माजी कृषी मंत्री श्री सदाभाऊ खोत याची पर्यटन व्यावसायिक महासंघ सिंधुदुर्ग च्या कार्यालयास भेट

माजी कृषी मंत्री श्री सदाभाऊ खोत याची पर्यटन व्यावसायिक महासंघ सिंधुदुर्ग च्या कार्यालयास भेट


पर्यटन व्यावसायिकाच्या समस्या सोडविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करण्याचे दिले आश्वासन:-श्री विष्णू सुधाकर मोंडकर जिल्हाध्यक्ष.पर्यटन व्यावसायिक महासंघ सिंधुदुर्ग.
माजी कृषी मंत्री व रयत क्रांती शेतकरी संघटना अध्यक्ष श्री सदाभाऊ खोत यांचा व्यापारी,मच्छिमार,शेतकरी यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी राज्यव्यापी दौरा आयोजित केला असून या दौऱ्याची सुरवात सिंधुदुर्ग किल्यावर दर्शन घेऊन सुरवात केली त्यावेळी त्यांनी सिंधुदुर्ग पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या कार्यालयास भेट दिली दोन वर्ष कोरोना,नैसर्गिक वादळी हवामान मुळे पर्यटन व्यावसायिक,व्यापारी वर्गाच्या अडीअडचणी समजून घेतल्या त्यावेळी त्यांनि आपल्या भागातील झालेल्या नुकसान व सूचना समजून घेऊन यासंबंधी राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले यावेळी त्यांचा श्री बाबा मोंडकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यावेळी पर्यटन व्यावसायिक श्री संतोष लुडबे ,श्री दादा वेंगुर्लेकर आदी उपस्थित होते

सोलर रूफ टॉप