आई महिला केंद्रित पर्यटन धोरणआई महिला केंद्रित पर्यटन धोरण
1 0
Read Time:4 Minute, 32 Second

श्री विष्णू मोंडकर अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ.

आई महिला केंद्रित पर्यटन धोरण : पर्यटन क्षेत्रातील प्रकल्प चालवत असलेल्या किंवा नवीन प्रकल्प उभारू इच्छित असलेल्या महिला उद्योगांसाठी रुपये 15 लाख कर्जावरील व्याज परतावा पर्यटन संचालनालय महाराष्ट्र विभागाकडून देण्यात येणार आहे यासाठी महिला उद्योजकांकडून अर्ज विहित नमुन्यात मागवण्यात येत आहेत मार्गदर्शक सूचना आणि अर्जाचा नमुना पर्यटन व्यावसायिक महासंघा तर्फे उपलब्ध केला जाणार असून पर्यटन उद्योगात कार्यरत असलेल्या महिलांनी आई महिला केंद्रित पर्यटन धोरण अर्ज कसा करावा यांच्या माहिती साठी हॉटेल श्री महाराज येथे दिनांक 15/11/23 ते 18/11/23 पर्यंत सकाळी 11 ते 2 पर्यंत मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन केले जाणार असून जास्तीत जास्त महिला उद्योजकांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री विष्णू मोंडकर अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ यांनी केले आहे 

पर्यटन हे येणाऱ्या काळात वेगाने वाढणारे क्षेत्र असून महिलांचा यामधील सहभाग त्यांच्या आर्थिक विकासासाठी साधन ठरू शकते पर्यटन क्षेत्रात महिलांचे उद्योजकता व नेतृत्व गुण विकसित करण्याच्या अनेक संधी असून राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने आई महिला केंद्रित पर्यटन धोरण 23 जाहीर केले आहे.त्यामाध्यमातून पर्यटन संचालनाकडे नोंदणीकृत करून मालकी हक्काच्या किंवा भाडेतत्वावर चालविलेल्या हॉटेल ,होम स्टे ,टूर एजंसी ,पर्यटन प्रकल्पासाठी 15 लाख कर्जाच्या व्याजावरील रक्कम त्यांच्या आधार लिंक खात्यात पूर्ण कर्ज परतफेड होईपर्यंत किंवा 7 वर्षे कालावधी पर्यंत जमा करण्यात येईल.यासाठी पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या वतीने महिलासाठी धोरणा बद्दल राज्यसरकारचे अभिनंदन करीत असून या योजनेत कॅरव्हॅन,बीच शॅक,साहसी पर्यटन (जमीन,हवा,जल)पर्यटक सुविधा केंद्र,कृषी पर्यटन केंद्र,होम स्टे,बी अँड बी,रिसॉर्ट,हॉटेल,मोटेल,हाऊस बोट,टेंट,ट्री हाऊस,हॉटेल,मोटेल,हाऊस बोट,टॅट,ट्री हाऊस,हॉटेल व्होकेशनल हाऊस,पर्यटन व्हिला,वूडन कॉटेज,रेस्तोरंट,उपहारगृह,फास्ट फूड,महिला चलित कॉमन किचन,कॅफे,टूर ऑपरेटर ट्रॅव्हल एजंट,टूर मार्गदर्शक,क्रूज,टूर ऍन्ड ट्रॅव्हलर एजन्सी,आर्ट अँड क्राफ्ट व्हिलेज,टूरिस्ट ट्रांसपोटर्स ऑपरेटर,आदिवासी,निसर्ग पर्यटनाशी संबांधित प्रकल्प,मेडिकल पर्यटन,वेलनेस सेंटर ,आयुर्वेदा ,योगा केंद्र इतर पर्यटन व्यवसायांचा समाविष्ट असून या माध्यमातून जास्तीत जास्त महिला पर्यटन व्यवसायाकडे वळून आर्थिक सक्षम होतील असा विश्वास महासंघाने व्यक्त केला आहे .सदर पर्यटन पूरक व्यवसाय पर्यटन संचालनाकडे नोंदणी करणे आवश्यक असून यासाठी पर्यटन व्यावसायिक महासंघाशी 

संपर्क साधावा असे आवाहन श्री विष्णू मोंडकर अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ यांनी केले आहे …

SINDHUDURG TOUR SINDHUDURG TOURISM NEWS

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
100 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

You missed

Solar Energy