Sindhudurg sub marine ProjectSindhudurg sub marine Project
0 0
Read Time:2 Minute, 48 Second

श्री विष्णू मोंडकर अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन पाणबुडी प्रकल्पासाठी 47 कोटी निधी उपलब्ध केल्याबद्दल पालकमंत्री रवींद्र चव्हाण,खासदार श्री. नारायणजी राणे व केंद्रसकाराचे पर्यटन व्यावसायिक महासंघ अभिनंदन करत असून या पर्यटन प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात दहा हजार पेक्षा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार प्राप्त होणार असून निवास व्यवस्थेमध्ये ही 20 टक्के वाढ होणारी आहे अश्या प्रकारचा महाराष्ट्र व अन्य पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्याराज्यात एकमेव महाराष्ट्र राज्याचा नाविन्यपूर्ण प्रकल्प आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बारमाही पर्यटन वाढीसाठी पर्यटन व्यावसायिक महासंघ प्रयत्शील असून जिल्हाच्या पर्यटन वाढीचा उद्धेश ठेऊन पर्यटन व्यावसायिक महासंघ ने सदर पर्यटन पाणबुडी प्रकल्प साठी पालकमंत्री श्री रविंद्रजी चव्हाण साहेब यांच्या कडे पाठपुरावा केला होता त्यांच्या माध्यमातून राज्यस्तवर बैठकही आयोजित करून या प्रकल्पाला निधी उपलब्ध करण्यामागे पालकमंत्री श्री रवींद्र चव्हाण यांचे मोठे योगदान आहे. तसेच खासदार श्री नारायण राणे, आमदार श्री निलेश राणे, श्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून राज्य व केंद्र सरकार कडून या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध झाला आहे. या पर्यटन पाणबुडी चे वैशिष्ट असे आहे की या मध्ये बसून सिंधुदुर्गातील खोल समुद्रातील अपरिचित सागरी विश्व पर्यटकाना पाहता येणार आहे विविध प्रकारची कोरल, मासे जलसंपदा पर्यटक अनुभवणार असून सिंधुदुर्गातील जालपर्यटनाचा आलेख जागतिक पातळीवर उंचावणार आहे चालू पर्यटन हंगामात ही पर्यटन पाणबुडी उपलब्ध होणार आहे अशी माहिती विष्णू मोंडकर अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ यांनी केले आहे .

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

सोलर रूफ टॉप