B & B Workshop @ Chiplun
0 0
Read Time:5 Minute, 18 Second

               दि.१९ मार्च २०२३ रोजी केंद्र सरकारचे पर्यटन मंत्रालय आणि पर्यटन व्यावसायिक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी चिपळूण येथे न्याहारी निवास धारकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. चिपळूण येथे न्याहारी निवास कार्यशाळा या कार्यक्रमाचे उद्घाटन मा.आमदार श्री प्रमोदजी जठार साहेब यांच्या हस्ते झाले व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय आमदार श्री शेखरजी निकम साहेब हजर होते.
             न्याहारी निवास योजना या कार्यक्रमासाठी इंडिया टुरिझम चे अधिकारी भावना शिंदे मॅडम मैत्री मॅडम नीला लाड मॅडम महाराष्ट्र पर्यटन विभागाचे डी ओ टी श्री हनुमंत हेडे सर या सर्वांनी स्वच्छता , कृषी पर्यटन , न्याहरी व निवास पर्यटनातील संधी पर्यटन स्थळांचा विकास कसा करणे सरकारी स्कीम्स आणि प्रश्न उत्तर वेगवेगळ्या विषयावरती सर्वांना फायदेशीर असे मार्गदर्शन केले.
             पर्यटन व्यवसायिक महासंघाचे कोकण विभाग अध्यक्ष श्री विष्णू (बाबा) मोंडकर सर यांनी पर्यटन व्यवसायिक महासंघाची चालू असलेली कार्यपद्धती व पुढील कार्यपद्धती सांगून पाणी बॉटलचे कोकण जल या नावाने लॉन्चिंग केले या बॉटल वरती विशेष म्हणजे QR कोड छापण्यात आलेला आहे तो क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर आपणास कोकणातील पर्यटन स्थळाची माहिती एका क्लिकवर मिळू शकते
त्यानंतर माननीय आमदार श्री शेखरजी निकम साहेब यांनी पर्यटन वाढीसाठी आपल्या भागामध्ये विविध पर्यटन स्थळांचा शोध घेणे तसेच मंदिरे देऊळ जंगल सफर गड किल्ले सागरी पर्यटन खाडी पर्यटन यासाठीही सर्व नेते मंडळी व सामाजिक संस्थांनी एकत्रितपणे येऊन राजकारणाच्या पलीकडे जाऊन एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे असे सांगितले
             त्यानंतर मा.आमदार श्री प्रमोदजी जठार साहेब यांनी सिंदूर रत्न योजना याची सखोल माहिती दिली व या योजनेचा सर्वांनी फायदा करून घ्यावा असे आव्हाने केले या योजने मधील निधी आलेला असतो तो योग्य कामासाठी प्रत्येक तालुक्यासाठी वापरून पर्यटन कसे वाढेल या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे असे सांगितले व पर्यटन व्यवसायिक महासंघाचे कार्याचे कौतुक केले यानंतर श्री संजय काशीद सर पर्यटन व्यवसायिक महासंघ रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष यांनीही आलेल्या सर्व प्रशिक्षणार्थी व प्रमुख पाहुणे तसेच पत्रकार मित्रांचे यांचे आभार मानले या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र शासन व भारत सरकार यांचे पर्यटन विभागाचे पदाधिकारी पर्यटन व्यवसायिक महासंघाचे मीडिया प्रमुख श्री किशोर  दाभोळकर  श्री मंगेश जावकर श्री.उदय कदम सर श्री सिद्धेश चव्हाण श्री बाळासाहेब नकाते श्री घूमे सर श्री राजेश मर्चंडे श्री समीर सागवेकर सौ रेश्मा तांबे सौ पूजा साखळकर श्री संजय भागवत, श्री महेश सागवेकर, श्री विद्यमान गुरव, श्री विवेक भावे, सौ कविता बोधे, महेंद्र डीगे, सिद्धेश चव्हाण कौस्तुभ पाटील अभिषेक उंब्रजकर श्री जयेंद्र खताते श्री मिलिंद कापडी लवेल व लांजा कॉलेजचे आलेले हॉटेल मॅनेजमेंटचे विद्यार्थी व शिक्षक तसेच सर्व पर्यटन व्यवसायिक महासंघाचे पदाधिकारी सर्व प्रशिक्षणार्थी यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम संपन्न झाला.         

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
100 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

सोलर रूफ टॉप