Tourism

सिंधुदुर्ग किल्ला

शिवाजी महाराजांच्या आरमारात या किल्ल्याला फार महत्त्व होते. किल्ल्याचे क्षेत्र कुरटे बेटावर ४८ एकरावर पसरलेले आहे. तटबंदीची लांबी साधारण तीन किलोमीटर आहे. बुरुजांची संख्या ५२ असून ४५ दगडी जिने आहेत. ह्या किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या काळातील गोड्या पाण्याच्या दगडी विहीरी आहेत. त्यांची नावे दूध विहीर, साखर विहीर व दही विहीर अशी आहेत. या किल्ल्याच्या तटबंदीच्या भिंतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी तीस ते चाळीस शौचालयाची निर्मिती केली आहे. या किल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांचे शंकराच्या रूपातील एक मंदिर आहे. हे मंदिर इ.स. १६९५मध्ये शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी बांधले.

राजवाडा सावंतवाडी

सावंतवाडी राजवाडा सिंधुदुर्गातील एक महत्वाचे पर्यटन स्थळ ओळखले जाते. सावंतवाडी हि स्वातंत्र्यपूर्व काळातील सावंतवाडी संस्थानाची राजधानी. येथे भोंसले घराण्याची सत्ता होती. राजवाड्याची बांधणी खेम सावंत भोसले संस्थानांनी १७५५-१८०३ या काळात केली. हा राजवाडा सध्या तीन भागात विभागला गेलेला आहे. सध्याच्या राजघराण्यातील लोकांचे राहण्याचे ठिकाण, राज दरबार आणि म्युसिअम. सावंतवाडी शहरातील हे सुंदर पर्यटन स्थळ असून मुंबई,पुणे, तसेच कोल्हापूर येथून महामार्गाने येथे पोहोचता येते 

श्री देव कुणकेश्वर देवगड

श्री क्षेत्र कुणकेश्वर…. कोकणातील एक पवित्र तिर्थक्षेत्र…अतीप्राचीन काळापासुन येथील कणकेच्या राईमध्ये वास्तव्य करुन असलेल्या शंभुमहादेवाची ही भुमी… कणकेच्या बनात असलेला ईश्वर म्हणजेच कुणकेश्वर… देवावरुन गावाचे नाव सुद्धा कुणकेश्वर असेच प्रचलीत झाले. सुमारे ११०० व्या शतकापासुन प्रसिद्धीला आलेले हे स्थान म्हणजे कोकणातील धार्मीक व ऐतिहासीक सौंदर्याचा मुकुटमणीच म्हणावा लागेल. कुणकेश्वर मंदिरा इतके प्राचीन भव्य देवालय कोकणात इतरत्र कुठेच नाही. पुणे, मुंबई, कोल्हापुर या शहरांशी देवगडहुन अवघ्या १८ कि.मी. अंतरावर कुणकेश्वर हे गाव आहे.एसटी थांबते तेथून अवघ्या ५-७ मिनिटांच्या अंतरावर असणार्या मंदिराचा कळस लक्ष वेधून घेतो.ऐन किनार्याशी असणार्या उंचवटयावर उभारलेल्या या मंदिरचा सागरतटाकडील भाग भक्कम बांधीव तटाने सुरक्षित राखला आहे. ८-९ मीटर उंचीच्या या तटावर असणार्या सपाट जागेवर मंदिर आहे. मंदिराचा परिसर २२-२४ मीटर उंचीच मंदिर आहे. मंदिराचा परिसर तटाने परिवेष्टित तर आहेच, पण खाली जांभ्या दगडांची फरशीही आहे. अशा या कुणकेश्वर मंदीराचा इतिहास सुद्धा तितकाच प्राचीन, रोमांचकारी आणि रहस्यमय असा आहे.

श्री देवी भराडी, आंगणेवाडी

            आंगणेवाडीच्या यात्रेची तारीख जाहीर झाली, की महाराष्‍ट्राच्या कानाकोप-यातून नव्हे, तर परराज्यांतूनही हजारो भक्त दोन दिवसांच्या त्‍या यात्रेसाठी सिंधुदुर्गात दाखल होतात. लाखो भक्तांची मांदियाळी फुलून जाते.      कोकणातील प्रत्येक गाव आणि प्रत्येक गावाचे दैवत वैशिष्टपूर्ण आहे. आंगणेवाडी ही मसुरे गावातील वाडी. मालवण तालुक्यातील सर्वांत मोठा गाव म्हणून मसुरेची ओळख आहे. आंगणेवाडीची अनेक वैशिष्ट्ये सांगता येतील. तेथील यात्रा एवढी झपाट्याने सर्वदूर का झाली याचे अनेक कंगोरे आणि उदाहरणे देखील आहेत.

कोकणच्या मातीचा उत्स्फूर्त आविष्कार -दशावतार

दशावतार’ ही कला म्हणजे कोकणच्या मातीचा एक उत्स्फूर्त आविष्कार आहे. धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा वारसा कोकणच्या मातीत कोकणी माणसानं आजमितीपर्यंत आवर्जून जपलेला आहे. दशावतार हे त्याचे ठळक उदाहरण आहे. तो कोकणी माणसाचा सांस्कृतिक ठेवा आहे.

अजिंक्य, अभेद्य पारगड

सह्याद्रीच्या दक्षिणोत्तर पसरलेल्या मुख्य रांगेमध्ये हा किल्ला वसला आहे. या रांगेत सर्वांत दक्षिणेकडील किल्ला म्हणजे पारगड किल्ला. किल्ले पारगड महाराष्ट्र आणि गोव्याच्या सीमेवरील कोल्हापूर जिल्ह्य़ाचा दक्षिण टोकावरील चंदगड तालुक्याच्या सरहद्दीवर असलेला एक नितांतसुंदर किल्ला. हिरव्यागार वनराईच्या कवेत, विविधतेने नटलेल्या घनदाट जंगलाच्या सान्निध्यात विसावलेला किल्ले पारगड इतिहासाचा साक्ष देत आजही दिमाखात उभा आहे.

आंबोलीची नवी ओळख

 तानाजी मालुसरे यांनी सिहंगड किल्ला माघ वद्य नवमी इ. स. १६७१ मध्ये जिंकला. यावेळी झालेल्या युद्धात तानाजींना मृत्यु पत्करावा लागला. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी पारगड किल्ला बांधला व त्याची जबाबदारी किल्लेदार म्हणून तानाजी मालुसरे यांचे पुत्र रायबा मालुसरे यांच्याकडे सोपवली. त्यावेळेस काही काळ महाराजांनी या गडावर मुक्काम केला होता. महाराजांनी किल्लेदार आणि तेथील मावळ्यांना आज्ञा केली की, ‘जोपर्यंत आकाशात चंद्र, सूर्य आहेत तोपर्यंत हा गड जागता ठेवा.’ ही आज्ञा राजाज्ञा होती.
सोलर रूफ टॉप