आई महिला केंद्रित पर्यटन धोरणआई महिला केंद्रित पर्यटन धोरण
0 0
Read Time:4 Minute, 53 Second

श्री विष्णू मोंडकर अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सबमरीन प्रकल्प गुजरात राज्यात ही बातमी बनणे आणि यावर नकारात्मक चर्चा करणे दुर्देवी यापेक्षा जिल्ह्यात पर्यटन क्षेत्र वाढवण्यासाठी स्थानिकामधील समन्वय राजकीय इच्छाशक्त्ती ची प्रचंड आवशक्यता .यासाठी सर्व राजकीय व सामाजिक संघटनांनी एकत्र येणे ही काळाची गरज .ज्या पद्धतीने राजकोट किल्ला तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ,श्री क्षेत्र मोरयाचा धोंडा शासकीय पूजा सारख्या ऐतिहासिक पर्यटन वाढीसाठी धाडसी निर्णय घेतलेल्या राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व पालकमंत्री श्री रविंद्रजी चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा खऱ्या अर्थाने पर्यटन जिल्हा म्हणून उभारी घेत असल्याने त्यांच्या नेतृत्वात अश्या प्रकारचे पर्यटन पूरक प्रकल्प जिल्ह्यातुन बाहेर न जाण्याचा पर्यटन व्यावसायिक महासंघास पूर्ण विश्वास वास्तविक सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा घोषित होऊन 25 वर्ष झाली असून तारकर्ली देवबाग भोगवे कुणकेश्वर सारखे काही मोज़केच किनारपट्टी सोडून जिल्ह्यातील 121 की.मी किनारपट्टी पर्यटन पूरक व्यवसाय निर्माण झाल्यास स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत अशाच वेंगुर्ला तालुक्यात निवती भाग पर्यटन दृष्ट्या जागतिक पातळीवर येण्याची ताकद या भागात असलेल्या निवती किल्ला तसेच येथूनच समुद्रात उभ्या असलेले निवती दीपगृह आणि या परिसरात समुद्राखाली असलेले विविध प्रकारचे मासे ,कोरल जागतिक पर्यटनाची क्षमता असलेला भाग पर्यटन दृष्ट्या विकसित करण्यासाठी पर्यटन व्यावसायिक महासंघ प्रयत्नशील असून निवती किल्ला परिसर तसेच निवती दीपगृह पर्यटनासाठी पर्यटकांना खुले करण्यासाठी तसेच निवती दीपगृह परिसरातील जलपर्यटनसाठी पाणबुडी सबमरीन प्रकल्प लवकरात लवकर सुरु करण्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव जिल्ह्याचे पालकमंत्री श्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्याकडे पर्यटन व्यावसायिक महासंघा तर्फे सादर करण्यात येणार आहे यासाठी स्थानिक मच्छिमार व पर्यटन व्यावसायिकांशी सकारात्मक चर्चा होऊन या भागात संयुक्त रित्या प्रकल्प उभा झाल्यास वेंगुर्ला तालुक्यासोबत सिंधुदुर्ग जिल्हा जागतिक पर्यटन नकाशा वर येण्यास मदत होईल पाणबुडी प्रकल्पासाठी राज्याचे शिक्षणमंत्री श्री दीपकभाई केसरकर प्रयत्नशील असून हा पाणबुडी प्रकल्प होणारच आहे तसेच जिल्ह्यातील सर्व गडकिल्ल्याचे शासकीय अधिकृत माहिती असलेले शासकीय पुस्तक बनविण्याचे आदेश पालकमंत्री यांनी स्थानिक जिल्हाप्रशासनास दिले असून प्रशासकीय पातळीवर यावर काम चालू आहे निवती किल्ल्यावर पर्यटन दृष्ट्या डेव्हलपमेंट साठी पालकमंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद दाखविला असून निवती दीपगृह या ठिकाणी पर्यटकांना जाण्यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देऊन निवती भाग पर्यटन दृष्ट्या विकसित करण्याचा पर्यटन व्यावसायिक महासंघाचा मानस असल्याची माहिती श्री विष्णू मोंडकर अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ यांनी दिली .

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

You missed

Solar Energy