ग्रामपंचायत स्थानिक जिल्हा प्रशासन यांच्या वतीने 12 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट 23 या 5 दिवसाचा आंबोली वर्षा महोत्सव आयोजित केला असून जिल्हा वासियांनी व पर्यटन व्यवसायात येऊ इच्छिणाऱ्या व्यावसायिकांनी या महोत्सवास भेट द्यावी असे आवाहन पर्यटन व्यावसायिक महासंघ करीत आहे
सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा घोषित होऊन 25 वर्षे पेक्षा जास्त काळ लोटूनही सागरी पर्यटन सोडून जिल्ह्याच्या अन्य क्षेत्रातील पर्यटन वाढीसाठी कुठलेही प्रयत्न झाले नाहीत.असेच एक जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आंबोली या भागात पावसाळी काळात रस्त्याला लागून वाहणारा धबधबा जिल्ह्यातील तसेच बाजूला लागून असलेल्या बेळगाव ,कोल्हापूर आणि गोवा राज्यातील स्थानिकांचे एक दिवसाची पर्यटन सफर एवढीच ओळख परंतु गेले अनेक वर्षे येथील स्थानिक हॉटेल ,होमस्टे धारक ,नेचर गाईड,साहसी पर्यटन तसेच जंगल सफ़र घडविणाऱ्या स्थानिकांनी कुठल्याही शासकीय मदतीशिवाय या भागातील पर्यटन जागतिक पातळीवर पोचविण्यासाठी अतोनात प्रयत्न करत आहेत .आंबोली हे थंड हवेचे ठिकाण असून अनेक प्रकारची पक्षी,प्राणी,विविध प्रकारची झाडे फुले औषधी वनस्पती,अपिचीत ऐतिहासिक किल्ले ,मंदिरे,स्थानिक पर्यटन स्थळे पर्यटनाच्या माध्यमातून विकसित करण्याच्या स्थानिक पर्यटन व्यावसायिक प्रयत्न करत असताना राज्य सरकाच्या पर्यटन विभागामार्फत या भागातील पर्यटन स्थळाचे राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी द्यावी यासाठी पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या वतीने प्रयत्न चालू होते .
राज्य सरकारने यांची दखल घेऊन आंबोली थंड हवेचे ठिकाण देशविदेशात पोचविण्यासाठी आंबोली वर्षा महोत्सवाचे आयोजन केले असून राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय सहल आयोजित करणाऱ्या 70 पेक्षा जास्त टूर ऑपरेटर यासाठी निमंत्रित केले असून आंबोली थंड हवेच्या ठिकाणा सोबत जिल्यातील अन्य बारमाही पर्यटन वाढविण्यासाठी या टूर ऑपरेटर यांना माहिती दिली जाणार असून सिंधुदुर्ग जिह्यातील फूड संस्कृती ,कल्चर ,कृषी पर्यटन जैवविविधता गड किल्ले यांची माहिती दिली जाणार असून या माध्यमातून जिल्ह्यातील बारमाही पर्यटन वाढण्यास मदत होईल असा पर्यटन महासंघा विश्वास आहे.
पाच दिवसाच्या होणाऱ्या वर्षा महोत्सवाची सुरवात आंबोली येथे दिनांक 12 ऑगस्ट 23 रोजी सकाळी 11 वाजता स्थानिक ढोलताशा ,गणेशवंदना च्या माध्यमातून उदघाटन होईल ,साहसी क्रीडा प्रकार झिप लाईन सफर दशावतार,नाईट सफर दिनांक 13 ऑगस्ट 23 रोजी जलक्रीडा प्रकार जेटस्की स्पीड बोट बनाना बम्पर राईड तसेच हिरण्यकेशी ट्रेकिंग ,सांस्कृतिक कार्यक्रम फुगडी ,जंगल सफर दिनांक 14 ऑगस्ट 23 रोजी रॅपलींग जैविविधाता माहिती,सांस्कृतिक कार्यक्रम चांगंभलं जंगल सफर दिनांक 15 ऑगस्ट 23 रोजी सैनिकी स्कुल मुलांच्या कवायती ,शाहिद हवालदार पांडुरंग गावडे स्मारक येथे माजी सैनिकांचे संचलन सांस्कृतिक कार्यक्रम चित्रकथी जंगल सफर दिनांक 16 ऑगस्ट रोजी महादेव गड ट्रेकिंग आंबोली सफर असे विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन केले असून आंबोली हे बारमाही थंड हवेचे ठिकाण असून जिल्ह्यातील पावसाळी पर्यटन वाढीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत राज्य सरकारने जिल्ह्यातील बारमाही पर्यटनासाठी चालू केलेल्या उपक्रमाचे पर्यटन महासंघाने स्वागत केले असून अश्या प्रकारच्या विविध महोत्सवामुळे जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी मदत होईल असा विश्वास श्री विष्णू मोंडकर अध्यक्ष पर्यटन व्यवसायिक महासंघ यांनी व्यक्त केला आहे .

Amboli Hill Station Sindhudurg Best Waterfall in Maharashtra Amboli Waterfall

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

You missed

Solar Energy