moryachadhondamoryachadhonda
0 0
Read Time:5 Minute, 14 Second

श्री विष्णू मोंडकर,अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ

                श्री देव मोरयाचा धोंडा क्षेत्र धार्मिक पर्यटन स्थळ व त्या ठिकाणी आरमार संग्रहालय होणार मा.उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिले अनुकूल आदेश. तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील छत्रपती शिवरायांच्या ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्याचे साडेतीनशे वर्षा पूर्वी ज्या पावन स्थळी भूमीपूजन झाले ते स्थळ म्हणजे श्री देव मोरया धोंडा. मालवण च्या सागरी किनाऱ्यावर असलेला श्री देव मोरयाचा धोंडा क्षेत्र तळकोकणातील किनारपट्टीच्या गाबीत समाजातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आपल्या महाराष्ट्रातील शासकीय पूजेचा मान असलेली दोन स्थानं म्हणजे पंढरपूर चा विठोबा आणि आपल्या सिंधुदुर्गातील श्री देव मोरयाचा धोंडा क्षेत्र ह्या ठिकाणी वर्षभर गाबीत समाजातील असंख्य भाविक आपले मनातील इच्छित व्यक्त करुन आपला कार्यभाग इथे सोपवत असतात… असा हा श्री देव मोरया चा धोंडा क्षेत्र ऐतिहासिक दृष्ट्या सुद्धा छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मालवणच्या किनाऱ्यावर काळाचे घाव सोसत अढळपणे उभा आहे. सदर क्षेत्र धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून घोषित करून त्याठिकाणी आरमार संग्रहालय उभारण्यात यावे या साठी उपमुख्यमंत्री श्री देवेन्द्रजी फडणवीस साहेब यांच्या कडे पाठपुरावा करण्यात आला या संबंधी वैद्यकीय आघाडीचे कोकण प्रभारी डॉ अमेय देसाई यांच्या माध्यमातून लक्ष वेधले ते गाबीत समाजाचे विद्यमान जिल्हा कार्याध्यक्ष तसेच पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष श्री विष्णू (बाबा) मोंडकर आणि भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस व पर्यटन व्यावसायिक महासंघ जिल्हा उपाध्यक्ष श्री प्रसन्न (बाळू) देसाई यांनी.दोन महिन्यांपूर्वी प्रत्यक्ष मोरयाचा धोंडा या ठिकाणी भेट देत तिथे मस्तक टेकवून इथे विकासात्मक काम घडले पाहिजे असा निश्चय करत ही बाब भारतीय जनता पक्षाचे महाविजय अभियान चे प्रमुख व उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचे निकटवर्तीय आमदार श्री श्रीकांत भारतीय यांच्या कडे डॉ.देसाईंनी प्रामाणिकपणे मांडली. त्याचे महत्त्व लक्षात घेत व खरोखरच छत्रपतींच्या या ऐतिहासिक तसेच पावन स्थळाला धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून मान्यता मिळावी तसेच याठिकाणी एक शिवकालीन आरमार संग्रहालयासाठी डीपीआर मंजुर व्हावा या दोन्ही बाबींसाठी आमदार श्री श्रीकांतजी भारतीयांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहिले.

                 योगायोग म्हणजे काल मॉरिशस येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी उड्डाण करण्या अगोदर उपमुख्यमंत्री महोदयांनी ह्या पत्रावर अनुकूल आदेश संबंधित विभागाला दिले आहेत. यानिमित्ताने छत्रपती शिवरायांना अभिप्रेत असलेले सुशासन पर्व म्हणजे काय याचा अनुभव पुन्हा एकदा मा .उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जनमानसासमोर ठेवला आहे.पर्यटन व्यवसायिक महासंघाच्या वतीने मा .उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच आमदार श्रीकांत भारतीय,राज्य सरकारचे व डॉ .अमेय देसाई यांचे आभार मानत आहोत अशी माहिती पर्यटन व्यावसायिक महासंघ अध्यक्ष श्री विष्णू मोंडकर यांनी दिली आहे.

शिवरायांना अभिप्रेत असलेले सुशासन पर्व म्हणजे काय याचा अनुभव पुन्हा एकदा आमदार भारतीय आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जनमानसासमोर ठेवला आहे !

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

You missed

Solar Energy